डेल्हिवरी लॉजिस्टिक्स कडून ‘स्पॉटॉन’चे अधिग्रहण

Aug 26, 2021

भारतातील आघाडीच्या बी-टू-बी एक्सप्रेस लॉजिस्टिक्स’ कंपन्यांपैकी एक होण्याचे ध्येय

नाशिक २५ ऑगस्ट २०२१ : डेल्हिवरी या एंड-टू-एंड लॉजिस्टिक्स व पुरवठा साखळी सेवा देणारी भारतातील आघाडीची कंपनी आहे.  देशव्यापी नेटवर्क असलेल्या या  कंपनीने बंगळुरू येथील ‘स्पॉटॉन लॉजिस्टिक्स’चे अधिग्रहण केले आहे. ‘डेल्हिवरी’तर्फे या व्यवहाराची अधिकृत माहिती देण्यात आली.  असून या व्यवहारामुळे ‘डेल्हिवरी’ची ‘बी-टू-बी’ व्यवसायाची विद्यमान क्षमता वाढली आहे.

स्पॉटॉन लॉजिस्टिक्स ही एक अभियांत्रिकी व तंत्रज्ञान-चालित लॉजिस्टिक्स  तसेच भारतातील एक अग्रगण्य अशी ‘मल्टीमोडल एक्सप्रेस लॉजिस्टिक्स’ आणि ‘सप्लाय चेन सोल्यूशन कंपनी’ आहे .एक सुस्थापित नेटवर्क आणि व्यावसायिक संसाधने उपलब्ध असलेली ही कंपनी हाय-टेक, वाहन उत्पादन, अभियांत्रिकी, औषध निर्माण, इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल्स, लाइफस्टाइल, रिटेल व ई-कॉमर्स यांसारख्या उद्योगांतील ग्राहकांना सेवा देते. डेल्हिवरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहिल बरुआ म्हणाले की प्रगतीसन्मुख राहण्याच्या आणि व्यवसायातील प्रत्येक क्षेत्रात मोठी वाढ साधण्याच्या आमच्या उद्दिष्टानुसार हा व्यवहार झाला आहे. गेल्या १० वर्षांमध्ये ‘डेल्हिवरी’ने ‘बी-टू-सी लॉजिस्टिक्स’मध्ये आघाडीचे स्थान मिळविले आणि आता आमच्या ट्रकलोड व्यवसायातील काही भाग ‘स्पॉटॉन’सोबत जोडून आम्ही ‘बी-टू-बी एक्सप्रेस’मध्ये देखील याच स्थानाकडे वाटचाल करणार आहोत. महत्त्वाची बाब अशी, की आमच्या ‘बी-टू-सी’ आणि ‘बी-टू-बी एक्सप्रेस’ व्यवसायांमध्ये डेल्हिवरी आणि स्पॉटॉन या दोघांच्या ग्राहकांना सुसूत्रतेचा लाभ देण्यासाठी आणि आमच्या एंड-टू-एंड पुरवठा साखळीची क्षमता आणखी वाढविण्यासाठी आम्ही आता अगदी सज्ज झालो आहोत. स्पॉटॉन लॉजिस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक अभिक मित्रा म्हणाले की स्पॉटॉन टीम आणि मी ‘डेल्हिवरी’च्या वाढीच्या आणि मूल्य-निर्मितीच्या प्रवासाचा भाग होण्यास उत्सुक आहोत. ‘डेल्हिवरी’च्या टीमने भारतात अग्रगण्य अशी ‘एंड-टू-एंड लॉजिस्टिक्स’ व पुरवठा साखळी सेवा कंपनी उभी करण्याचे जबरदस्त काम अल्पावधीतच केले आहे. स्पॉटॉन ही कंपनी ग्राहक संबंध व सेवेची गुणवत्ता, व्यावसायिक व्यवस्थापन व तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी यांवर भर देणारी म्हणून ओळखली जाते. ‘डेल्हिवरी’चीदेखील हीच मूल्ये आहेत आणि हा आमच्यातील समान धागा आहे. त्यातूनच आम्ही एकत्र येऊ शकलो आणि आता भारतातील आघाडीच्या लॉजिस्टिक कंपन्यांपैकी एक होण्याच्या मार्गावर आहोत.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News