नाशिक : ५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. कालिका देवी मंदिर ट्रस्ट आणि क्रीडा संस्कृती फौंडेशन यांच्या वतीने दरवर्षी हा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा केला जातो. यावेळी नाशिक जिल्ह्यातील ५७ मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हाणून संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशवअण्णा पाटील, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, दे. ना. पाटील शिक्षण संस्थेचे संचालक मुरलीधर पाटील, जिल्हा परिषेदेच्या सदस्या ज्योती जाधव, क्रीडा संघटक अशोक दुधारे, आनंद खरे आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते आजच्या सत्कारार्थीना पुष्पगुच्छ, पुस्तक, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलतांना सौ. दुर्गाताई तांबे यांनी सांगितले की शिक्षक हा समाजाच्या जडण-घडणीमधला महत्वाचा घटक आहे. शिक्षणामुळेच समाजाची प्रगती होते, आपले भारताचे दुसरे राष्ट्रीपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षण तज्ञ् होते. आणि त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील मोलाच्या योगदानामुळेच त्यांच्या ५ सप्टेंबर हा जन्मदिवस शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगितले. तसेच शिक्षणामुळे पुरुषाबरोबर स्त्री सक्षम झाली आहे. याचे श्रेय्य शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना जाते. असे सांगून शिक्षकांना शुभेछया दिल्या .
रवींद्र नाईक यांनी सांगितले की शिक्षकांच्या माध्यमातून सुसंस्कृत समाज तयार होतो आणि देशाची प्रगती होते. त्यामुळे शिक्षकांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना प्रोस्थाहन देण्याची आवशक्यता आहे. अश्या प्रकारे समाजाला शिक्षित करण्याचे काम करणाऱ्यांना शाबासकीची थाप देणाऱ्या कालिका मंदिर संस्थान आणि क्रीडा संस्कृती सारख्या संस्थाचेही कौतुक केले पाहिजे असे सांगितले. तर कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांनी सांगितले की, आम्ही समाजाच्या धार्मिक भावना जपण्याबरोबरच समाजासाठी उपयोगी असलेल्या उपक्रमांचे आयोजन करून त्यांचा प्रगतीसाठी प्रयत्न करत आहोत असे सांगितले.
यावेळी शिक्षणाची जबाबदारी चांगल्या रीतीने पार पडणाऱ्या शिक्षक, मुख्याधापयाक, प्राचार्य यांच्या योगदानाची माहिती सौ. अस्मिता मोगल आणि सौ. विजया दुधारे यांनी सांगितली.
सत्कारार्थी शिक्षकांच्या वतीने खेडगाव, दिंडोरी येथील शाळेच्या मुख्याधिपिका सौ. कमल गांगुर्डे यांनी आपल्या भावना व्यक्ती करतांना संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान केल्याबद्दल.आयोजकांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे प्रस्तविक आनंद खरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय खरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाम मोरे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू शिंदे उदय खरे, दीपक निकम, शाम मोरे, दिनेश अहिरे, मनीषा काठे आदिंनी आदिंनी परीश्रम घेतले.





