कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेने सेबीकडे केला डीआरएचपी दाखल

Nov 6, 2021

मुंबई : कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक या असेटचा दर्जा, निधीची किंमत, रिटेल ठेवी आणि कासा ठेवी यांच्या निकषावर २०२१ या आर्थिक वर्षामध्ये, भारतातील आघाडीच्या एसएफबींपैकी एक असलेल्या  , बँकेने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स  बाजार नियामक यंत्रणा सिक्युरिटीज अँड एक्सचेंज  बोर्ड ऑफ इंडियाकडे   दाखल केला आहे .कंपनीने भारतातील पहिली स्मॉल फायनान्स बँक म्हणून काम सुरू केले आणि अन्य एसएफबींच्या तुलनेत अनेकविध असेट वर्गांची मोठी पुस्तिका या बँकेकडे आहे. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये, एसएफबींमध्ये सर्वाधिक अर्थात ९९ टक्के सुरक्षित कर्जे बँकेने दिली होती.

प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावामार्फत  निधी उभा करण्याची कंपनीची योजना आहे. यामध्ये नवीन इक्विटी इश्यूजचा   एकत्रित वाटा सुमारे ४५० कोटी रुपये असेल आणि  विक्रीसाठीचा प्रस्ताव ३,८४०,०८७ इक्विटी समभागांचा प्रस्ताव विक्रीसाठी   असेल.   ऑफर फॉर सेलमध्ये पीआय व्हेंचर्स एलएलपीच्या ३३७,३९६ इक्विटी समभागांचा समावेश असेल, अॅमायकस कॅपिटल प्रायव्हेट इक्विटी वन एलएलपीची संख्या ६०४,६१४ पर्यंत असेल, अॅमायकस कॅपिटल पार्टनर्स इंडिया फंड वनच्या इक्विटी समभागांची संख्या ७०,१७८ पर्यंत असेल, ओमान इंडिया जॉइंट इन्व्हेस्टमेंट फंड टूच्या इक्विटी समभागांची संख्या ८३६,७२८ पर्यंत असेल   आणि डीआरएचपीमध्ये नमूद केलेल्या विशिष्ट व्यक्तीचे १,९९१,१७१ इक्विटी समभाग असतील .

आर्थिक वर्ष २०२१ मधील आकडेवारीनुसार, अन्य एसएफबींच्या तुलनेत सर्वांत कमी म्हणजेच अनुक्रमे २.०८ टक्के व १.१३ टक्के जीएनपीए व एनएनपीएसह कंपनीच्या असेटचा दर्जा सर्वोत्तम आहे. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये, अन्य एसएफबींच्या तुलनेत तसेच खासगी क्षेत्रातील पहिल्या १० बँकांच्या तुलनेत, बँकेचे कासा प्रमाण सर्वोच्च म्हणजेच ४० टक्के होते.   कंपनीकडील प्रतिशाखा सर्वोच्च रिटेल ठेवी, २०२१ या आर्थिक वर्षात, ३२२.५० दशलक्ष रुपयांच्या होत्या. त्याचप्रमाणे अन्य एसएफबींच्या तुलनेत आर्थिक वर्ष २१मध्ये निधीचा खर्च सर्वांत कमी होता.

फ्रेश इश्यूमधून उभा राहिलेला निधी, बँकेच्या भविष्यकाळातील भांडवली गरजा भागवण्याच्या दृष्टीने, बँकेचा दुसऱ्या श्रेणीतील   तळ वाढवण्यासाठी करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे.एडलवाइज फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड, अ‍ॅक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड लिमिटेड हे या इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स म्हणून काम करणार आहेत.इक्विटी समभाग बीएसई आणि एनएसईवर सूचित करण्याचाही प्रस्ताव आहे.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News