- देशातील सर्वाधिक इंधन बचत करणारी पेट्रोल कार, २६.८६ किमी/लीटर चे मायलेज
- आयडल स्टार्ट स्टॉप सह नेक्स्ट जेन के-सिरीज ड्युअल जेट, ड्युअल व्हीव्हीटी इंजिन
- स्टायलिश आणि शहरी बाह्यरूपासह ३डी ऑरगॅनिक डिझाईन, रस्त्यावरील अस्तित्व ठळक करण्यासाठी आकर्षक कॅरेक्टर्स
- सेंटर फोकस्ड उर्जावान आणि आकर्षक अंतर्गत डिझाईन, मोठी केबिन स्पेस, सुधारीत लेग रूम आणि लगेज स्पेस मुळे अधिक आरामदायकपणा आणि सोपेपणा
- सुरक्षेवर लक्ष केंद्रित करत १२ हून अधिक वैशिष्ट्ये, विभागात प्रथमच हिल होल्ड असिस्ट, ड्युअल एअरबॅग्ज आणि ईबीडी सह एबीएस
- १७.७८ सेंमी स्मार्ट प्ले स्टुडिओ, स्मार्टफोन नेव्हिगेशन, इंजिन पुश स्टार्ट-स्टॉप बटण, स्मार्ट की, गिअर शिफ्ट इंडिकेटर, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आणि इलेक्ट्रिकली फोल्डेबल ओवआरव्हीएम्स
नाशिक- मारूती सुझुकी इंडिया लिमिटेड (एमएसआयएल) ने आज त्यांच्या बहुप्रतिक्षित कॉम्पॅक्ट हॅचबॅक असलेल्या स्टायलिश अशा ऑल न्यु सेलेरिओ या भारतातील सर्वाधिक इंधन बचत करणार्या कारची सुरूवात केल्याची घोषणा केली, ऑल न्यु सेलेरिओ कडून सर्वाधिक म्हणजेच २६.६८ किमी/लीटरचे मायलेज देण्यात येत आहे. यामध्ये नेक्स्ट जनरेशन ड्युअल जेट, ड्युअल व्हीव्हीटी के सिरिज इंजिन असून यांत आयडल स्मार्ट-स्टॉप टेक्नॉलॉजीही पुरवण्यात आली आहे. यामुळे आता अनोखा ड्रायव्हिंग अनुभव प्राप्त होणार आहे. यामध्ये नवीन युगातील डिझाईन, आकर्षक रस्त्यावरील अस्तित्व, अनेक सुरक्षा आणि स्मार्ट वैशिष्ट्ये देण्यात आली असून ऑल न्यु सेलेरिओ मुळे पुन्हा एकदा कॉम्पॅक्ट हॅचबॅक विभागात क्रांती झाली आहे.दि ऑल न्यू सेलेरिओ मध्ये अनोख्या ड्रायव्हिंग अनुभवासह नवीन ३डी ऑरगॅनिक स्कल्प्ड डिझाईन, विभागात प्रथमच सुरक्षा आणि सोपेपणाशी निगडीत वैशिष्ट्ये देण्यात आल्याने या विभागात बहुप्रतिक्षित ताजेपणा उपलब्ध झाला आहे.
या सुरूवाती विषयी बोलतांना मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री केनिची आयुकावा यांनी सांगितले “ भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात महामारी मुळे अधिक चालना मिळाली असून यामुळे लोक हे वैयक्तिक वाहनांकडे विशेष लक्ष देत आहेत. भारत ही बाजारपेठ विशेष करून छोट्या वाहनांसाठी असल्याने भारतात होणार्या एकूण प्रवासी वाहनांच्या विक्रीच्या ४५ टक्के विक्री ही हॅचबॅक गाड्यांची होत असते. एक आघाडीचे कार उत्पादक म्हणून आमचीही आता ऑटोमोबाईल बाजारपेठेला चालना देण्याची जबाबदारी आहे. नवीन ऑल न्यु सेलेरिओ मुळे आम्ही देशातील सर्वात महत्त्वपूर्ण अशा प्रवासी वाहन क्षेत्राला चालना देत आहोत.”
ते पुढे म्हणाले “ ऑल न्यु सेलेरिओ ही गाडी सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असून अजोड ड्रायव्हिंग अनुभव, अजोड इंधन क्षमता आणि विविध आरामदायक वैशिष्ट्ये, सुरक्षा वैशिष्ट्येही आकर्षक किंमतीत उपलब्ध करून देत आहोत. पहिल्या पिढीतील सेलेरिओने प्रथमच ऑटो गिअर शिफ्ट (एजीएस) आता टू पेडल टेक्नॉलॉजीने उपलब्ध केली आहेत. आंम्हाला खात्री आहे की ऑल न्यु सेलेरिओच्या अत्याधुनिक वैशिष्ट्ये, स्टायलिश नवीन डिझाईन, पुढील पिढीतील पावरट्रेन यांमुळे शहरी ग्राहकांना आकर्षित करेल आणि बाजारपेठेला आवश्यक असणारा उत्साह निर्माण करेल.”
स्टायलिश, ताजेतवाने, सक्षम असे शहरी डिझाईन
ऑल न्यू सेलेरिओ मध्ये आकर्षक असे सौंदर्य असून यामध्ये ३डी डिझाईन आहे. स्टायलिश, आकर्षक आणि शहरी डिझाईन मुळे आता हॅचबॅक बाजारपेठेचे पुर्नलेखन केले जाणार आहे. नवीन ॲनिमेटेड असे पुढचे हेडलॅम्प्स, ड्रॉपलेट स्टाईल टेल लॅम्प्स, आणि नवीन रेडियंट सिग्नेचर फ्रंट ग्रील मध्ये क्रोम ॲक्सेंचर मुळे नवीन सिग्नेचर डिझाईन तयार होते. १५ इंचाचे अर्बन ब्लॅक ॲलॉय व्हील्स आणि पुढे फॉग लॅम्प्स मुळे ताजेतवाने अपील मिळते. तरूण आणि उत्साही ग्राहकांवर लक्ष केंद्रित करून ऑल न्यु सेलेरिओ मध्ये अनोखी व प्रोत्साहक स्टाईल उपलब्ध झाली आहे.
स्वीपिंग डिझाईन ने युक्त घटकांसह उर्जावान आणि ऐसपैस अंतर्गत सजावट
ऑल न्यू सेलेरिओची निर्मिती ही विचारपूर्वक पध्दतीने करण्यात आली असून यामध्ये उर्जावान आणि ऐसपैस केबिन मुळे अधिक आराम प्राप्त होतो. आकर्षक बाह्यरुपाला अनुरूप असल्याने यामध्ये अनेक छोट्या गोष्टींवर लक्ष देण्यात आल्याने सुंदर डिझाईनने युक्त कॅरेक्टर लाईन्स तसेच सुंदर ३डी इन्स्ट्रूमेंट पॅनल आणि ट्रिम्स मुळे सौंदर्य अधिक वाढीस लागत आहे. ट्वीन स्लॉट सेंटर एसी व्हेंटिलेशन बरोबर ठळक क्रोम ॲक्सेंट्स, ठळम बॅरल थीम्ड साईड एअर व्हेंट्स मुळे ऑल न्यु सेलेरियो ची अंतर्गत सजावट अधिक प्रमाणात खुलून दिसते. नवीन स्टायलिश गिअर शिफ्ट लिव्हर खूपच हलके असून ग्रीपही चांगली आहे, ज्यामुळे अनोखा ड्रायव्हिंग अनुभव मिळून रोजचा प्रवाही सुखकारक होण्यास मदत होते.ऑल न्यु सेलेरिओ मध्ये ऐसपैस कॅबिन स्पेस, अधिक व्हील बेस, मोठी शोल्डर रूम, मोठी लेग रूम आणि मोठी सामानाची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रोत्साहक आणि उर्जावान – नेक्स्टजेन पावरट्रेन यामध्ये ड्युअल जेट सह पुढील पिढीतील के सिरीज इंजिन असून त्याच बरोबर ड्युअल व्हीव्हीटी असल्याने ऑल न्यु सेलेरिओ ही भारतातील सर्वांत इंधनक्षम अशी पेट्रोल कार बनली आहे. ही गाडी २६.६८ किमी प्रती लीटर मायलेज देते. विभागात प्रथमच देण्यात येणार्या गोष्टींमध्ये आयडल स्टार्ट-स्टॉप देण्यात आल्याने ऑल न्यु सेलेरिओ शाश्वतते मध्ये आणखी एक पाऊल टाकत असून यामुळे सर्व प्रकारात सीओ२ चे उत्सर्जन हे १९ टक्क्यांनी कमी होते. अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त असल्यमुळे ही गाडी ३५०० आरपीएमला ८९ एनएम टॉर्क आणि ६००० आरपीएम ला ५० केडब्ल्यू उर्जा निर्माण करते. नेक्स्ट जेन के सिरीज इंजिनाची निर्मिती ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केली असू असून यामध्ये कुल्ड ईजीआर, ऑटो टेन्शनर आणि इंटिग्रेटेड एक्झॉस्ट मॅनिफोल्ड चा समावेश आहे.
अजोड सुरक्षा मारूती सुझुकीच्या सिग्नेचर हार्टटेक्ट मंचावर तयार करण्यात आलेली ऑल न्यु सेलेरिओ गाडी अतिशय सक्षम पणे गाडीला बसणारे धक्के व हादरे पचवण्यास सक्षम आहे. हार्टटेक्ट मंचामुळे क्रॅश पासून बचाव, दणकटपणा आणि गाडीची एकूण मजबूती वाढवण्यास सक्षम आहे. यामध्ये तन्य अशा स्टीलचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला असल्याने आणि यामध्ये सुरक्षेच्या १२ हून अधिक वैशिष्ट्यांचा वापर केल्याने आपल्या परिजनांची सुरक्षा गाडी चालवतांना होते. ऑल न्यु सेलेरिओ मध्ये विभागात प्रथमच एजीएस सह हिल होल्ड असिस्ट फंक्शन देण्यात आले असून हे कार्य भारतीय सुरक्षा मानकांनुसार पुढून, बाजून आणि पादचार्यांच्या सुरक्षे साठी अलेल्या निकषांनुसार आहेत.
स्मार्ट टेक्नॉलॉजी चे एकत्रीकरण करण्या बरोबरच कन्व्हिनियंट फीचर्स चालकांचा अनुभव समृध्द करण्यासाठी यामध्ये स्मार्टफोन नेव्हिगेशन सह १७.७८ सेंमी स्मार्ट प्ले स्टुडिओ इन्फोटेन्मेंट सिस्टम उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच बरोबर विभागात प्रथमच असलेल्या वैशिष्ट्यांमध्ये पुश स्टार्ट स्मार्ट की, पोलेन टाईप एसी फिल्टर देण्यात आली असून त्याच बरोबर कन्व्हिनियंट फिचर्स मध्ये टिल्ट स्टिअरींग, माऊन्टेड ऑडिओ कंट्रोल्स, ६०:४० स्प्लीट रिअर सीट्स आणि हाईट ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट्स असल्यामुळे कार्यक्षमता वाढून वापरकर्त्यांचा अनुभव समृध्द करण्यात येत आहे.
आकर्षक रंगांची उधळण ऑल न्यू सेलेरिओ ही ६ आकर्षक रंगांत उपलब्ध असून यांत सॉलीड फायर रेड आणि स्पीडी ब्ल्यू सह आर्टिक व्हाईट, सिल्की सिल्व्हर, ग्लिस्टरिंग ग्रे आणि कॅफिन ब्राऊन यांचा समावेश आहे.




