मुंबई : अर्थकारणाची गाडी हळूहळू पूर्वपदावर येते आहे, त्याचप्रमाणे सशक्त मागणी वृद्धी व पर्यावरण-स्नेही उत्पादनांकडे उपभोक्त्यांचा वाढता कल यामुळे जेएसडब्ल्यू पेंट्स या 13 बिलियन अमेरिकन डॉलरच्या जेएसडब्ल्यू समुहाचा भाग असलेल्या भारताच्या सर्वाधिक पर्यावरण-स्नेही पेंट कंपनीने ऑक्टोबर 2021 दरम्यान रु 100 कोटींचा विक्री टप्पा पार केला आहे (जेएसडब्ल्यू पेंट्सचा 100 वर 100 मापदंड). हा एक महत्त्वाचा व्यवसाय मापदंड असून ही उंची गाठणारी जेएसडब्ल्यू पेंट्स वेगवान पेंट्स कंपनी ठरली. आर्थिक वर्ष 22 पर्यंत रु. 1000 कोटी महसूल टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट असलेल्या जेएसडब्ल्यूला महिन्याला रु. 100 कोटींची विक्री केल्याने अधिकच बळकटी मिळाली आहे. आर्थिक वर्ष 22 च्या पहिल्या अर्धवार्षिकीत कंपनीने साल-दरसाल सुमारे 120 टक्क्यांची वृद्धी प्राप्त केली. याच कालावधीत, त्यांच्या सजावटीच्या व्यवसायाने उसळी मारली. जेएसडब्ल्यू पेंट्सने 100 आठवड्यांतील व्यवसाय कामकाजाने भारतभर आपले अस्तित्व निर्माण करणारी एकमेव भारतीय पेंट कंपनी बनली आहे.एक राष्ट्रीय मातब्बर अशी ओळख असलेल्या जेएसडब्ल्यू पेंट्सने भारत सरकारच्या स्टार्ट-अप इंडिया प्रोग्राममध्ये पुढाकार घेत सर्व कर्मचारी वर्गाकरिता जेएसडब्ल्यू पेंट्स क्षितीज ईएसओपी 2021 हा एम्प्लॉयी स्टॉक पर्याय दाखल केला. अशाप्रकारे पहिल्यांदाच एखाद्या भारतीय पेंट कंपनीने ईएसओपी प्लान राबविला असून त्यात प्रत्येक कर्मचाऱ्याला कंपनीचे इक्विटी शेअर मिळणार आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या प्रयत्नांची दखल क्षितीज ईएसओपी 2021 प्लानच्या वतीने घेण्यात येईल व त्यांना भविष्यात आपले मूल्य निर्माण करण्यासाठी सशक्तीकरण होणार आहे. ज्यामुळे जेएसडब्ल्यू पेंट्सच्या व्यवसाय वृद्धीला आगामी काळात आकार मिळायला मदत होईल. व्यवसाय वृद्धी आणि ईएसओपी दाखल करण्याबद्दल जेएसडब्ल्यू पेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ जिंदल म्हणाले की, “आमच्या व्यवसायाने यंदाच्या आर्थिक वर्षाच्या अर्धवार्षिकीत सशक्त महसूल आणि मार्जिन ग्रोथ नोंदवली. जेएसडब्ल्यू’चा हा एक असा ग्राहक-केन्द्री व्यवसाय आहे, ज्याने देशात चांगली कामगिरी बजावली. ही बाब जेएसडब्ल्यूकरिता अभिमानाची आहे. देशभर उत्पादने लॉन्च केल्याने आम्हाला उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. जेएसडब्ल्यू’चे भवितव्य अधिकच उज्ज्वल दिसते. कुटुंब-स्नेही उत्पादने, एनी कलर वन प्राईज (कोणताही रंग एकाच किंमतीत) अशा ऑफर आणि आमचे सुलभ, निश्चित व झटपट पर्याय यामुळे जेएसडब्ल्यू पेंट्स बाजारातील सर्वपसंतीचा पर्याय ठरला आहे. आमच्या 100 आठवड्यांच्या व्यवसाय कामकाजात रु. 100 कोटींचा विक्री टप्पा गाठल्याने ही आमच्यादृष्टीने कौतुकाची पावती ठरली. आमची संपूर्ण टीम जबाबदारीच्या पलीकडे जाऊन वचनबद्धता जपते, त्याचे हे कौतुक म्हटले पाहिजे. आम्ही एकत्र जेएसडब्ल्यू पेंट्सची भविष्यातील पेंट्स कंपनी म्हणून उभारणी करत आहोत. जेएसडब्ल्यू पेंट्स क्षितीज ईएसओपी 2021 अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेला स्टॉक पर्याय टीममधील प्रत्येक सदस्याचे सबलीकरण करेल. हे कर्मचारी आमच्या आगामी टप्प्यातील वृद्धी प्रवासात आमचे सहप्रवासी होतील. आम्ही हा स्टॉक पर्याय सर्व कर्मचारी वर्गाकरिता त्यांचे पद-हुद्दा लक्षात घेता उपलब्ध करून दिला आहे. जेएसडब्ल्यू पेंट्सकरिता ही केवळ सुरुवात आहे आणि आम्ही उद्योगक्षेत्राला आश्चर्य वाटेल अशी कंपनी घडविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”
ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल
Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...



