ऍमेझॉन किराणा स्टोअरचे आता ऍमेझॉन फ्रेश मध्ये एकत्रीकरण

Nov 17, 2021

नाशिक : ऍमेझॉनने  किराणा स्टोअर फ्रेश आणि पँट्रीचे एकाच स्टोअर ऍमेझॉन फ्रेश मध्ये एकत्रीकरण पूर्ण केल्याची घोषणा केली आहे. हे नवीन स्टोअर 300 हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध आहे, जे ग्राहकांना भरपूर बचत, उत्पादनांची मोठी निवड, आणि जलद आणि सोयीस्कर डिलीव्हरी पर्याय हे सर्व एकाच ऑनलाईन ठिकाणी देतं.
ग्राहकांसाठी ‘प्रत्येक गोष्ट’ आणि ‘प्रत्येक दिवशी’ ही वचनबद्धता मोहीम चालवत, टीमने महत्वाचा टप्पा कसा गाठला आहे आणि ग्राहक नवीन ऍमेझॉन फ्रेश स्टोअर कडून कशी अपेक्षा करतात याबद्दल सिद्धार्थ नांबायर आमच्यासह बोलले.
तुम्हा आम्हाला ऍमेझॉन ऍप मधील नवीन ऍमेझॉन फ्रेश स्टोअर बद्दल आणखी काही सांगू शकता का?
आम्ही एक ग्राहक केंद्रीत कंपनी आहोत आणि त्यांना सातत्याने सुधारित खरेदी अनुभव देणे, मोठी निवड देणे, आणि उत्तम मूल्य तसेच सोय देणे यांसाठी प्रयत्नरत आहोत. यावर्षी फेब्रुवारी मध्ये, आम्ही पँट्री स्टोअरचे निवडक शहरांमध्ये फ्रेश मध्ये एकत्रीकरण करण्याची घोषणा केली आणि ग्राहकांना अमर्यादीत बचतीसह दैनंदीन किराण्यासाठी सोयीस्कर खरेदी फार आवडली.
आज, आम्ही दोन्ही स्टोअरचे 300 हून अधिक भारतातील शहरांमध्ये ऍमेझॉन फ्रेश या एकाच ऑनलाईन स्टोअरमध्ये एकत्रीकरण पूर्ण केले आहे. ग्राहक आता सातत्याने उत्तम बचत, उत्पादनांची मोठी निवड, आणि सोयीस्कर डिलीव्हरी पर्याय यांचा सातत्याने आनंद घेतील. त्यांना सुधारित खरेदीचा अनुभव सुद्धा मिळेल ज्यामध्ये किराणासाठी ऍप-इन-ऍप अनुभव असेल, पर्सनलाइज विजेट आणि चेकआऊट दरम्यान वारंवार खऱेदी केल्या जाणाऱ्या वस्तू विसरल्या जाणार नाहीत याकरिता रिमाइंडर यांसारखे सोयीस्कर फिचर्स असतील.

मला अजुनही सर्व पँट्री सिलेक्शन नवीन स्टोअरमध्ये मिळेल का?
हो, ग्राहकांना नवीन ऍमेझॉन फ्रेश स्टोअर मध्ये सर्व पँट्री सिलेक्शन मिळेल.

अनुभवाच्या दृष्टीकोनातून ग्राहकांसाठी स्टोअरमध्ये काय आहे?
ग्राहकांना उत्तम ऑनलाईन खरेदी अनुभव देणे, तात्काळ आणि सुरक्षित डिलीव्हरी देणे यावर आमचा फार भर असतो. ग्राहकांना आमच्यासोबत कोठेही उत्तम अनुभव मिळेपर्यंतच ते आमच्याकडून खरेदी करतील हे आम्हाला चांगलेच माहिती आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत करतो. या सुरूवातीमुळे, आम्हाला आमच्या समर्पित ऍप-इन-ऍप अनुभव ऍमेझॉन फ्रेश द्वारे किराण्यासाठी खरेदीचा अनुभव सुलभ करता आला आणि येत्या महिन्यात आम्ही बरेच नवीन फिचर्स आणि सुधारणा करणार आहोत. उत्तम बचत देण्याव्यतिरीक्त, ऍमेझॉन फ्रेश ऑनलाईन किराणा खरेदीतील अडथळे कमी करेल.
होमपेजवर ऍमेझॉन फ्रेश आयकॉनवर क्लिक करून, तुम्ही समर्पित किराणा खरेदी स्टोअरवर जाल, जेथे तुम्हाला असे फिचर्स मिळतील जे तुम्हाला काही मिनीटांमध्येच तुमची आठवड्याची/महिन्याची बास्केट भरण्यासाठी मदत करतील. ऍमेझॉन फ्रेश सह किराणा ऑनलाईन खरेदी करणे अधिक रीवार्डींग, जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर बनेल.

आजपासून पुढे 300 शहरातील ग्राहक त्यांच्या ऍपवर काय बघतील?
ऍमेझॉन फ्रेश महत्वाच्या 14 शहरांमध्ये (बंगळूर, दिल्ली, फरिदाबाद, गुरगाव, गाझियाबाद, नोएडा, अहमदाबाद, म्हैसूर, जयपूर, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, पुणे आणि कलकत्ता) नाशवंत उत्पादनांची निवड देईल जसेकी फळे आणि भाजीपाला, फ्रोजन आणि चिल्ड उत्पादने जसेकी डेअरी आणि मीट, कोरड्या किराण्याच्या वस्तू, ब्युटी, बेबी, पर्सनल केयर, आणि प्राण्यांची उत्पादने. या शहरांमधील ग्राहक सकाळी 6 पासून मध्यारात्रीपर्यंत चालू असणाऱ्या दोन-तास डिलीव्हरी स्लॉटचा आनंद घेऊ शकतील.
उर्वरीत शहरांसाठी, ग्राहक मुख्य अन्न, स्वयंपाकाचे अत्यावश्यक साहित्य, स्नॅक, पेय, पॅक फूड, घरगुती वस्तू, पर्सनल केयर, स्कीन केयर, प्राण्यांचे पदार्थ, बेबी प्रॉडक्ट जसेकी डायपर आणि बेबी फूड आणि बराच किराणा खरेदी करू शकतात, ज्याची डिलीव्हरी 1-3 दिवसांत होईल.
सर्व्हिस, उत्पादने, तात्काळ डिलीव्हरी वेळ या सर्व ग्राहकांच्या मागण्यांसह, तुम्ही “वन स्टॉप शॉप” ची योजना कशी काय केलीत?
लाखो भारतीय ग्राहकांनी त्यांच्या दैनंदीन जीवनाचा आम्हाला भाग बनविला आहे त्याचा फार आनंद आहे. ग्राहकांच्या घरी सुरक्षितपणे इतर अत्यावश्यक उत्पादने आणि किराणा पोहोचविण्यासाठी ग्राहक ऍमेझॉनवर विश्वास ठेवतात. या नवीन सुरूवातीसह, सर्व वस्तू ग्राहकांच्या ठिकाणांवर आधारित 1-3 दिवसांमध्ये एकाच सोयीस्कर शिपमेंट मध्ये डिलीव्हर होतील.

300 शहरांमध्ये एकत्रीकरण म्हणजे मध्यम व लहान शहरांमध्ये मागणी वाढत आहे विशेष करून महामारी कालावधी नंतर असे आहे का?
मागील 18 महिन्यांत, बरेच ग्राहक ऑनलाईन खरेदी करत असल्याचे लक्षात आले. Amazon.in वरील जवळपास 65% ऑर्डर्स आणि 85% नवीन ग्राहक लहान आणि मध्यम शहरांमधील आहेत. सामान्यपणे, त्यांची पहिली खरेदी ही किराणा उत्पादने असते. ग्राहक जास्त करून आटा, तूप, मैदा, साखर, पॅक स्वीट, सुकामेवा, गीफ्ट बॉक्स, आणि स्नॅक व पेय यांची खरेदी करत असल्याचे आमच्या लक्षात आले. आता आम्ही सोय आणि मूल्य एकाच स्टोअर मध्ये एकत्रीत केल्यामुळे, आमच्या एकत्रीत केलेल्या स्टोअरच्या माध्यमातून विविध खरेदी ध्येयांसह ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आमच्याकडे भरपूर सामर्थ्य आणि सुविधा आहे. भुवनेश्वर, पटना, आणि लखनऊ यांसारख्या सर्वोतम शहरांमध्ये, महामारी काळानंतर ऑनलाईन किराणा खरेदीचा वापर बऱ्याच प्रमाणात होत असल्याचे आम्ही बघितले. नवीन ग्राहकांनी याचा अंमल करावा याकरिता पुढे या शहरांमध्ये आमचे अस्तीत्व आणि सेवेचा दर्जा तयार करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News