नाशिक– सेराई या जागतिक व्यापारात सहजता आणणाऱ्या ऑनलाइन बी2बी व्यासपीठाने केपीएमजीसोबत मुव्हिंग द नीडल – थ्रेडिंग अ सस्टेनेबल फ्युचर फॉर अपीरल हा जागतिक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, ग्राहक आणि सरकारकडून येणाऱ्या वाढत्या दबावामुळे अपीरल उद्योगातील सस्टेनेबलता आणि पारदर्शकतेचा मुद्दा गेल्या काही वर्षांमध्ये अधिक ठळकपणे समोर आला आहे. या सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार, अपीरल क्षेत्रातील दोन तृतीयांशहून अधिक कंपन्या (66 टक्के) पुरवठा साखळीतील ट्रान्सपरन्सी हा ‘अत्यंत महत्त्वाचा’ मुद्दा मानतात. भारतीय कंपन्यांच्या बाबतीत हा आकडा अधिक जास्त म्हणजे 83 टक्के आहे.एकूण प्रतिसादकर्त्यांपैकी 80 टक्के प्रतिसादकर्त्यांनी 2027 पर्यंत ट्रान्सपरन्सी उपाययोजना अमलात आणण्याचे उद्दिष्ट राखले आहे.
मात्र, 20 टक्क्यांहून कमी प्रतिसादकर्त्यांचा सध्या त्यांच्या पुरवठा साखळीतील सर्व भागधारकांसंदर्भात सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे (दृश्यमानता) आणि फक्त 15 टक्क्यांना सुरुवातीपासून प्रोसेसिंग आणि उत्पादकतेच्या प्रत्येक पायरीवर उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या घटकांना पूर्णपणे ट्रेस करणे शक्य झाले आहे
मुव्हिंग द निडल – थ्रेडिंग अ सस्टेनेबल फ्युचर फॉर अपीरल हा सखोल अहवाल अभ्यास आहे. सस्टेनेबल पद्धतींच्या अवलंबांच्या गरजेला अपीरल क्षेत्र कसा प्रतिसाद देत आहे, हे यात नमूद करण्यात आले आहे आणि योग्य वेळी तो सादर करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या COP26 क्लायमेट कॉन्फरन्समध्ये अधिक सस्टेनेबल अपीरल उद्योग निर्माण करण्याची कशी अत्यंत गरज आहे, हे अधोरेखित करण्यात आल्याने हा अहवाल अगदी योग्य वेळी आला आहे. ऑगस्ट 2021 मध्ये अपीरल इंडस्ट्रीतील 200 हून अधिक सीनिअर एक्झिक्युटिव्ह्सच्या जागतिक सर्वेक्षणातून नोंदवलेल्या नोंदी या अहवालात आहेत. वेगवेगळ्या आकाराचे आणि क्षमतेचे ब्रँड्स आणि रीटेलर्स, वितरक, उत्पादक आणि सोर्सिंग एजंट्स यांचा प्रतिसादकर्त्यांमध्ये समावेश आहे. बाजारपेठेतील आघाडीचे अपीरल ब्रँड्स, उत्पादक, असोसिएशन्स आणि सोल्युशन प्रोव्हायडर्सच्या डझनभराहून अधिक एक्झिक्युटीव्ह्सच्या सखोल मुलाखतींची जोड या नोंदींना देण्यात आली आहे.
पुरवठा साखळीतील ट्रान्सपरन्सी म्हणजे अधिक सस्टेनेबल बनवण्याच्या अपीरल उद्योगाच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
या अहवालानुसार, ट्रान्सपरन्सी वाढवण्याच्या मुद्दयाला चालना देणारे तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत.
कॉर्पोरेट प्रतिष्ठा : जवळपास 52 टक्के वितरक आणि 59 टक्के रिटेलर्स/ब्रँड्स आपल्या पुरवठा साखळीतील ट्रान्सपरन्सी वाढवण्यामागे कॉर्पोरेट
प्रतिष्ठा वाढवणे हे मुख्य कारण मानतात.
व्यवसाय संधी : कधी नव्हते इतके, वितरक आता आपल्या व्यावसायिक उद्दिष्टांचा भाग म्हणून पुरवठा साखळीतील पारदर्शकात वाढवण्यास प्रोत्साहित झाले आहेत. कारण, सस्टेनेबल ब्रँड किंवा अधिकाधिक नियमांचे पालन करणारे ब्रँड्स म्हणून स्वत:ची ओळख प्रस्थापित करणाऱ्या ब्रँड्स आणि रीटेलर्ससोबत नव्या व्यवसाय संधींचा वेध घेणे त्यांना शक्य होईल.
नफा : खर्च कमी करून मार्जिन राखण्यासाठी कार्यचलनात्मक उत्कृष्टतेसाठी कंपन्या प्रयत्न करत आहेत. संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की अधिक सस्टेनेबल पद्धती असणाऱ्या व्यवसायांमध्ये कॉस्ट ऑफ कॅपिटल कमी असते. सस्टेनेबल अपिरल व्यवसाय आपल्या ब्रँड्ससाठी निव्वळ नफ्याचे मार्जिन 1 ते 1.5 टक्के आणि पुरवठादारांसाठी 1.5 ते 2.5 टक्के वाढण्याची आशा करू शकतात.
केपीएमजी चायनाचे एएसपीएसीचे कन्झ्युमर अॅण्ड रीटेल हेड अॅन्सन बेली म्हणाले : “सस्टेनेबिलिटीच्या मुद्द्यावरील चर्चेकडे दुर्लक्ष करणे आता अपीरल कंपन्यांना फार काळ शक्य होणार नाही. हल्लीच्या काळात ग्राहकांकडे उत्पादनांची सस्टेनेबलता वैशिष्ट्ये, तसेच त्यामागील कंपन्या आणि त्यांचा व्यापक समुदायांवर होणारा परिणाम याबद्दल प्रचंड माहिती असते. COP26 क्लायमेट समिटमध्येही या क्षेत्रात हे बदल आणणे आवश्यक आहे, यावर भर देण्यात आला. अधिक ट्रान्सपरन्सी म्हणजे ब्रँड्सना जबाबदार धरता येईल. मात्र, यातून इन्व्हेंटरी नियंत्रित करण्याच्या अधिक चांगल्या संधी निर्माण होतील, अधिक लवचिकता येईल आणि संपूर्ण पुरवठा साखळतील मोठ्या प्रमाणावर सहकार्यात्मक वातावरणाची निर्मिती करता येईल.”
सध्या, पुरवठा साखळीतील पारदर्शकतेची खातरजमा करण्याची अपीरल क्षेत्राची क्षमता फारच कमी आहे.
संपूर्ण पुरवठा साखळीतील पूर्ण ट्रान्सपरन्सी गाठण्यातील अडथळे
ट्रान्सपरन्सी गाठण्यात या क्षेत्राला मागे खेचणारे सर्वात मोठे कारण म्हणजे सुरुवातीच्या काळातील प्रचंड गुंतवणूक. पुरवठा साखळीतील इतर कंपन्यांकडून माहिती मिळवणे आणि तिचे व्यवस्थापन करणे ही आणखी एक अडचण आहे. तरीही, दोन तृतीयांश प्रतिसादकर्त्यांना (65 टक्के) आपल्या पुरवठा साखळीतील ट्रेसेबिलिटी पॉलिसी सर्वांसमोर आणण्याची इच्छा आहे. उत्तर अमेरिका (80 टक्के) आणि युरोपात (81) हे प्रमाण फार जास्त आहे. या भागातील वितरकांना एशिया पॅसिफिकमधील वितरकांच्या कमी दरांची स्पर्धा आहे आणि ते आपल्या सस्टेनेबलता वैशिष्टयांचा या दरातील स्पर्धेत स्वत:चे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी फायदा घेऊ शकतात.
या बाबतीत भारतीय कंपन्या आपले वेगळेपण जपू शकतात. कारण, 66 टक्के भारतीय प्रतिसादकर्ते आताही आपली पुरवठा साखळी ट्रेसेबिलिटी पॉलिसी जाहीर करत आहेतच.
किचकट कार्यचलन पद्धती, कमी मार्जिन आणि आजघडीच्या अपीरल पुरवठा साखळतील प्रचंड गुंतागुंत या पार्श्वभूमीवर. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी फक्त 14 टक्के कंपन्यांकडे व्हिजिबिलिटीसाठी आणि 13 टक्के कंपन्यांकडे ट्रेसेबिलिटीसाठी पूर्णपणे ऑटोमेटेड पारदर्शक पद्धती अस्तित्वात आहे. दरम्यान, अर्ध्याहून अधिक प्रतिसादकर्त्यांकडे आताही या दोन्ही घटकांसाठी मॅन्युअल पद्धती आहेत आणि यात छोट्या आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांची संख्या अधिक आहे. ग्राहक आणि प्रशासनातर्फे माहितीची वाढती मागणी लक्षात घेता या क्षेत्राला आपल्याकडील सुविधा वाढवण्याची फार तातडीची गरज आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब म्हणजे संपूर्ण पुरवठा साखळी आणि नेटवर्कमध्ये मटेरिअलचा प्रवास कसा होतो आणि त्यातून दृश्यमानता मिळवण्यासाठीची गुरुकिल्ली आहे.
सेराईचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक रामचंद्रन म्हणाले, “या क्षेत्रातील 80 टक्क्यांहून अधिक कंपन्या 2027 पर्यंत ट्रान्सपरन्सी पर्याय अमलात आणण्याची योजना आखत आहेत. मात्र, व्यवसायांनी यावर अधिक तत्परतेने काम करायला हवे. आपल्या उत्पादन निर्मितीचा पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी कंपन्यांनी विविध उपाययोजना शोधणे गरजेचे आहे यावर COP26 मध्ये भर देण्यात आला. त्यांच्या व्यापक पुरवठा साखळीत पूर्ण दृश्यमानता आल्यावरच हे शक्य होऊ शकेल. सुदैवाने, आपल्याकडे तांत्रिक साह्य उपलब्ध आहे. सेराईमध्ये आम्ही प्लग-अॅण्ड-प्ले व्यासपीठ उभारले आहे. यात सर्व पर्याय एकत्रित करण्यात आले आहेत. याचा अर्थ अमलबजावणी चटकन होईल, त्यासाठीचा खर्च फार कमी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातून एक असे व्यासपीठ उपलब्ध होईल जे व्यवसायासोबतच विविध वापरांसाठी सहज अधिक व्यापक करता येईल.”
या अहवालानुसार, अपीरल कंपन्यांना स्पर्धात्मक लाभ निसटू द्यायचे नसतील तर ट्रान्सपरन्सी साधनांमधील गुंतवणूक हा फार महत्त्वाचा मुद्दा ठरतो. पुढील मार्गक्रमणासाठी माहितीतील सातत्य आणि दर्जा यासंदर्भातील अडथळ्यांवर या क्षेत्राला मात करावी लागेल.



