महिंद्राने XUV300 मध्ये सादर केले नवे नावीन्यपूर्ण ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी)

Jul 6, 2019

मुंबई, : महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम) या 20.7 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाच्या कंपनीने XUV300 या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्हीची नवी नावीन्यपूर्ण ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी) आवृत्ती आज दाखल केली. ऑटोशिफ्ट तंत्रज्ञान असणारे हे एएमटी W8 डिझेल प्रकारात व त्याच्या ऑप्शनल पॅक W8(O) मध्ये, मॅन्युअल व्हर्जनपेक्षा अतिरिक्त 55,000 रुपयांमध्ये मिळेल. ही आवृत्ती डिस्प्ले, टेस्ट ड्राइव्ह व तातडीने डिलेव्हरी यासाठी सर्व महिंद्रा डीलरशिपमध्ये आजपासून उपलब्ध आहे. XUV300 चा हा नवा प्रकार तीन रंगांमध्ये मिळेल – पर्ल व्हाइट, अॅक्वामरिन व रेड रेज. इटलीतील ऑटोमिटिव्ह तज्ज्ञ मरेलीचे इंजिनीअरिंग असणाऱ्या XUV300 ऑटोशिफ्ट तंत्रज्ञानामुळे या श्रेणीतील आघाडीचा 300 Nm टॉर्क दिला जातो. इलेक्ट्रिक व्हेरिएबल जॉमेट्री टर्बोचार्जर असणारे 1.5L टर्बो डिझेल इंजिन 85.8KW (116.6 PS) पॉवर देते, वेग पटकन वाढवण्यासाठी व ओव्हरटेकिंग करण्यासाठी ऑटोमॅटिक पद्धतीने गिअर बदलले जातात. वाहतुकीमध्ये थांबणे-जाणे सातत्याने करावे लागत असल्याने त्यासाठी असलेली ऑटोमॅटिक सोय यामध्ये असल्याने, तंत्रज्ञानातील प्रगतीचा समावेश असणारी एएमटी आवृत्ती विशेषतः शहरी ग्राहकांना आणि महिला व तरुण या उदयोन्मुख श्रेणीला आवडेल. आवश्यक असलेली सर्व सोय यामध्ये आहे. XUV300 ऑटोशिफ्टबद्दल बोलताना, एमअँडएमच्या ऑटोमोटिव्ह विभागाच्या सेल्स व मार्केटिंगचे प्रमुख विजय राम नाकरा यांनी सांगितले, “महिंद्रामध्ये, आम्ही सर्व ग्राहकांना प्रगत व सहजशक्य तंत्रज्ञान देण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. सुलभ ड्रायव्हिंग व उत्तम कामगिरी यांची सांगड घालण्यासाठी XUV300 मध्ये ऑटोशिफ्टचा समावेश करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये दाखल केल्यापासून मॅन्युअल आवृत्तीला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने, XUV300 ऑटोशिफ्टही पसंती मिळवेल व आमच्यासाठी बाजार आणखी विस्तारेल, असा विश्वास आहे.” 

XUV300 ऑटोशिफ्टमध्ये पुढील आधुनिक वैशिष्ट्ये आहेत:

  • ऑटो व मॅन्युअल मोड: दोन मोड्समध्ये उपलब्ध, ऑटो मोडमध्ये इंधनाची बचत होते व मॅन्युअल मोडमध्ये उत्तम कामगिरी करते. 
  • व्हेइकल क्रीप: पहिल्या व रिव्हर्स गिअरवर थ्रॉटल इनपुट न देता गाडी हलवता येऊ शकते, जेणे करून शहराती वाहतूक कोंडीमध्ये सहजरित्या गाडी चालवता येते. 
  • इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल: चढ चढत असताना गाडी मागे येऊ नये, यासाठी XUV300 मध्ये हिल स्टार्ट असिस्ट तंत्रज्ञान आहे 
  • किक-डाउन शिफ्ट्स, डाउन-हिल मोड व अँटि-इंजिन स्टॉल: ओव्हरटेक करत असताना किंवा पटकन वेग वाढवण्यासाठी जास्तीत जास्त पॉवर किंवा टॉर्क देण्यासाठी आपोआप गिअर बदलला जातो. 
  • ड्राइव्ह अँड रिव्हर्स लॉक आउट: या सुरक्षेच्या वैशिष्ट्यामुळे, वेग प्रति तास 5 किमीपर्यंत कमी झाल्याशिवाय रिव्हर्स व ड्राइव्ह मोड यामध्ये अचानक बदल केला जात नाही.
  • दार उघडल्यावर क्रीप डिसेबल: या सुरक्षेच्या वैशिष्ट्यामुळे, दार उघडे असल्यास वाहन हलत नाही. 
  • गिअर डिस्प्लेसह ड्रायव्हर इन्फर्मेशन सिस्टीम: सध्याचा गिअर, ड्रायव्हिंग मोड अशी वाहनाविषयीची माहिती व महत्त्वाचे अलर्ट ड्रायव्हर इन्फर्मेशन सिस्टीमवर मिळतात.
  •  

XUV300 विषयी

XUV300 मध्ये चित्त्यापासून प्रेरित डिझाइन व उल्लेखनीय कामगिरी यांची अप्रतिम सांगड घातली आहे. सातत्यपूर्ण टॉर्क व सहजपणे गाडी चालवण्यासाठी तत्पर कामगिरी ही वैशिष्ट्ये असणाऱ्या या एसयूव्हीमध्ये बसल्यावर तिचे वेगळेपण लक्षात येते. ही सर्व वैशिष्ट्ये, तसेच या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट सुरक्षा व तंत्रज्ञान वैशिष्ट्ये यांचा समावेश असल्याने ही अतिशय थरारक व आकर्षक एसयूव्ही ठरणार आहे. XUV300 ची या श्रेणीतील सर्वोत्तम सुरक्षा वैशिष्ट्ये, धमाल देईल अशी कामगिरी, या श्रेणीतील पहिलीवहिली हाय-टेक वैशिष्ट्ये, गाडी चालवण्यासाठी सोयीस्कर वैशिष्ट्ये व आरामदायीपणा, यामुळे ही गाडी आकर्षक व सर्वसमावेशक ठरते. 

XUV300 ने सांगयोंग तिवोली या जगभर यशस्वी असणाऱ्या उत्पादनाबरोबर व्यासपीठ शेअर केले आहे. या उत्पादनाने 2015 मध्ये दाखल झाल्यापासून 50 हून अधिक देशांत 2.6 लाखांहून अधिक युनिटची विक्री केली आहे. तिवोलीने सुरक्षा व अर्गोनॉमिक पुरस्कार मिळवले असून त्यामध्ये 2015 KNCAP (कोरिअन न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅम) कडून ग्रेड 1 सुरक्षा पुरस्कार, ऑटोमोटिव्ह सेफ्टी टेस्ट यांचा समावेश आहे.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News