आज आपण ज्योतिष मधील अत्यंत महत्वाचे शीघ्र असरदायी रत्न खूनी नीलमची माहिती जाणून घेणार आहोत.म्हणतात की हे रत्न खुप धोकेदायक असून योग्य अनुकूल व्यक्तीने धारण नाही केले तर त्याचे नुकसान जातकाला मोठया प्रमाणात होते. म्हणून बरेच लोक केवळ नाव ऐकूनच याचे धारण करण्याचे टाळतात परंतु तसे नाही. खूनी नीलम कोणी घालावे, काय आहे खुनी निलम बाबत माहिती जाणून घेऊया.
काय आहे खूनी नीलम ?
नीलम रत्नांमध्ये सुध्दा खुप प्रकार आहे.जे रत्न निळया रंगाचे असतात ते नीलम रत्नाच्या श्रेणीत येतात. तर पिवळे रंगाचे रत्न पुखराज म्हणून ओळखले जातात पण काही नीलम मिक्स रंगात आढळतात.ज्यात मिक्स पिवळा आणि निळा रंगाचे स्टोन पितांबर म्हणून ओळखले जातात.अशाच प्रकारात नीळा आणि लाल रंग एकत्र असलेले किंवा नीळया रंगात लालसर पटटा किंवा छटा दिसतो तो रत्न खूनी निलम म्हणून ओळखला जातो. रत्नांमध्ये ग्रहांचे नकारात्मक प्रभाव थांबविण्याची ताकद असते.पण कोणता रत्न,कोणत्या ग्रहाला नियंत्रित करतो हे सर्व अवलंबून असते त्या रत्नाच्या रंगावर. जेव्हा एकाच रत्नामध्ये एक किंवा अधिक रंगाची छटा नैसर्गिक निर्माण होते तेव्हा त्या रत्नाचे बळ
आणि प्रभाव जास्त असतो. खूनी नीलम मध्ये लाल आणि निळा रंगाचे प्रतिनिधीत्व असल्यामुळे निश्चित लाल रंग मंगळाचे तर नीळा रंग शनिचा असल्यामुळे दोन्ही ग्रहांचे प्रभाव त्या रत्नावर दिसून येतो.
ज्या रत्नाचा रंग जेवढा गर्द असतो तेवढा तो प्रभावी असतो. खूनी निलम रत्न मंगळ आणि शनि दोन ग्रहांचे प्रभाव बघायला मिळतात.खरोखर हा रत्न चुकीच्या व्यक्तीने धारण केलेल तर धोकेदायक असू शकतो. कारण मंगळ आणि शनि दोन्ही पाप ग्रह असून एकमेकांचे नैसर्गिक शुत्र आहे. त्यामुळे हया दोन्ही ग्रहांचे वाईट परिणाम विस्फोट स्वरुपात असतात.म्हणून याला खूनी नीलम असे नाव देण्यात आले असावे.
रत्न ओळखावे कसे ?
आता जाणून घेऊया खूनी नीलम ओळखावे कसे.कोणत्याही प्रकारचा नीलम धारण करण्यासाठी कुंडलीमध्ये शनिची स्थितीत शुभ आहे की नाही हे जाणून घेणे महत्वाचे आहे.तर दुस-या स्थितीत कुंडलीत मंगळाचे बळ कमी असेल तर पोवळा रत्न घालणे सोयीचे ठरते.कुंडलीत शक्यातो शनि हा मित्र ग्रह असेल तर मंगळ कुंडलीत शत्रु स्थितीत असतो किंवा दुस-या ठिकाणी जर मंगळ मित्र ग्रह स्थितीत असेल तर खुप कमी ठिकाणी शनि पण मित्र ग्रह राहू शकतो. दोन्ही ग्रह नैसर्गिक शत्रु आहे. परंतु जर आपली राशी मकर लग्न आहे आणि चंद्र राशी व्रश्चिक आहे तर दोन्ही ग्रह आपल्यासाठी मित्रवत राहिल.
खूनी नीलम कोणी धारण करावा ?
1) जन्मकुंडलीत व्रश्चिक लग्न आणि चंद्र रास मकर असेल मंगळ सहावे किंवा बारावे स्थानी पाहिजे.
2) मेष राशी आणि मकर लग्नात शनि असून मंगळाची महादशा सुरु पाहिजे.
3) व्रषभ लग्न आणि चंद्र राशी व्रश्चिक पाहिजे किंवा व्रषभ लग्न आणि चंद्र राशी मेष पाहिजे.
4) कुंभ लग्न आणि चंद्र राशी मेष किंवा मेष लग्न आणि चंद्र राशी कुंभ पाहिजे.
5) मकर लग्न आणि चंद्र राशी मकर असेल परंतु मंगळ 4,8,12 व्या स्थानी असावे परंतु शनि हया स्थानात नसावे.
कोणत्या व्यक्तींना खूनी नीलम धारण करण्याची मनाई आहे ?
1) कर्क आणि सिंह लग्न किंवा राशीवाल्यांनी हा रत्न धारण नाही करावा.
2) कुंडलीत शनिची स्थिती 6,8,12 स्थानात असेल तर रत्न धारणाची मनाई आहे.
3) जर आपल्या जन्मकुंडलीत मंगळाची स्थिती 4,8,12 घरात असेल तर रत्न धारणाची मनाई आहे.
खूनी नीलमचे फायदे
1.नीलम पेक्षा से 50% अधिक प्रभावी
2.भिकारा-याला करोडपती तर करोडपतीला भिकारी बनविण्याचे ताकद.
3. जे लोक नेहमी अपयशी ठरत आलेले, कर्ज बाजारी, नेहमी आजारी असणारे व्यक्ती खुनी निलम धारण करण्याची स्थिती जर चांगली असेल तर कमी कालावधीत प्रगती करतात.


