नाशिक : नाशिकच्या “फलज्योतिष प्रबोधिनी” या संस्थेचे अध्यक्ष श्री.ज्यो.शास्त्री शरद माजगांवकर यांची ”ज्योतिष जीवनरत्न” या पुरस्काराने निवड झाली असून येत्या शनिवारी दिनांक २० मे २०२३ रोजी दुपारी १ ते ३ या वेळत डॉ.कृतकोटी सभागृह,शंकराचार्य संकुल,गंगापुर रोड ,नाशिक येथील कार्यक्रमात त्यांना सन्मान व पदवीदान करुन सन्मानित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास प्रमुख आतिथी म्हणून श्री.गोविंदराव यार्दी, संस्कार आयाम प्रमुख,रा स्व संघ जन कल्याण समिती,महाराष्ट्र प्रांत व श्री अनिल चांदवडकर, अध्यक्ष,महाराष्ट्र ज्योतिष परिषद म्हणून लाभणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने ज्योतिष विदयार्थी, अभ्यासक ,शिक्षक व शास्त्रावर प्रेम करणारे यांनी उपस्थिती लावून ज्योतिषी ज्ञानाबरोबर कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
ज्यो.शास्त्री श्री.शरद भगवंत माजगांवकर यांचा अल्प परिचय
पुण्याच्या इंजिनिअरींग कॉलेज मधून १९६० मध्ये स्थापत्य अभियंता झाले. ३३ वर्षे महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात सेवा करुन १९९४ मध्ये उपअभियंता म्हणून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही ज्योतिषशास्त्राची आवड जोपासली. ज्यो.शास्त्राच्या अभ्यासात सातत्य ठेऊन ज्यो.शास्त्री पदवी प्राप्त केली व ज्योतिष अध्यापनाचे कार्य सुरु केले. सातत्याने भाग्यनिर्णय मासिकातून भविष्यलेखन तर पुण्याच्याज्योतिष ओनामा,ज्योतिषज्ञान,मणिपुष्पक इ. ज्योतिष विषयक मासिकातून अभ्यास प्रचूर,संशोधनात्मक लेख प्रसिध्द झाले आहेत..या लेखांची संख्या साठपेक्षा जास्त आहे.मेदिनिय या विषयातही त्यांची रुचि व सखोल अभ्यास आहे. अनेक ज्योतिष विषयक अधिवेशनातून विविध विषयावर व्याख्याने दिली आहेत. त्यांची परमेश्वरावर व उपासनेला दृढ चालविण्यावर पूर्ण श्रध्दा आहे.त्यांनी ज्योतिष शास्त्रात अंधश्रध्देला कधीही थारा दिला नाही. त्यांना या कार्यात पत्नी सौ.नलिनी यांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे.
सन २०१० पासून मा.माजगांवकर सर नाशिकच्या “फलज्योतिष प्रबोधिनी” या संस्थेच्या अध्यक्ष पदावरुन ज्योतिषशास्त्रात अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची या क्षेत्रातील नि:स्पृह व निरलससेवा पाहून त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून ज्योतिष शास्त्रात प्रतिष्ठीत असणारा स्वर्गीय पं.श्रीकृष्ण जकातदार यांच्या स्मृतिनिमित्त देण्यात येणारा एकोणीसावा ”मंदाश्री पुरस्कार” त्यांना सन २०१८ मध्ये
पुणे येथे मिळाला आहे. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून लोककल्याणाचे कार्य अखेरपर्यंत करत रहाण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या यशात पत्नी सौ.नलिनी,मुलगा,सुन व नातू यांचा मोठा वाटा आहे.



