ज्योतिष शास्त्रात अशुभ ग्रह व त्यांची वाईट द्रष्टी पासून बचाव करण्यासाठी हवन शांती, कवचधारण, रत्न धारण करण्याबरोबर रुद्राक्ष धारण केले जाते. जाणून घेऊया रुद्राक्ष घातल्याचे फायदे –
1. सुर्य ग्रह – सुर्य सर्व ग्रहांचा राजा असल्यामुळे कुंडलीत सुर्य नेहमी बली असणे आवश्यक आहे. सुर्य कुंडलीत आत्माचा कारक आहे. सूर्य ग्रहांचे चांगले परिणाम प्राप्त करुन घेण्यासाठी अथवा ज्या जातकांच्या कुंडलीमध्ये सुर्य म्रत अवस्थेत किंवा पडित असेल अशा जातकांना एक मुखी रुद्राक्ष धारण केल्यास लाभ मिळतो.
2. चंद्र ग्रह – चंद्र म्हणजे मन आणि पाणी यांचा अधिपती. सुर्य ग्रहांनंतर कुंडलीत दुसरा महत्वाचा चंद्रग्रह आहे. व्यक्तीचे मन नेहमी चंचल असते. मनशांतीसाठी कुंडलीत चंद्राची स्थिती बघितली जाते. कुंडलीत चंद्र जर कमजोर अथवा पीडित असेल तर त्यावर नियंत्रण मिळविण्याकामी दो मुखी रुद्राक्ष धारण करण्याचे सांगितले जाते.
3. मंगळ ग्रह – मंगळ ग्रह कुंडलीत पराक्रमाचे कारक म्हणून बघितले जाते. कर्माला पराक्रमाची जोड नसली तर ते कर्म फलित होण्यास अडचणी निर्माण होतात. मंगळ कुंडलीत कमजोर अथवा म्रत अवस्थेत असेल अशा जातकांनी तीन मुखी किंवा अकरा मुखी रुद्राक्ष धारण केल्यास लाभ मिळतो.
4. बुध ग्रह – ग्रहमंडलात बुधग्रहाला कुमार म्हणून संबोधले.त्वचेचा व वाणीचा अधिपती म्हणून यांकडे बघितले जाते. बुध ग्रह कुंडलित पडित अथवा कमजोर अवस्थेत असेल तर व्यक्तीला वाणीची समस्या निर्माण होते. हुशार असून सुध्दा तो जगापुढे आपले वाक प्रदर्शन करु शकत नाही. अशा वेळी बुध ग्रह बली करणे गरजेचे असते. बुध ग्रहाला बळ देण्यासाठी चार मुखी रुद्राक्ष धारण करण्यास सांगितले जाते.
5. गुरु ग्रह – आपल्या सर्वांच माहिती आहे गुरु ग्रह शुभ ग्रह मानले जाते. व्यक्तीचे ज्ञान, कर्म, वैवाहिक जीवन, सुख संपन्नता गुरु ग्रहांवरुन बघितली जाते. कुंडलीत गुरु ग्रह कमजोर अथवा पडित असेल तर त्याला ठिक करण्यासाठी आपण पाच मुखी किंवा दहा मुखी रुद्राक्ष धारण करने आवश्यक आहे.
6. शुक्र ग्रह – शुक्र ऐश्वर्य, भोग, आराम,संतान, रिती सुख आदीचा कारक आहे. खराब अवस्थेत असेल तर आदी समस्यांचा सामना जातकाला करावा लागतो.अनिष्टतता कमी करण्यासाठी व शुक्र ग्रहाचे चांगले लाभ घेण्यासाठी सहा मुखी अथवा तेरा मुखी रुद्राक्ष घालण्याचे सांगितले आहे.
7. शनि ग्रह – शनि ग्रह न्यायाची देवता. साढेसातीत केलेल्या कर्मांचा हिसाब शनिदेव घेत असतात अशी लोकांची धारण आहे. शनिला तीन द्रष्टि प्राप्त आहे. यांची नजर कुंडलीतील ज्या घरांवर पडते अशा ठिकाणी अशुभ प्रभाव जातकाला भोगावे लागतात. यावर उपाय म्हणून शनिदेवाला सौम्य करण्यासाठी सात मुखी किंवा चौदा मुखी रुद्राक्ष धारण केल्यास लाभ मिळतो.
8. राहु ग्रह – राहू छाया ग्रह म्हणून बघितले जाते. कुंडलित अशुभ अवस्थेत असेल तर त्यावर उपाय म्हणून आठ मुखी रुद्राक्ष धारण केल्यास लाभ मिळतो.
9. केतु ग्रह – केतु शुभ ग्रह आहे पंरतु राहुच्या नेहमी समोर असल्यामुळे अशु्भ अवस्थेत विछेदात्मक स्थिती निर्माण करुन जातकाला अनेक त्रास सहन करावा लागतात.यावर उपाय म्हणून नऊ मुखी रुद्राक्ष धारण करण्यास सांगितले जाते.
कुंडलीतील अशुभ योगाची तीव्रता कमी करण्यासाठी खालील रुद्राक्ष धारण करावे
ज्यो.शास्त्री शरद माजगांवकर यांना ”ज्योतिष जीवनरत्न” पुरस्कार
नाशिक : नाशिकच्या "फलज्योतिष प्रबोधिनी'' या संस्थेचे अध्यक्ष श्री.ज्यो.शास्त्री शरद माजगांवकर...



