एफएमसीजी, पॅकेजिंग, बांधकाम, शिक्षण, आदी अनेक वैविध्यपूर्ण क्षेत्रांमध्ये 60 वर्षांची प्रदीर्घ वाटचाल केलेल्या, पुण्यातील पारख ग्रुपने ‘सम्राट’ या राष्ट्रीय पातळीवरील पिठांच्या ब्रँडच्या माध्यमातून लक्ष वेधून घेतले आहे. पिठांच्या क्षेत्रात या ब्रँडचा मोठ्ठा प्रभाव असून श्रेष्ठ दर्जा, उत्पादनाचे स्विस तंत्रज्ञान, जागतिक दर्जाची स्पर्शविरहित पॅकिंग यंत्रणा, सर्वात कठोर गुणवत्ता चाचण्या आणि आरोग्यावर सर्वांगीण भर देणारी टीम ह्यामुळे कोट्यवधी भारतीयांची पसंती त्याला लाभली आहे. आटा, बेसन, रवा, मैदा, सूजी आणि दलिया यांच्यासारख्या दैनंदिन गरजेच्या खाद्यवस्तूंच्या व्यापक मालिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘सम्राट’ ने आता मेगास्टार आयकॉन आणि दोन मुलांची आई असलेल्या ‘करीना कपूर खान’ यांना ब्रँड अँबॅसेडर बनवल्याची घोषणा केली आहे.
अनेक राज्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या या राष्ट्रीय पातळीवरील ब्रँडचे भक्कम वितरण जाळे असून ते अनेक पिढ्यांच्या वितरक माध्यमातून हजारो किरकोळ विक्रेत्यांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवत आहेत. ‘ग्रोइंग टुगेदर’ हे पारख ग्रूपचे घोषवाक्य आहे, त्या धोरणानेच चालणाऱ्या वितरण साखळीच्या संयुक्त प्रयत्नांनीच दर्जाच्या बाबतीत अजिबात तडजोड न करणारा आणि विक्री व वितरणाचा मागोवा घेणारा ब्रँड पुढे जात आहे. सुनियोजित यंत्रणेच्या बळावर या व्यवसायातील इतर कोणाच्याही आधी रिटेल दुकानांमध्ये संपताक्षणी लगेच पुन्हा पोहोचवणारा ब्रँड प्रभावशाली पद्धतीने उभा राहिला आहे. सर्वसामान्य ग्राहकांना सेवा देण्याबरोबरच ‘सम्राट’ हे भारतातील प्रचंड आकाराच्या ‘होरेका’ (हॉटेल, रेस्तराँ, कॅफे ) बाजारपेठेतही मोठे पुरवठादार आहेत.
करीना कपूर खान यांना ब्रँड अँबॅसेडर नेमण्याच्या घोषणेबद्दल संचालक श्री. मयंक पारख म्हणाले, “पारख गू्रपमध्ये आमचे सर्व प्रयत्न सर्वोत्तम कच्चा माल मिळवून आरोग्यावर सर्वंकष लक्ष ठेवून उच्च दर्जाची उत्पादने निर्माण करण्यावर केंद्रित असतात. महामारीच्या काळात आपणा सर्वांना आपल्या घरातही आरोग्यदायी स्वच्छता राखण्याचे महत्व कळले आणि देशातील महिलांनी मोठ्या संख्येने पारंपारिक गिरणीत दळलेले पीठ खरेदी करण्याऐवजी ‘सम्राट’ आटा खरेदी करण्याचा निर्णय घेतला याचा आम्हाला अभिमान वाटतो. कच्चा माल निवडण्यातील आमची व्यावसायिक तज्ञता, स्वच्छता आणि स्पर्शविरहित उत्पादन व पॅकिंग प्रक्रिया यांच्यावर या महिलांनी विश्वास ठेवला. घरगुती अन्नपदार्थ आरोग्यदायी राखण्यासंदर्भातील संदेश अधिकाधिक पुढे पोहोचवण्यासाठी करीना कपूर खान यांच्याहून योग्य व्यक्ती कोण मिळाली असती? आज दोन मुलांची आई असलेल्या करीना यांनी मुलांच्या संगोपनाच्या संदर्भातील सर्वच विषयांत उच्च मापदंड प्रस्थापित केले असून वर्क-लाइफ बॅलन्स कसा साधावा, याचे त्या उत्तम उदाहरण आहेत. स्वत:चे आणि आपल्या कुटुंबियांचे आरोग्य उत्तम राखण्याच्या बाबतीत आमचे आणि त्यांचे विचार एकच आहेत आणि आम्ही त्यांच्या सोबतीने हे विचार ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकू, अशी आशा आहे.”
‘सम्राट’ आटा अँड फ्लोअर्स ब्रँड अँबॅसेडर घोषित झाल्याबद्दल करीना कपूर खान म्हणाल्या, ” ‘सम्राट’ हे या उद्योगातील एक सर्वात मोठे नाव असून त्यांची उत्पादन मालिका शुद्धतेसाठी नावाजली जाते. त्यांचा स्वच्छता आणि आरोग्यपूर्णता यांच्यावरील भर आणि आपली अन्नाची आवड पूर्तता करण्यात कधीही कमी न पडणारी अप्रतिम चव याचा हा परिणाम आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “आमचे कपूर खानदान खवय्ये म्हणून प्रसिद्ध आहे आणि मीही तशीच चवीने खाणारी आहे. कारकीर्दीतली उज्वल कामगिरी असो, कौटुंबिक मेजवानी असो की उत्सव असोत, सगळ्यांची सुरुवात घरी बनवलेल्या चविष्ट पक्वान्नांनी होते. अनेक दशकांपासून आपल्या आयुष्याचा आंतरिक हिस्सा असलेल्या ‘सम्राट’ ब्रँडशी जोडली गेल्याने मी फारच उत्साहित झाले आहे.”
पारख ग्रूप टप्प्याटप्प्याने करीना कपूर खान यांचा सहभाग असलेले ब्रँड कॅम्पेन सादर करणार असून त्यात करीना या ग्राहकांबरोबर अन्नपदाथाची आरोग्यपूर्णता या विषयावर बोलताना दिसतील आणि ‘स्वाद और सेहत का वादा’ करणाऱ्या विश्वासपात्र ‘सम्राट’ आटाकडे वळण्याचा सल्ला देताना दिसतील. त्याचबरोबर लोकप्रिय ‘सम्राट’ बेसनची स्वतंत्र जाहिरात असेल, तिच्यात आपल्या सग्यासोयऱ्यांबरोबरच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी घरात बनवल्या जाणाऱ्या स्वादिष्ट पक्वान्नांचा समावेश असेल. कारण, ‘सम्राट’ बेसन म्हणजे ‘स्वाद का सेलिब्रेशन’!




