महाराष्ट्रातील ईएमटी मोबाइल अॅप्लीकेशनसाठी युजरवर्गामध्ये ३० टक्क्यांपर्यंत वाढ
नाशिक : एडलवाइज ब्रोकिंग लिमिटेडने आज घोषणा केली की, कंपनीने त्यांचे एडलवाइज मोबाइल ट्रेडिंग (ईएमटी) अॅप मराठीमध्ये लाँच केले आहे. हे अॅप इंग्रजी, हिंदी, गुजराती व तमिळ या भाषांमध्ये देखील उपलब्ध आहे.
एडलवाइज मोबाइल ट्रेडर (ईएमटी) अॅप्लीकेशनने १ दशलक्षहून अधिक डाऊनलोड्सचा टप्पा पार केला. आमच्या अंतर्गत विश्लेषणानुसार महाराष्ट्रातील मोबाइल गुंतवणूकदारांमध्ये वर्षानुवर्षे ३९ टक्क्यांची सातत्यपूर्ण वाढ दिसण्यात आली. अधिक पुढे जात एडलवाइजचा महाराष्ट्रातील युजरवर्गामध्ये ५० टक्के वाढ करण्याचा मनसुबा आहे.
कंपनीच्या विकासाचे श्रेय प्रामुख्याने सानुकूल व नि:पक्षपाती संशोधनाला जाते. या संशोधनाला आर्थिक बाजारपेठेमध्ये सुलभ गुंतवणूक व व्यापाराची सुविधा देण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या युजर अनुकूल व प्रगत तंत्रज्ञान व्यासपीठांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना देण्यात आलेल्या शिफारशींचे पाठबळ आहे.
या घोषणेबाबत बोलताना श्री. राहुल जैन, अध्यक्ष व प्रमुख – वैयक्तिक संपत्ती सल्लागार, एडलवाईस वेल्थ मॅनेजमेंट, म्हणाले, ”भारतामध्ये होत असलेले विद्यमान डिजिटल परिवर्तन मालमत्ता व्यवस्थापन सल्लागारांसाठी गुंतवणूकदारांना सुलभ नवोन्मेष्कारी गुंतवणूक व्यासपीठांची सुविधा देत त्यांच्या बदलत्या गरजा समजून घेण्याची आणि त्यानुसार कार्य करण्याची सर्वोत्तम संधी आहे. मराठीमध्ये लाँच करण्यात आलेल्या आमच्या ईएमटी अॅपचा आम्ही कोणत्याही भाषेच्या अडथळ्यांशिवाय गुंतवणूक करू पाहणा-या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला समान संधी देत आहोत, याबाबत खात्री घेण्याचा मनसुबा आहे.”
एडलवाइज मोबाइल ट्रेडर (ईएमटी) बाबत अद्ययावत माहिती
लक्षात घेण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील ईएमटी मोबाइल अॅप्लीकेशनसाठी युजरवर्गामध्ये ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. करण्यात आलेल्या अंतर्गत विश्लेषणानुसार २५ ते ४४ वर्षे वयोगटातील मिलेनियल युजर्स अॅप ऑफरिंग्जचा सक्रियपणे वापर करत आहेत, जेथे राष्ट्रीय स्तरावर युजर्सचे प्रमाण ५४ टक्के आहे आणि महाराष्ट्रामध्ये मिलेनियल युजर्सचे प्रमाण ५५ टक्के आहे. आज एडलवाइज मोबाइल ट्रेडर (ईएमटी) देशातील सर्वाधिक प्रमाणित स्टॉक ट्रेडिंग अॅप्सपैकी एक अॅप आहे आणि या अॅपने भारतभरात १ दशलक्षहून अधिक डाऊनलोड्स टप्पा पार केला आहे.
एडलवाइज मोबाइल ट्रेडर (ईएमटी) मधील इतर रोचक वैशिष्ट्ये
ग्राहक गरजा लक्षात घेत ईएमटी वैयक्तिकृत मल्टी-युजर अनुकूल अॅप्लीकेशन देते, जे सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरू शकते. ईएमटीमधील इतर काही अद्वितीय वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
एडलवाइजच्या ग्राहकांसाठी, तसेच ग्राहक नसलेल्यांसाठी इक्विटी व एनसीडीमध्ये पेपरलेस आयपीओ सुविधा.
स्क्रीनर्स, जे युजर्सना विशिष्ट परिमाणवाचक किंवा गुणात्मक निकषांनुसार स्टॉकमध्ये सुधारणा करण्याची सुविधा देतात. विशिष्ट पूर्व-परिभाषित मेट्रिक्सवर आधारित स्टॉकसंदर्भात माहिती मिळवण्यासाठी व्यापारी समुदायाकडून यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
बिल्ट-इन वैयक्तिक सुविधेसह गतीशील लाइव्ह न्यूज विभाग, जो युजर्सना कंपनीची वॉचलिस्ट किंवा पोर्टफोलिओवर परिणाम करणारे निकाल, घडामोडी, घटनांबाबत अद्ययावत माहिती देते.
प्रगत बाजारपेठ माहिती, ऑप्शन चेन, प्रगत चार्टिंग, इन-बिल्ट रिसर्च कॉल्स आणि सुलभ लॉगइन व ऑर्डर रिप्लेसमेंट अनुभव अशा इतर नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह ईएमटी स्पर्धात्मक लाभ आहे, ज्याचा व्यापारी व गुंतवणूकदार शोध घेत आहे.
एकाच अॅपअंतर्गत इक्विटी, म्युच्युअल फंड्स, एनसीटी, ईटीएफ, फ्यूचर्स व ऑप्शन्स, करन्सी व कमोडिटीजमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा देणारे ईएमटी युजर्सच्या सर्व व्यापार व गुंतवणूक गरजांसाठी एक थांबा सोल्यूशन आहे.




