ब्रिटानिया गुड डे च्‍या प्रत्‍येक पॅकवरील बिस्किट डिझाइनवर विविध स्‍माइल्‍स झळकणार

Dec 20, 2021

नाशिक : ब्रिटानिया गुड डे या शहरी भारताच्‍या सर्वात मोठ्या बिस्किट ब्रॅण्‍डने आज त्‍याच्‍या नवीन ओळखीचे अनावरण केले. ऑल-न्‍यू गुड डे बिस्किट डिझाइनमध्‍ये सर्व प्रकारच्‍या स्‍माइल्‍सचा समावेश असेल- जसे डिंपल पडलेले हास्‍य ते स्मित हास्‍य, खळखळते हास्‍य ते दोन्‍ही गालांवर डिंपल पडलेले हास्‍य. ज्‍यामुळे ग्राहकांना ब्रिटानिया गुड डे च्‍या प्रत्‍येक पॅकमध्‍ये कई स्‍माइल्‍स, नई स्‍माइल्‍स.. अनुभवायला मिळू शकते. ‍
खास लाँच सुरू आहे, जेथे नवीन पॅक्‍स भारताच्‍या कानाकोप-यामधील ४.८ दशलक्षहून अधिक रिटेल आऊटलेट्सपर्यंत पोहोचले आहेत. ब्रॅण्‍डने आपल्‍या नवीन ओळखीची घोषणा करण्‍यासाठी उच्‍चस्‍तरीय मीडिया योजना राबवली आहे. प्रिंट, टीव्‍ही, सोशल मीडिया व आऊटडोअर उपक्रमांच्‍या माध्‍यमातून जाहिरात करण्‍यात येईल. हा अद्वितीय ऑगमेण्‍टेड रिअॅलिटी अनुभव खासकरून ग्राहकांमध्‍ये मोहिमेचा महत्त्वपूर्ण भाग असल्‍याची भावना निर्माण करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.
ऑल-न्‍यू पॅकेजिंग वैविध्‍यपूर्ण स्‍माइल्‍सची संकल्‍पना सादर करते. प्रत्‍येक एसकेयूमध्‍ये पॅकवरील विभिन्‍न स्‍माइल्‍सने भरलेल्‍या डिझाइन्‍स असतील.
ब्रिटानिया गुड डे च्‍या नवीन ओळखीच्‍या लाँचबाबत बोलताना ब्रिटानिया इंडस्‍ट्रीज लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक वरूण बेरी म्‍हणाले, ”दिवस कसाही जात असो लोक नेहमीच ‘गुड डे’चा आस्‍वाद घेत गप्‍पागोष्‍टी करतात ही खूपच उत्‍साहवर्धक बाब आहे. या सार्वत्रिक माहितीमधून आम्‍हाला गुड डे संदर्भात अधिक उत्तम कामगिरी करण्‍यास प्रेरणा मिळते. गुड डे चा मुलभूत विचार नेहमीच आनंद पसरवण्‍याचा राहिला आहे. आज ब्रॅण्‍डने भारतीयांच्‍या विविध स्‍माइल्‍सना दाखवण्‍यासाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे मेकओव्‍हर केले आहे. देशभरातील गुड डे च्‍या प्रत्‍येक पॅकवरील बिस्किट डिझाइनवर विविध स्‍माइल्‍स असतील. आम्‍ही गुड डे च्‍या व्‍यापक व निष्‍ठावान ग्राहकवर्गाच्‍या मोहक हास्‍यांना दिलेली ही सर्वात मोठी मानवंदना आहे. ज्‍यामधून शहरी व ग्रामीण भारतामध्‍ये ब्रॅण्‍डचे यश कायम राहण्‍याची खात्री मिळाली आहे.”
नवीन पॅक गुड डेच्‍या चारही व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये लाँच करण्‍यात येईल – बटर, कॅशू, कॅशू आल्मंड आणि पिस्‍ता बदाम. ५ रूपयांपासून किंमत असलेले नवीन गुड डे पॅक्‍स विविध पॅक आकारांमध्‍ये व किफायतशीर दरांमध्‍ये बाजारात उपलब्‍ध आहेत.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News