नाशिक : किआ कॉरपोरेशनने आज भारतामध्ये जागतिक प्रीमियर कार्यक्रमादरम्यान कॅरेन्सची सुरूवात केली. रिक्रिएशनल व्हेइकल (RV) हे किआचे भारतात बनलेले जागतिक प्रॉडक्ट आहे जे कौटुंबीक प्रवास्यांना अत्याधुनिकता आणि एकाच पॅकेजमध्ये SUV चा स्पोर्टीनेस देते.
आधुनिक भारतीय कुटूंबासाठी डिझाईन केलेली किआ कॅरेन्स ही तीच्या वर्गवारीतील सर्वात लांब व्हीलबेस सह आरामदायी आणि प्रशस्त थ्री-रो सीटर गाडी आहे. या कारमध्ये पहिल्यांदाच भारतामध्ये अती सुरक्षित सुरक्षा पॅकेज आहे जे सर्व ट्रीममध्ये प्रमाणीत आहे ज्यामध्ये सहा एयरबॅग आहेत ज्यामुळे ती भारतामधील सर्वात सुरक्षित गाडी बनली आहे. किआ कॅरेन्स ही कनेक्टेड कार सुद्धा आहे ज्यामध्ये अग्रेसर वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे उद्योगामध्ये नवीन बेंचमार्क निर्माण करते.
किआ कॉरपोरेशनचे अध्यक्ष आणि सीईओ सुंग साँग म्हणाले “तीच्या बोल्ड डिझाइन, अत्याधुनिक फिचर्स, आणि उद्योगातील अग्रेसर सुरक्षा सिस्टीम यांमुळे किआ कॅरेन्स पूर्ण नवीन क्षेत्र निर्माण करण्यासाठी आणि कौटुंबीक गाडीसाठी उदयोगातील बेंचमार्क तयार करण्यासाठी तयार आहे.” ते पुढे म्हणाले, “भारतामध्ये कॅरेन्सची सुरूवात करण्याबद्दल किआ विशेष उत्साही आहे, जेथे नवीन कल्पना आणि नवकल्पकता आकार घेतात. किआ कॅरेन्स आधुनीक कुटूंबांना त्यांच्या दैनंदिन आणि विश्रांती जीवन दोन्हींमध्ये अर्थपूर्ण अनुभव देईल याचा आम्हाला विश्वास आहे.”
किआ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ टी-जिन पार्क म्हणाले, “भारत हा वैवीध्यपूर्ण आहे, आणि येथील लोकांचे प्राधान्य वेगवेगळे आहे. कॅरेन्सचा विकास करत असतांना आम्ही अनलॉक करण्याचा प्रयत्न करतो हा फार आकर्षक दृष्टीक्षेप आहे. ती सुरक्षित आहे, भरपूर फिचर्स त्यामध्ये आहे, डिझाइन उत्तम आहे, आणि आरामदायी आणि क्लासी आहे; तीच्यामध्ये एखाद्या आधुनिक भारतीय कुटूंबाला तीच्या गाडीमध्ये जे काही हवे असते ते सर्वकाही आहे. कॅरेन्स ही सर्वच पैलूने किआ कडून असलेली आणखीन एक वास्तव ग्राहक केंद्रित ऑफर आहे. गाडीची रचना पूर्णपणे कुटूंबासाठी नवक्रांतीक आणि पुनर्परिभाषित पद्धतीने करण्यात आली आहे, ही गाडी म्हणजे आमच्या विवेकी भारतीय ग्राहकांसाठी समर्पीत गेम-चेंजींग प्रॉडक्ट आहे.”
किआ कॅरेन्स 2022 च्या पहिल्या त्रैमासीकात भारतामध्ये तसेच निवडक मार्केटमध्ये उपलब्ध होईल.
ठळक सुत्र
किआ कॅरेन्स, तीच्या बोल्ड डिझाइन आणि अग्रेसर वैशिष्ट्यांसह, प्रेक्षकांवर कायमचा प्रभाव टाकते. त्याची डायनॅमिक आणि ठळक भूमिका तीच्या इंटेरियर डिझाइनमध्ये अष्टपैलुत्वाचा समावेश करताना SUV सारखी रस्त्यावर उपस्थिती देते.
किआ कॅरेन्स 7DCT आणि 6AT सह अनेक ट्रान्समिशन पर्यायांसह पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पॉवर ट्रेन्स ऑफर करून आपल्या ग्राहकांना उत्साहित करते. आश्रयदात्यांसाठी जीवन सोपे बनवणाऱ्या अनेक व्यावहारिक वैशिष्ट्यांसह ही कार सुसज्ज आहे. नेक्स्ट जनरेशन किआ कनेक्ट ऍपसारखे कनेक्टिव्हीटी फिचर्स, कसेही बसता येणारा पर्याय, स्लाइडींग प्रकारचा सीट अंडर ट्रे, रिट्रॅक्टेबल सीटबॅक टेबल, रियर डोअर स्पॉट लँप आणि थर्ड रो मध्ये बॉटल आणि गॅजेट होल्डर यांसारखे फिचर्स यामुळे कॅरेन्स अक्षरशः ऑटोमोटिव्ह व्यावहारिकता पुन्हा परिभाषित करते.
किआ कॅरेन्समध्ये विविध अग्रेसर फिचर्स आहेत, ज्यामुळे ती भारतामधील विद्यमान कौटुंबिक प्रवास्यांना एक धार देते. शिवाय, कार थ्री-रो सीटर क्षेत्रामध्ये खूप आवश्यक उत्साह आणते. यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे:
१. नेक्स्ट जनरेशन किआ कनेक्टसह 26.03 सेमी (10.25”) एचडी टचस्क्रीन नेव्हीगेशन
२. BOSE प्रीमियम साऊंड सिस्टीम 8 स्पीकर सह
३. केबिन सराऊंड 64 कलर एम्बीएन्ट मूड लाइटींग
४. विषाणू आणि जीवाणूंपासून संरक्षणासह स्मार्ट शुद्ध एयर प्युरीफायर
५. अती सुरक्षित सुरक्षा प्रमाणीत पॅकेज – (6 एयरबॅग, ESC+VSM+HAC+DBC+ABS+BAS, सर्व ट्रीममध्ये सर्व प्रमाणीत व्हील डिस्क ब्रेक्स)
६. व्हेंटीलेटेड फ्रंट सीट
७. एम्बीएन्ट मूड लाइटींग सह लिंक असलेले मल्टी ड्राईव्ह मोड्स (स्पोर्ट/इको/नॉर्मल)
८. दुसऱ्या ओळीतील सीट “एक टच सोपे इलेक्ट्रीक टंबल ”
९. स्काय लाईट सनरूफ
१०. वर्गवारीतील सर्वात लांब व्हीलबेस असलेली मोठी केबीन स्पेस




