ऑडी अप्रूव्‍ह प्‍लसचे नाशिकमध्‍ये उद्घाटन

Dec 23, 2021

नाशिक : ऑडी या जर्मन लग्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज नाशिकमध्‍ये त्‍यांचे अकरावे पूर्व-मालकीचे कार केंद्र – ऑडी अप्रूव्‍ह प्लस नाशिक, लोकमत भवन, प्लॉट क्र. बी-३, एमआयडीसी अंबड, मुंबई- आग्रा महामार्ग नाशिक- ४२२०१० येथे उद्घाटन केले. ५,८०० चौरस फूट जागेवर विस्‍तारित या अत्‍याधुनिक शोरूममध्‍ये ८ कार्सचे प्रदर्शन दाखवण्‍याची क्षमता आहे. नवीन शोरूम नाशिकमधील, तसेच आसपासच्‍या परिसरांमधील पूर्व-मालकीच्‍या लग्‍झरी कार्ससाठी वाढत्‍या मागणीची पूर्तता करेल.
ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, नाशिक हे महत्त्वपूर्ण शहर आहे आणि अधिकाधिक लोक अद्ययावत ड्रायव्हिंग अनुभव घेऊ पाहत असल्‍यामुळे पूर्व-मालकीच्‍या लग्‍झरी कार्ससाठी मागणीमध्‍ये स्थिर गतीने वाढ होत आहे. या नवीन केंद्राचे उद्घाटन प्रांतामधील वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍याच्‍या आमच्‍या योजनेशी संलग्‍न आहे. हे आमचे अकारावे पूर्व-मालकीचे कार केंद्र आहे. मला सांगताना आनंद होत आहे की, आम्‍ही लवकरच अधिकाधिक शहरांमध्‍ये विस्‍तार करणार आहोत.
ऑडी अप्रूव्‍ह प्‍लस शोरूम्‍समधील वाहनांची मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, बॉडीवर्क व इंटीरिअर्स अशा सर्व घटकांच्‍या संदर्भात प्रखर दर्जात्‍मक तपासणी केली जाते. तसेच ऑडी अप्रूव्‍ह:प्‍लस उपक्रम ग्राहकांना २४x७ रोडसाइड असिस्‍टण्‍ससह खरेदीपूर्वी वाहनासंदर्भात संपूर्ण माहिती देतो. ग्राहक या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून सुलभपणे आर्थिक पर्याय व विम्याचा लाभ घेऊ शकतात.
याप्रसंगी बोलताना ऑडी नाशिक चे ज्युबिलंट मोटरवर्क्स श्री. अमित जैन म्‍हणाले, ऑडी ब्रॅण्‍डसोबतचा आमचा संबंध अत्‍यंत दृढ राहिला आहे आणि आम्‍हाला नवीन ऑडी अप्रूव्‍ह:प्‍लस शोरूमसह हा सहयोग अधिक पुढे घेऊन जाण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही मागणीची पूर्तता करण्‍यासोबत ग्राहकांना दर्जात्‍मक लग्‍झरी अनुभव देण्‍यास उत्‍सुक आहोत.

अजून बातम्या वाचा..

Breaking News