‘विक्स इंडिया’ने सुपरस्टार रणवीर सिंगची ब्रँड अॅम्बॅसॅडर म्हणून केली नियुक्ती

Dec 23, 2021

मुंबई : जगातील प्रथम क्रमांकाचा विकल्या जाणारा सर्दी आणि खोकल्या वरील ब्रँड* ‘विक्स’ने आज बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगला आपला भारतातील नवीन ब्रँड अॅम्बॅसॅडर म्हणून नियुक्त केल्याचे जाहीर केले आहे. त्या माध्यमातून अधिक खोलवर युवा संबंध प्रस्थापित करण्यात येणार असून त्याद्वारे युवकांना ‘खीच खीच’मुक्त विचार आत्मविश्वासाने मांडता येतील.
आजच्या युवकाला आपले विचार व्यक्त करण्यासाठी नवीन मार्ग हवे असतात. त्यामध्ये कोणतीही खीच खीच किंवा अडथला आलेला आवडत नाही. रणवीर हा आजच्या पिढीचा महत्त्वाकांक्षी प्रातिनिधी असून त्याची शैली आणि त्याचे अपील हे युवकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्याची वेगळी शैली आणि प्रेरणा देणारी उर्जा आणि आपल्याला जे पाहिजे ते मिळविण्यातील त्याचा अतुलनीय असा आवेश यासाठी तो ओळखला जातो व त्याचा त्यासाठी आदर होतो. रणवीर बोलण्यात खूप सडेतोड आणि आहे आणि त्याचे व्यक्तिमत्त्व स्थिरचित्त असे आहे. त्याचा वापर करत विक्सने आपल्या ब्रँडचे वैशिष्ट्य पुनर्स्थापित करत युवा पिढीला ‘खीच खीच’रहित आयुष्य जगण्यासाठी साद घातली आहे. त्या माध्यमातून जगाला अधिक आत्मविश्वासाने सामोरे जा आणि आपले विचार त्यांच्यापर्यंत अधिक सक्षमपणे मांडा हा संदेश त्यातून दिला गेला आहे.
या नवीन सहयोगाबद्दल बोलताना रणवीर सिंग म्हणतो, “विक्स माझ्या घरचा आणि माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग राहिला आहे. जेव्हा जेव्हा माझा घसा दुखला तेव्हा मी विक्स कफ ड्रॉप्सचा सहारा घेतला आहे आणि त्यातून मला आराम मिळाला आहे. माझ्या बालपणापासून आजही माझ्या आयुष्याचा भाग असलेल्या अशा या ब्रँडशी जोडले जाताना मला खूप आनंद होतो आहे. मला पूर्ण आशा आहे की मी आणि हा ब्रँड असे दोघे मिळून आम्ही युवकांना ‘खीच खीच’मुक्त विचार मांडण्यास आणि त्यांची सर्वोत्तम गुणवत्ता सादर करत जगाला सामोरे जाण्यास मदत करू.”
प्रॉक्टर अँड गॅम्बलचे ‘पर्सनल हेल्थकेअर’चे वरिष्ठ संचालक आणि प्रमुख साहिल सेठी म्हणाले, “विक्स कि गोली ही नेहमीच निरंतर व कालातीत संपर्कासाठी महत्त्वाची मानली जाते आणि देशभर ती ‘खीच खीच’ दूर करण्यासाठी मान्यता पावली आहे. ही गोळी लोकांना गळ्यातील कोणत्याची समस्येशिवाय आत्मविश्वासाने बोलण्यास मदत करते. आमचा ब्रँड अॅम्बॅसॅडर म्हणून रणवीर सिंग यांना आम्ही करारबद्ध करत आहोत आणि त्याद्वारे आमच्या या उत्पादन धोरणाला पाठबळ मिळणार आहे. रणवीर हा त्याच्या सुस्पष्टता आणि उत्साह या गुणांमुळे कित्येकांसाठी आदर्शवत आहे. आपल्या स्वभावामुळे कित्येकांना सहजपणे आपल्याकडे आकर्षित करण्याचे नैसर्गिक गुण रणवीर यांच्यामध्ये आहेत. या सहकार्यामुळे आम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्याद्वारे विक्स खोकला गोळ्या आणि तिची घशावर उपाय करण्याची क्षमता ग्राहकांमध्ये अधिक उत्तमरीत्या अधोरेखित होईल.”

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News