नाशिक : केंद्र सरकारतर्फे नुकताच अर्थसंकल्प 2019 लोकसभेच्या पटलावर ठेवण्यात आला. नरेंद्र मोदींच्या नेतत्वाखाली रालोआ सरकारच्या दुस-या टर्म मधला हा पहिला अर्थसंकल्प होता. करप्रणाली मध्ये करण्यात आलेले बदल तसेच इतर तरतुदी संबंधी सर्वसामान्य जनतेला तसेच सर्व व्यापारी वर्गाला माहिती व्हावी यासाठी दि इन्सिटटयूट ऑफ कॉस्ट आकाउंटंटस ऑफ इंडिया -नाशिक ओझर चॅप्टर तर्फे दि. 10 जुलै रोजी परशुराम सायखेडकर सभाग्रह येथे संध्याकाळी 5.30 ते 8.30 या वेळेत मोफत मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. सीएमए रविंद्र देवधर, प्रोफेसर शिशिर सिंदेकर आणि सीए अभिजीत मोदी हे या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत.
दि इन्सिटटयूट ऑफ कॉस्ट आकाउंटंटस ऑफ इंडिया ही भारतातील अग्रगण्य संस्था असून आतापर्यंत वेळोवेळी नवीन करप्रणाली विषयी अनेक चर्चासत्र,विविध कोर्सेस व मार्गदर्शन शिबिरे यासंस्थेकडून आयोजित केले जातात.
यावेळी देखील हा कार्यक्रम दि इन्सिटटयूट ऑफ कॉस्ट आकाउंटंटस ऑफ इंडिया च्या नाशिक शाखेने आयोजित केला असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नाशिक शाखेचे अध्यक्ष सीएमए दिपक जोशी यांनी केले आहे.
समिट एसआयएफकडून समिट अॅक्टिव्ह अॅसेट अॅलोकेटर लाँग-शॉर्ट फंड लाँच
नाशिक: समिट एसआयएफने आज समिट अॅक्टिव्ह अॅसेट अॅलोकेटर लाँग-शॉर्ट फंडच्या लाँचची घोषणा केली. (हे...



