महिंद्राच्या तिन्ही उत्पादन कारखान्यातून दहा लाखावे वाहन बाहेर

Jul 10, 2019

• चाकण, हरिद्वार, झहीराबाद येथील उत्पादन कारखान्यांनी पार केला उत्पादनाचा विक्रमी टप्पा
• भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी दृढ बांधिलकीचे नव्याने प्रदर्शन
• चाकण, झहीराबाद आणि हरिद्वार कारखान्यांचा महिंद्राच्या नाशिक आणि कांदिवली कारखान्यांसह एक दशलक्ष वाहन निर्मिती करणाऱ्या उत्पादन कारखान्यांच्या गटामध्ये समावेश

मुंबई – 20.7 अब्ज डॉलर्सच्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एम अँड एम लि.) कंपनीने चाकण, झहीराबाद आणि हरिद्वार येथील आपल्या तिन्ही उत्पादन कारखान्यातून दहा लाखाव्या वाहनाची निर्मिती केली. यामुळे या तिन्ही ठिकाणी असलेल्या वाहन उत्पादन कारखान्यांचा कंपनीच्या नाशिक आणि कांदिवली येथील कारखान्यांसह दहा लाख वाहन निर्मिती कारखान्यांच्या गटात समावेश झाला आहे.

या विक्रमी टप्प्याविषयी महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या वाहन विभागाचे अध्यक्ष राजन वधेरा म्हणाले, ‘महिंद्राच्या वाहननिर्मितीच्या प्रवासातला हा लक्षणीय टप्पा आहे. यातून आमच्या अमर्याद आकांक्षा आणि तिन्ही उत्पादन कारखान्यांतील प्रत्येक कर्मचाऱ्याने घेतलेली मेहनत अधोरेखित झाली आहे. आम्ही ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी बांधील आहोत आणि तिन्ही कारखान्यांतून बाहेर पडलेले दहा लाखावे वाहन आमची उत्पादन क्षेत्रातील गुणवत्ता व प्रशासकीय कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण आहे.’

महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या वाहन विभागाचे उत्पादन प्रमुख श्री. विजय कालरा म्हणाले, ‘चाकण, झहीराबाद आणि हरिद्वार येथील अत्याधुनिक आणि कार्यक्षम उत्पादन प्रक्रियेने आम्ही आखलेल्या वेळमर्यादेत उत्पादनाचा हा विक्रमी टप्पा गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मला खात्री आहे, की हा टप्पा आमच्या कारखान्यांतर्फे भविष्यात केल्या जाणाऱ्या अशाचप्रकारच्या विविध कामगिरींची सुरुवात असेल.’

महिंद्रा ही वाहन क्षेत्रातील पूर्ण क्षमतेसह काम करणारी कंपनी असून वाहन उद्योगाच्या जवळपास प्रत्येक विभागात ती कार्यरत आहे. त्यात व्यावसायिक वाहनांपासून (तीन चाकी/ हलकी व्यावसायिक वाहने आणि अवजड व्यावसायिक वाहने), उपयुक्तता वाहने, क्रीडा उपयुक्तता वाहने (मूलभूत वाहनांपासून उच्चभ्रू एसयूव्हीपर्यंत), सेदान आणि इलेक्ट्रिक वाहनांचा त्यात समावेश आहे.

महिंद्राचे वाहन उत्पादन कारखाने प्रेस शॉप्स, बॉडी शॉप्स, सीईडी लाइन्स, पेंट शॉप्स आणि जुळणी पट्टे यांसारख्या सुविधांनी सुसज्ज असून स्थापनेपासून त्यांनी विविध मान- सन्मान मिळवले आहेत.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News