फ्लिपकार्ट आणि ऍक्सिस बँक यांचे नवीन को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड पॉवर्ड बाय मास्टरकार्ड

Jul 12, 2019

● औपचारिक क्रेडिटची व्याप्ती वाढवण्याच्या उद्देशाने नवीन एक्सक्लुसिव्ह को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड

● फ्लिपकार्ट, मिंत्रा, टूगुड वर नवीन क्रेडिट कार्डच्या ग्राहकांना मिळतील सर्वात जास्त कॅशबॅकस् तसेच मेकमायट्रिप, गोआयबीबो, उबर, पीव्हीआर, गाना, क्युअरफिट, अर्बनक्लॅप यासारख्या तृतीय पक्षीय मर्चंट्सकडून मिळतील अतिरिक्त लाभ

● फ्लिपकार्टवर लागू असलेल्या ईएमआयच्या सर्व टेन्युअर्सवर सर्व दिवशी अतिरिक्त बचतीची संधी, मैत्रीपूर्ण भेट म्हणून एअरपोर्ट लाऊंज सुविधेचा लाभ घेता येणार, हे क्रेडिट कार्ड युजर्सना मिळवून देणार सर्वोत्कृष्ट मूल्य

मुंबई, ११ जुलै, २०१९: ई-कॉमर्समधील आघाडीची बाजारपेठ फ्लिपकार्ट व ऍक्सिस बँकेने भागीदारी करून नवीन एक्सक्लुसिव्ह को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड पॉवर्ड बाय मास्टरकार्ड आणले आहे. ग्राहकांसाठी सर्वोत्तम लाभ व ऑनलाईन, ऑफलाईन अशा सर्व खर्चांवर अमर्यादित कॅशबॅक ही या क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये आहेत. क्रेडिट सुविधेची व्याप्ती अधिक वाढविण्याच्या व वेगाने विकसित होत असलेल्या क्रेडिट कार्ड इकोसिस्टिमचा भारतात अधिकाधिक प्रसार व्हावा या उद्देशाने फ्लिपकार्ट, ऍक्सिस बँक व मास्टरकार्ड यांनी ही भागीदारी केली आहे.

भारतात क्रेडिट कार्ड इकोसिस्टिमचा वेगाने विकास होत असून जास्तीत जास्त व्याप्ती व स्वीकार या दोन्ही बाबतीत वाढीची अनुकूलता खूप जास्त आहे. बहुतांश भारतीयांना कोणत्या न कोणत्या स्वरूपात अनौपचारिक क्रेडिट उपलब्ध होत असले तरी अनुमानित आकडेवारीनुसार फक्त ४९ मिलियन क्रेडिट कार्ड्स ग्राहकांना दिली गेली आहेत. सिबिलच्या अनुमानांनुसार क्रेडिटसाठी पात्र भारतीयांची संख्या २२० मिलियन्स आहे. याचा अर्थ, औपचारिक आर्थिक संस्था त्यांच्यापैकी एक तृतीयांश लोकांपर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत. त्याचबरोबरीने यापैकी फक्त ७२ मिलियन लोक ‘क्रेडिट सक्रिय’ आहेत ज्यांचे बँकेत किंवा वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थेमध्ये लाईव्ह खाते आहे.

क्रेडिटसाठी पात्र भारतीय तसेच ज्यांनी यापूर्वी औपचारिक क्रेडिटचा लाभ घेतलेला नाही अशा लोकांसाठी फ्लिपकार्ट-ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड तयार करण्यात आले आहे. ऍक्सिस बँक व फ्लिपकारचे भारतात सर्वत्र पसरलेले नेटवर्क व वितरण व्यवस्था तसेच को-ब्रँड प्रोग्रॅम्स व पेमेंट तंत्रज्ञानात मास्टरकार्डचे बाजारपेठेतील नेतृत्व यांचे बळ या कार्डला लाभलेले आहे. जुलै महिन्यात निवडक युजर्सना हे कार्ड उपलब्ध करवून देण्यात येईल. त्यानंतरच्या काही आठवड्यात ते सर्वांसाठी खुले करण्याची योजना आहे. तात्काळ कार्ड जारी केले जाण्यापासून ते व्यवहार पूर्ण होण्यापर्यंत सर्वच बाबतीत या कार्डचे ग्राहक असीमित सेवासुविधांचा लाभ घेऊ शकतील.

यामध्ये ग्राहकांना कार्डमार्फत केलेल्या खर्चांवर कॅशबॅकमार्फत सर्वोत्तम लाभ मिळवता येतील. कॅशबॅक ग्राहकांच्या स्टेट्मेंट्मधे दर महिन्याला ऑटो क्रेडिट केले जाईल. अशाप्रकारे ग्राहकांना त्यांच्या दर दिवशीच्या खरेदीवर किती प्रत्यक्ष लाभ मिळाले ते पाहता येईल. या क्षेत्रातील सर्वोत्तम मूल्य मिळवून देत या कंपन्यांनी महत्त्वाच्या विभागातील अशा नामांकित तृतीय पक्षीय मर्चन्टससोबत भागीदारी केली आहे, ज्याठिकाणी ग्राहक सर्वात जास्त क्रेडिट कार्ड खर्च करण्याची शक्यता आहे. यामध्ये मेकमायट्रिप, गोआयबीबो, उबर, पीव्हीआर, गाना, क्युअरफिट, अर्बनक्लॅप यांचा समावेश आहे ज्यामुळे ग्राहकांना अतुलनीय लाभ मिळतील. कार्डधारकांना भारतातील विमानतळांवर चारवेळा लाऊंज सुविधांचा लाभ घेण्याची मैत्रीपूर्ण भेटही देण्यात येत आहे. फ्लिपकार्ट-ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड आपल्या ग्राहकांना फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्मवर सर्व टेन्युअर्समध्ये ईएमआयमार्फत केल्या जाणाऱ्या खर्चांवर अतिरिक्त लाभ देखील देत आहे.

फ्लिपकार्ट समूहाचे सीईओ श्री. कल्याण कृष्णमूर्ती यांनी सांगितले, “आमच्या प्रत्येक प्रयत्नांचा केंद्रबिंदू ग्राहक असतो. आम्ही आमच्या सर्व हितधारकांसाठी मूल्य निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. ऍक्सिस बँक व मास्टरकार्डसोबत भागीदारीतून तयार करण्यात आलेल्या या को-ब्रँडेड क्रेडिट कार्डमधून आम्ही भारतात औपचारिक क्रेडिट सुविधेची व्याप्ती वाढवण्याची आमची वचनबद्धता पूर्ण करत आहोत. ही अशी सुविधा आहे ज्यामुळे ग्राहकांना सर्वाधिक लाभ मिळतील. क्रेडिट सुविधेची व्याप्ती वाढवल्याने भारतात अर्थपूर्ण विकासाला चालना मिळेल. कोट्यवधी भारतीयांना फारसे आर्थिक दडपण न घेता आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मदत करत आमची भूमिका बजावत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.”

ऍक्सिस बँकेचे एमडी व सीईओ श्री. अमिताभ चौधरी यांनी सांगितले, “ऍक्सिस बँक आपल्या ग्राहकांना सर्व प्रकारच्या पेमेंट्स सुविधा देते. नाविन्यपूर्ण भागीदारी मॉडेल्सच्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्न करत असतो. आकर्षक ऑफर्स देण्याच्या बरोबरीनेच ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यावरही आम्ही भर देत असतो. भारतातील नव्या पिढीला प्रत्येक गोष्ट सर्वोत्तम हवी असते, सेवा, सेवेचा दर्जा, निवड, सुविधा हे सर्वकाही सर्वात चांगले असावे याबद्दल ते चोखंदळ असतात. आम्ही याच ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन आमच्या सेवा योजना आखत असतो. फ्लिपकार्ट व मास्टरकार्डसोबत भागीदारी करून क्रेडिट सुविधेची व्याप्ती वाढवताना व भौगोलिक विकास करत अधिक जास्त ग्राहकांपर्यंत आमच्या सेवा पोहोचवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.”

मास्टरकार्डचे आशिया – पॅसिफिकचे सह-अध्यक्ष अरी सरकार यांनी सांगितले, “भारतात आजही ९०% व्यवहार रोख रकमेने केले जातात. अर्थात डिजिटल पेमेंट्सकडे लोकांचा कल झुकण्याचे प्रमाण वाढत आहे. ऑनलाईन खरेदी व ई-कॉमर्समुळे याला प्रोत्साहन मिळत आहे. सध्या भारतातील ४०% पेक्षा जास्त डिजिटल पेमेंट्स ही ऑनलाईन खरेदी व ई-कॉमर्ससाठी केली जातात. सर्वच क्षेत्रात डिजिटल कार्यप्रणालीला प्रोत्साहन देण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे हे प्रमाण अजून जास्त वाढेल. हे नवीन कार्ड सादर करत असताना आम्ही तंत्रज्ञान, को-ब्रँड प्रोग्रॅम्स व विश्लेषण क्षमता यातील आमची जागतिक पातळीवरील आघाडी पुरेपूर वापरून कार्डधारकांना अधिक जास्त मौल्यवान, सक्षम व सुरक्षित पेमेंट अनुभव मिळवून देत आहोत. भारतात डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात परिवर्तनाला वेग देताना फ्लिपकार्ट व ऍक्सिस बँकेसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे.”

फ्लिपकार्ट ग्रुप हा भारतातील आघाडीच्या डिजिटल कॉमर्स कंपन्यांपैकी एक असून यामध्ये मिन्त्रा, जबॉन्ग व फोनपे या कंपन्या आहेत.

२००७ मध्ये सुरु करण्यात आलेल्या फ्लिपकार्टने कोट्यवधी ग्राहक, विक्रेते, मर्चंट्स व लघु उद्योजकांना भारतातील ई-कॉमर्स क्रांतीमध्ये सहभागी होण्यासाठी सक्षम केले आहे. फ्लिपकार्टचे नोंदणीकृत ग्राहक १५० मिलियन पेक्षा जास्त असून याठिकाणी ८० पेक्षा जास्त विभागांमध्ये ८० मिलियनपेक्षा जास्त उत्पादने आहेत. कॅश ऑन डिलिव्हरी, नो कॉस्ट ईएमआय व इझी रिटर्न्स या ग्राहककेंद्री नाविन्यपूर्ण योजना सादर करण्यात फ्लिपकार्टने पुढाकार घेऊन कोट्यवधी भारतीयांसाठी ऑनलाईन खरेदी सहज परवडण्याजोगी व सहज उपलब्ध होण्याजोगी बनवली. मिन्त्रा व जबॉन्ग हे ऑनलाईन फॅशन बाजारपेठेतील आघाडीचे प्लॅटफॉर्म्स व फोनपे या भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या डिजिटल पेमेंट्स प्लॅटफॉर्म सोबत फ्लिपकार्ट ग्रुप भारतात व्यापार क्षेत्रात परिवर्तन घडवून आणत आहे.

ऍक्सिस बँक
ऍक्सिस बँक ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक आहे. मोठ्या व मध्यम स्तरातील कोर्पोरेट्स, लघु व मध्यम उद्योजक, शेती व रिटेल व्यवसाय अशा विविध ग्राहकांना ऍक्सिस बँक त्यांच्या गरजांनुसार विविध प्रकारच्या सेवा पुरवते. ३१ मार्च २०१९ रोजीच्या आकडेवारीनुसार देशभरात त्यांच्या ४०५० शाखा (एक्स्टेंशन काउंटर्ससहित) असून ११८०१ एटीएम आहेत. २३६६ शहरांमध्ये ही बँक पोहोचली आहे. सिंगापूर, हॉंगकॉंग, दुबई (डीआयएफसीमध्ये), शांघाय व कोलंबो याठिकाणी त्यांच्या शाखा असून विदेशात दहा कार्यालये आहेत. दुबई, अबुधाबी, शारजा व ढाका येथे त्यांची प्रतिनिधी कार्यालये आहेत. युकेतील लंडनमध्ये त्यांची विदेशी उपबँक आहे.

मास्टरकार्ड
मास्टरकार्ड ही जागतिक पातळीवरील पेमेंट्स उद्योगक्षेत्रातील तंत्रज्ञान कंपनी आहे. (एनवायएसई : MA) www.mastercard.com आमचे जागतिक पेमेंट्स प्रोसेसिंग नेटवर्क तब्बल २१० देशांमधील ग्राहक, आर्थिक संस्था, मर्चंट्स, सरकारे व उद्योगांना जोडते. मास्टरकार्डची उत्पादने व सुविधा यामुळे खरेदी, प्रवास, व्यवसाय चालवणे, आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन या दैनंदिन बाबी प्रत्येक व्यक्तीसाठी सोप्या, अधिक सुरक्षित व अधिक कार्यक्षम बनतात. आम्हाला ट्विटरवर फॉलो करा – @mastercardindia Beyond the Transaction Blog मधील चर्चेत सहभागी व्हा. Engagement Bureau बाबत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी subscribe करा.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News