नाशिक : मागील काही दिवसांपासून पंचवटी विभागातील व्रंदावन कॉलनी आणि क्रांतीनगर भागात मोठया प्रमाणात पिण्याचे पाणी गढूळ येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे.सदरच्या भागात अनेक वर्षोंची जुने पाईपलाईन असल्यामुळे वेळोवेळी तक्रार करुन सुध्दा कमी दाबाने पाणी येत असल्याचे तक्रारी देण्यात आलेल्या आहेत.परंतु त्या तक्रारीचे अदयाप निराकरण तर झालेलेच नसतांना तोच नवीन तक्रार म्हणजे तीव्र स्वरुपाचे गढूळ पाणी येत असल्यामुळे भांडयामधील तळ सुध्दा दिसेनासा झालेला असल्यामुळे व्रंदावन कॉलनी व आसपास परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे.एकीकडे मनपा प्रशासन पावसाळयात नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे सांगते तर दुसरीकडे गढूळ पाण्याची समस्या सोडवू शकत नसल्यामुळे सदरच्या भागातील नागरिकांनी मनपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
गंगापुर धरणातील पाणी पातळीने तळ गाठल्यामुळे व नुकताच पाऊस झाल्यामुळे सदरचे गढूळ पाणी येण्याची शक्यता असली तरी अन्य भागांपेक्षा क्रांतीनगर परिसरात तीव्र स्वरुपाचे गढूळ पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे.याकडे मनपा प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...





