नाशिक – आपल्या देशात वाढणारी उष्णता आणि प्रदूषण समस्या या साठी व्यापक प्रमाणात वृक्ष लावण्याची गरज असून अनेक सेलेब्रिटीही यात मोलाचा हातभार लावत आहेत . याचाच एक भाग म्हणून मिसेस इंडिया इंटरनॅशनल मुकुट मिळवलेल्या शिल्पी अवस्थी यांनी स्वतःच देशभरात व्यापक वृक्षारोपण मोहिमेची सुरवात केली आहे . अनेक सामाजिक संस्थांच्या सहकार्याने त्या देशात वृक्षारोपण आयोजित करीत आहेत. त्या म्हणाल्या कि पुढील पिढी साठी पर्यावरण चांगले ठेवणे ही आजच्या पिढीची जबाबदारी असून जागतिक तापमानवाढ व पाण्याची समस्या यांना तोंड देण्यासाठी आडे लावून ती जगविणे आवश्यक आहे . आज नूतनीकरण आणि कधीकधी विजेच्या तारास अडथळा आल्याने मोठ्या संख्येने वृक्ष कापले जात आहेत,यासाठी विद्युत तारा भूमिगत करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला
शिल्पी अवस्थी विविध शाळा , नागरी संस्था, अनाथालये, रुग्णालये, वृद्धाश्रम अश्या अनेक सामाजिक संस्था, महानगर नगरपालिका ची स्पेस येथे ही मोहीम राबवत आहेत .
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






