पाच हजार रोपट्यांची लागवड करत सुलाचे पर्यावरण संवर्धनात योगदान

Jul 13, 2019

शासनाच्या वन विभागाला सहकार्य करत हाती घेतला उपक्रम

नाशिक : देशातील आघाडीच्या वाईन उत्पादक असलेल्या सुला विनियार्ड्स यांनी आशियातील शाश्वत वाईनरी होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. राज्य शासनाच्या वन विभागाला सहाय्य करतांना मोठ्या स्वरूपात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत वासळी खेड्याच्या परिसरातील 11 एकर जागेत श्रमदान या उपक्रमाअंतर्गत सुलातर्फे 5 हजार रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे. शिसम, जांभूळ, आपटे, बांबू अशा औषधी गुणधर्म असलेल्या रोपट्याची लागवड करण्यात आली.
केवळ रोप लावण्यापुरते मर्यादित न राहता, रोपटे मोठे होण्यापर्यंत जतन करण्याची जबाबदारी देखील सुलाने स्वीकारली आहे. लागवडीचे क्षेत्र तीन पटींनी वाढवून वर्षाअखेरपर्यंत 25 हजार रोपटे लावण्याच्या अनुषंगाने प्रसाशकीय पातळीवर चर्चादेखील सुरू आहे.
यातून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड, सौर ऊर्जेचा वापर, जल व्यवस्थापन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) आदींच्या माध्यमातून शाश्वततेचा ध्यास सुलाने बाळगला आहे.
सुला विनियार्ड्सचे संस्थापक व सीईओ श्री. राजीव सामंत म्हणाले की भविष्याचा अंदाज घेऊन वाईन निर्मिती करण्यावर आम्ही विश्वास ठेवतो. पर्यावरणाप्रति आपली जबाबदारी काय आहे याची जाणीव व्यवसायांना होणे अत्यावश्यक आहे. वातावरणातील बदलांचा प्रत्येक घटकावर परिणाम होतो आहे. त्यामुळे तातडीच्या कृतीची आवश्यकता निर्माण झाली आहे. करण्यासारखे खूप काही आहे, आम्ही छोट्या उपाययोजनेने सुरवात केली आहे.
वृक्षारोपण उपक्रमा प्रसंगी उप वनसंरक्षक (पश्चिम विभाग) शिवाजी फुले, वन परीक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे, सुला विनियार्ड्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष (पब्लिक अफेअर्स) संजीव पैठणकर आणि उप-सरव्यवस्थापक (लीगल अफेअर) किशोर अहिरे या वेळी उपस्थित होते.
2021 पर्यंत भारत व आशियातील सर्वात शाश्वत वाईनरी होण्याची मोहीम सुलाने हाती घेतली आहे. नाशिक सभोवतालचा परिसर हिरवागार करण्यात योगदान देण्यासह वाईनरीशी शेकडोंना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यात सुलाची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अतिरिक्त लागवड करतांना कृषी क्षेत्राला चालना देण्याचे काम सुला करत आहे. कंपनीतर्फे नजीकच्या परिसरांमध्ये वॉटर एटीएम बसविण्यात आले आहेत. या द्वारे गावकऱ्यांना स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देत आहे.

सुलाविषयी

भारतात वाईनसाठीची पहिली पसंतीसुला विनियार्डस्‌’ दिली जाते. ‘सुलाच्या पुरस्कार प्राप्त वाईन्स देशभरातील नामांकित हॉटेल रेस्टोरंट्समध्ये उपलब्ध आहेत. तसेच जगभरातील तब्बल 25 देशांमध्ये वाईनची निर्यातदेखील केली जाते. 2005 मध्ये देशातील पहिले वाईन टेस्टींग रूम स्थापन करून वाईन टुरीझमच्या क्षेत्रातसुलाने मैलाचा दगड रोवला आहे. 2010 मध्येबियॉन्डहे पहिलेविनियार्ड रिसॉर्टतर 2017 मध्ये सोर्सहे देशातील पहिले हेरीटेज वायनरी रिसॉर्ट साकारण्याचा बहुमानसुलाने पटकावलाय. गेल्या वर्षी सुमारे साडे तीन लाख व्यक्तींनी सुलाला भेट दिली होती. यातून सर्वाधिक व्यक्‍ती भेट देणाऱ्या जागतिक स्तरावरील वाईनरीजच्या यादीत सुलाने अव्वल स्थानी मजल मारली आहे

सुलाने वाईन्स आणि स्पिरीट् टुरीझमकरीता अत्यंत प्रतिष्ठेचा असा ड्रिंक्स बिझनेस अवॉर्ड 2016 पुरस्कार पटकावलाय. विशेष म्हणजे ड्रिंक्स बिझनेस पुरस्कार मिळविणारी सुला ही पहिली वाईनरी ठरली आहे. जुलै 2018 मध्ये सर्वाधिक दहा लाख (1 मिलीयन) वाईन विक्रीचा टप्पा गाठणारी सुला ही आशियातील पहिली वाईन कंपनी ठरली आहे

भारतीय वाईन क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या सुलाकडून उत्पादनाचा दर्जा वाढविण्यासाठी सातत्याने नवनवीन प्रयोग राबवतांना द्राक्षाच्या उत्पादनात वैविध्यपूर्णता आणली जात असते. शाश्वत शेतीला प्राधान्य ग्रामीण अर्थव्यवस्थेला या माध्यमातून बळकटी देण्याचे कार्य केले जात आहे. अपारंपारीक ऊर्जा स्त्रोतांना प्राधान्य देतांना सुलातर्फे आवश्यकतेच्या निम्या क्षमतेची वीज निर्मिती सौर ऊर्जेतून केली जात आहे. म्हणूनच सुला जगातील शाश्वत वाईनरीज्मध्ये समाविष्ट झाली आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये, सुला कर्नाटक वायनरीनेकाडूह्या प्रथम प्रीमियम वाईनची निर्मिती केली. कर्नाटकमधील विनियार्डमध्ये निर्मितीकाडूही सुलाची धेय्याने प्रेरीत पहिलीच अशी वाईन आहे. देशातील वाघांचे संवर्धन असे धेय्य यामागील आहे.

वाईन आणि स्पिरीट आतातीच्या बाबतीतही कंपनीने आघाडी घेतली आहे. सुला सिलेक्शन्सच्या माध्यमातून जगविख्यात असे रेमी कॉईन्ट्रे, हार्डीज्‌, कोनो सुर, ले ग्रॅंड नोईर आदी ब्रॅंड् याद्वारे मायदेशात उपलब्ध झालेले आहेत. सुलाफेस्ट हे जागतिक स्तरावरील संगीत महोत्सव म्हणून ओळखले जाऊ लागले असून आगामी फेब्रुवारी 2019 मध्ये फेस्टच्या बाराव्या हंगामाचे आयोजन केले होते.

 

For more details, contact:

Disha Thakkar I disha.thakkar@sulawines.com   mob. 9970090046

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News