केवळ श्रीक्रष्णाच्या द्वारका नगरीत गोमती नदीत सापडतो हा दगड (शिंपले), गोमती चक्राचे ज्योतिषशास्त्रात अदभुत प्रयोग

Jul 14, 2019

कुंडलीत राहू आणि चंद्र यांचा ग्रहणदोष असेल किंवा ज्या स्त्रियांचे गर्भ टिकत नाही अशा व्यक्तींना गोमती चक्राची अंगूठी घातल्यास आराम मिळतो

ज्योतिषशास्त्रात नदीतील अनेक वस्तुना महत्व दिले गेलेले आहे. परंतु माहिती आभावी जनसमुदाय यांचा वापर करु शकत नाही. ज्ञान आभावी जर एखादी वस्तु वापरली तर त्याचे घातक परिणाम देखील जातकाला सहन करावे लागतात. आज आपण माहिती जाणून घेणार ती म्हणजे गोमती चक्राची. काय आहे गोमती चक्र ? श्रीक्रष्णाच्या द्वारका नगरीमधील गोमती नदीत सापडले जाणारे पांढरा रंगाचे दगडासारखे शिंपले जे अत्यंत दुर्लभ आहे. ज्या जातकाला हे अस्सल स्वरुपात मिळते तो नशिबान असतो.त्याचे दिवस लवकरच बदलायला सुरुवात होते. गोमती चक्र ओळखयाचे असेल तर त्याची एक बाजू सफेद असून दुसरी बाजू समतल आकाराची सापासारखी दिसणारी असते. आपल्या प्राचीन संस्क्रतीत आणि वेदशास्त्रांमध्ये यांचे अचुक उपाय व टोटके सांगितलेले आहे.
ज्योतिष विदया आणि तांत्रिक विदयामध्ये गोमती चक्राचा विविध प्रकारे वापर केला जातो. याला भगवान श्रीक्रष्णाचे सुदर्शन चक्र या नावाने देखील संबोधले जाते. गोमती चक्राची पुजा खास करुन होळी, दिवाळी, दसरा मध्ये केली जाते. घरातील देवघरात जर आपण 11 किंवा 21 गोमती चक्र ठेवून त्या 21 माळाने ‘ ओम श्रीं नम: ‘ हा जप करुन अभिमंत्रित करुन ठेवावे. नेहमी त्याला धुप-दिप दाखवून पुजा केल्याने घरात सुखशांती नांदते.
गोमती चक्राचे काय आहे फायदे ?
अ) गोमती चक्रावर सर्पाचे आकार असून तो दिसतांना 7 हया अंकात दिसतो.ज्योतिषशास्त्रात 7 अंक राहु ग्रहाशी निगडीत आहे. गोमती चक्र पाण्यात सापडत असल्यामुळे पाण्याचा संबध चंद्राशी येतो.ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि चंद्र यांचा ग्रहणदोष असेल किंवा ज्या स्त्रियांचे गर्भ टिकत नाही अशा व्यक्तींना गोमती चक्राची अंगूठी घातल्यास आराम मिळतो.
ब) जर आपले मित्र आपल्याशी शत्रुगत व्यवहार करत असेल तर गोमती चक्र अंगूठी वापरावी.
क) घरात परिवारातील सदस्य आपल्याशी नेहमी वादविवाद करु लागले किंवा दिवसभर नेहमी कटकटी होत असेल तर गोमती चक्र धारण करावे.
ड) घरातील एखादी व्यक्ती नेहमी आजारी राहत असेल लाखो रुपये खर्च करुन जरी त्याचे आजार बरा होत नसेल तर अशा रुग्णाला गोमती चक्र धारण करण्यास दयावे.
इ) नौकरी किंवा व्यवसायात उन्नतीसाठी गोमती चक्र धारण करावे.
ई) नजरदोष काढण्यासाठी – एखादया बालकाला नेहमी-नेहमी नजर लागत असेल तर 3 गोमती चक्र त्या मुलाच्या अंगावरुन 7 वेळा उतरुवून एकांत जागी फेकून मागे वळून न पहाता घरी यावे.
उ) एखादयाला व्यापारात अथवा व्यवसायात नेहमी आर्थिक घाटा होत असेल तर महिन्याच्या प्रथम सोमवारी 11 गोमती चक्र घेऊन हळद लावून पिवळया कपडयात बांधून महादेवाचे पंचाक्षरी मंत्राने अभिमंत्रीत करुन व्यापारी जागेच्या संपुर्ण चारी कोप-यात फिरवावी त्यानंतर वाहत्या पाण्यात प्रवाहीत केल्यास जागेतील वास्तुदोष निघून जातो.
ऊ) एखादे लहान बालक जर खुप घाबरत असेल तर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी गोमती चक्र बजरंगबलीच्या एखादया मंत्राने अभिमंत्रित करुन हनुमानाच्या उजव्या पायाचे शेंदुर गोमती चक्रावर लावावे व ते लाल कपडयात गुंधाळून बालकाच्या गळयात बांधावे. घाबरने त्वरीत थांबते.
ए) जर कमाई पेक्षा आपल्या हातून खर्च खुप होत असेल तर, महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी 11 गोमती चक्र अभिमंत्रीत करुन पिवळया कपडयात गुंढाळून देवी महालक्ष्मीचे मंत्र म्हणून अभिमंत्रित करुन देवघरात ठेवावी. दुसरे दिवशी त्यातील 4 गोमती चक्र घेऊन घरातील चार कोप-यात प्रत्येकी एक प्रमाणे गाडावी. आणि 3 गोमती चक्र लाल कपडयात बांधून धनस्थानावर ठेवावी. 3 गोमती चक्र देवघरात ठेवून उर्वरित शिल्लक एक गोमती चक्र मंदिरात ठेवून आपली जी इच्छा अथवा समस्या असेल ती गोमती चक्राला सांगून देवापुढे ठेवावी.काही दिवसात लाभ मिळण्यास सुरुवात होते.

अजून बातम्या वाचा..

1. अर्थागमो नित्यमरोगिता च प्रिया च भार्या प्रियवादिनी च। वश्यश्च पुत्रोऽर्थकरी च विद्या षड् जीव लोके सुखानि राजन्॥

अर्थात : ज्याच्या घरात नेहमी अर्थागम म्हणजे पैशाचे आगम होते. ज्याचे शरीर आरोग्यदायी आहे . ज्याची...

read more
एकमेव रत्न जो शरीरावर धारण केल्यावर आवश्यक ग्रहांची ऊर्जा प्रदानतेसाठी गरजेनुसार  रंग बदलतो,

एकमेव रत्न जो शरीरावर धारण केल्यावर आवश्यक ग्रहांची ऊर्जा प्रदानतेसाठी गरजेनुसार रंग बदलतो,

अनेक रत्न धारण करण्याची आवश्यकता नसतेआज आपण ज्योतिषशास्त्रातील सर्वात चमत्कारी उपरत्ना बदल माहिती...

read more
Breaking News