भारतात आयटीएल आणि यनमार च्या सहकार्याने सोलिस या ट्रॅक्टरची श्रेणी सादर

Jul 15, 2019

येत्या पाच वर्षांत 50,000 ट्रॅक्टर आणि दोन वर्षांच्या आत 400 वितरक नेमण्याचे कंपन्यांचे लक्ष्य

इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लि. (आयटीएल) या कंपनीने जपानच्या यनमार अ‍ॅग्रीबिजनेस कंपनी लिमिटेडच्या सहकार्याने सोलिस या ट्रॅक्टरची श्रेणी सादर केली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने व वैशिष्ट्यांनी युक्त असे हे यनमारचे ट्रॅक्टर भारतातील कृषि आणि भूप्रदेशासाठी सर्वोत्कृष्ट आहेत. पूर्वी पंजाबमधील होशियारपूर येथे उत्पादीत होणारे सोलिस ट्रॅक्टर थेट निर्यात होत असत. त्यामुळे आयटीएल इंडिया ही ट्रॅक्टरची अग्रगण्य निर्यातक कंपनी म्हणून गणली जात होती. भारत ही जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टरची बाजारपेठ असल्याने परदेशातील बाजारपेठेत प्रचंड यश मिळाल्यावर आयटीएल आता भारतात सोलिस ट्रॅक्टर सादर केला आहे.
आयटीएल’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीपक मित्तल म्हणाले कि भारतातील कृषि यांत्रिकीकरणाचे चित्र बदलण्यासाठी सोलिस येथे आणण्यात आला आहे. भारतात येत्या दोन वर्षांत आम्ही 50,000 सोलिस आणि यनमार ट्रॅक्टर्सची विक्री 5 वर्षांत गाठणार आहोत. तसेच येथे 400 वितरकांची नियुक्ती करणार आहोत. सोलिस ट्रॅक्टर हे
बहुविध स्वरुपाची तांत्रिकदृष्ट्या प्रगत वैशिष्ट्ये आणि उत्कृष्ट सोयी देतात. ‘मेड इन इंडिया’ शेती तंत्रज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या गुणवत्तेत ते क्रांतिकारक ठरतील.”
यनमार होल्डिंग्ज कंपनी लिमिटेडचे संचालक केन ओकुयामा यांनी या प्रसंगी सांगितले कि, जपान आणि दक्षिणपूर्व आशियात ‘यनमार’चे जाळे मजबूत आहे. ‘आयटीएल’च्या सोलिस ट्रॅक्टरचे परकीय बाजारांतील आघाडीचे स्थान लक्षात घेता, यनमार आणि आयटीएल यांच्यातील भागीदारीमुळे दोन्ही कंपन्या भारतीय बाजारपेठेत नवीन स्थान पटकावतील, असा आम्हाला विश्‍वास वाटतो. परदेशांमध्ये मिळवलेल्या यशाची पुनरावृत्ती सोलिस ट्रॅक्टऱ भारतातही करेल याबद्दलही आम्हाला खात्री वाटते.
आगामी सोलिस आणि यनमार श्रेणी शक्तिशाली आणि प्रगत वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. या श्रेणीच्या ट्रॅक्टर्समध्ये कठोरपणा, टिकाऊपणा, ऊर्जा आणि कार्यक्षमता हे गुणधर्म समाविष्ट आहेत. त्यामुळे भविष्यातील सर्व कृषी आणि व्यावसायिक कामांसाठी ही अगदी अतुलनीय श्रेणी बनलेली आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी गुंतवलेल्या पैशाचे पुरेपूर मूल्य हवे असते. ते हे ट्रॅक्टर त्यांना मिळवून देतात. या श्रेणीचे ट्रॅक्टर कोणत्याही स्वरुपाच्या मातीत पूर्ण सामर्थ्याने काम करून आपली कार्यक्षमता सिद्ध करतात. त्यामुळे शेतकऱ्यांची जास्तीत जास्त बचत होते.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News