अत्‍यंत लोकप्रिय ठरलेल्या न्‍यू टोयोटा ग्‍लान्‍झाचे वासन टोयोटा मध्ये शानदार अनावरण , बुकींग सुरु

Mar 16, 2022

ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने बुकींगची सुविधा

नाशिक ः किर्लोस्‍कर मोटर यांच्‍यातर्फे लोकप्रिय ठरलेली अशी न्‍यू टोयोटा ग्‍लान्‍झाच्‍या बुकींगला सुरवात झाली आहे. त्‍यामूळे या वाहनाच्‍या खरेदीसाठी प्रतीक्षेत असलेल्‍या ग्राहकांना बुकींग सुविधा उपलब्‍ध करुन दिली आहे. ऑनलाइन पद्धतीने संकेतस्‍थळावर किंवा ऑफलाईन पद्धतीने वासन टोयोटा डिलरशिपला भेट देऊन बुकींग करता येऊ शकते.

अधिक माहिती देतांना वासन टोयोटा चे मुख्य कार्यकारी अधिकारी तेजींदर बेदी म्‍हणाले, टोयोटाच्‍या आपल्‍याच देशात उत्‍पादित केलेल्‍या कनेक्‍टेड कार तंत्रज्ञानासह सुसज्‍ज, पूर्णपणे लोड केलेल्‍या कूल न्‍यू ग्‍लान्‍झा २२ प्‍लस केएमपीएल मायलेजसह शक्‍तिशाली आणि इंधन कार्यक्षम इंजिनसह उपलब्‍ध आहे. या वाहनात टोयोटा सिग्‍नेचर स्‍टायलिश फ्रंट ग्रिल आणि बंपर उपलब्‍ध आहे. कारमध्ये ६ एअर बॅगसह सुरक्षेचा दर्जा उंचावते. टोयोटा व्‍हॉइस असिस्‍टंट, हेड-अप डिस्‍प्‍ले आणि ३६० डिग्री कॅमेरा अशी वैशिष्ट्ये आहेत. फक्‍त ११ हजार रुपये मात्र भरुन बुकींग सुविधा उपलब्‍ध झालेली आहे. ग्राहकांच्‍या सुविधेसाठी @www.toyotabharat.com या संकेतस्‍थळावर तसेच जवळच्‍या वासन टोयोटा डीलरशिपला भेट देऊनही बुकींग करता येऊ शकते.(मुंबई-आग्रा नॅशनल हायवे,वासन नगर पाथर्डी फाटा नाशिक)-८८८८८४८१९१ न्‍यू टोयोटा ग्‍लान्‍झा मॅन्‍युअल (एमटी) तसेच ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन (एएमटी) असे दोन्‍हीमध्ये उपलब्‍ध असेल. शक्‍तिशाली व तितकेच कार्यक्षम के-सिरीज इंजिनसह सुसज्‍ज अशी ही कार आहे. ग्राहकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी न्‍यू टोयोटा ग्‍लान्‍झा ३ वर्षे/ १,००,००० किलोमीटरच्‍या वॉरंटीद्वारे आणि ५ वर्षे/२,२०,००० किलोमीटर पर्यंत वॉरंटी विस्‍ताराचे पर्याय उपलब्‍ध आहेत. आजपर्यंत टोयोटा ग्‍लान्‍झाने ६६ हजारहून अधिक युनिट्‌सची विक्री केली आहे. या अत्‍याधुनिक व नवीन अशा ग्‍लान्‍झाला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वास यावेळी व्‍यक्‍त करण्यात आला आहे.

अजून बातम्या वाचा..

Breaking News