शेअरमार्केट,विमा,बँकिंग क्षेत्रातील संधीबद्दल 20 जुलै रोजी मोफत चर्चासत्र

Jul 18, 2019

नाशिक (प्रतिनिधी) :  आर्थिक साक्षरता आणि त्या क्षेत्रातील उद्योजकता वाढीसाठी शेअरमार्केट,विमा,मुच्युअल फंड्स,बँकिंक इ. क्षेत्रातील संधीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शनिवार दि. 20 जुलै संध्याकाळी 6.30 वाजता उद्योगवर्धिनी,निर्माण इन्स्पायर बिल्डींग, कान्हेरेवाडी,जुन्या सी.बी.एस.समोर,नाशिक येथे मोफत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उद्योगवर्धिनीचे संचालक सुनील चांडक यांनी दिली आहे.या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध तज्ञ उदित इन्वेस्टमेंट चे मुकेश चोथानी, शेअर मार्केट तज्ञ किरण चांडक,इन्शुरन्स क्षेत्रातील प्रसिद्ध योगिता जगधाने ,तसेच उद्योगवर्धिनीचे संचालक सुनील चांडक स्वतः उपस्थित राहणार आहेत.

शेअर-कमोडीटी-करंन्सी,एटीएफ,मुच्युअल फंडस,विमा, इन्शुरन्स,बँकिंग या क्षेत्रात सध्या प्रचंड संधी उपलब्ध असून सुशिक्षित बेरोजगार तसेच नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हि सुवर्णसंधी आहे. ह्या क्षेत्रातील व्यवसाय करण्यासाठी संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. दररोज लाखो कोटींचा व्यवसाय या क्षेत्रात होत असून आर्थिक क्षेत्रातील सल्लागारांची खूप मोठी आवश्यकता आहे. त्या सर्व क्षेत्रातील सर्वांगीण माहिती आणि अभ्यास करून व्यवसाय केल्यास स्वतः बरोबर इतरांचा सुद्धा विकास करता येईल. ह्या दृष्टीकोनातून टाटा कॅपिटलमार्फत निवडक लाभार्थींना पुरस्कृत केले जाईल आणि त्यांना नाममात्र शुल्कामध्ये 45दिवसाचे सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण कार्याक्रमाची माहितीदेखील या कार्यक्रमात दिली जाणार आहे.सुशिक्षित बेरोजगार,तरुण-तरुणी, गृहिणी, नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे क्षेत्र अतिशय आकर्षक असून एक चांगल उत्पन्नाचा स्त्रोत यातून निर्माण होऊ शकतो. मागील 2 वर्षात याआधी 300 हून अधिक प्रशिक्षार्थीनी 45 दिवसाच्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वतःचे व्यवसाय सुरु केले आहेत

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News