नाशिक : विकेल ते पिकेल याप्रमाणे शेतकऱ्यांनी बाजारात मागणी असलेले पीक हमखास भावासाठी घ्यावे. तसेच शेतीत प्रयोग व्हावेत, पण काही पिकांचे जुने वाण आरोग्यदायी आहेत, हेही पहावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
कृषि विभागातर्फे राज्यस्तरीय कृषि वितरण पुरस्कार समारंभ दिंडोरी रोडवरील आरोग्य विज्ञान विद्यापीठात सोमवारी (दि.2) झाला. याप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे याप्रसंगी ऑनलाईन सहभागी होत बोलत होते. विद्यापीठातील कार्यक्रमात व्यासपीठावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादासाहेब भुसे, पालकमंत्री छगन भुजबळ, रोजगार हमी योजनामंत्री संदिपान भुमरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषी राज्यमंत्री डाॅ. विश्वजित कदम, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, धीरजकुमार आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडित, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीक स्पर्धा विजेते, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न आदी पुरस्कारांचे वितरण झाले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, अन्नदाता सुखी असेल तर देश सुखी असतो. तुम्ही शेतकरी देशाचे वैभव आहात. संकटात नेहमी ताठपणे उभे राहतात. शेतकऱ्यांच्या जगणे सुसह्य करणे हे सरकारचे कामच आहे. गावातील पाणंद रस्ते मुख्य रस्त्यांना जोडण्याचा प्रयत्न आहे.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे कृषी राज्य आहे. येथील चांगल्या प्रकारे होत असलेली शेती पाहण्यासाठी आपण उत्तराखंडमधील शेतकऱ्यांना बोलावले आहे. दुष्काळात परदेशातील सडलेले धान्य आपण खाल्ले. पण, आता शेतीतील प्रगतीने आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो आहोत. अगदी या कृषी मालाची निर्यातही होत आहे.
पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या शेतकऱ्यांनाही विकासात आपल्या बरोबर घ्यावे, हे पुण्याचे काम ठरेल. पाणीटंचाईत ठिबक सिंचन उपयोगी आहे. कृषी विद्यापीठ शेतकरी उपयोगी ठरावेत. शेतकऱ्यांनी शेती करून देशाला वाचवले, असल्याचेही कोश्यारी यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, संकटकाळात सरकार शेतकऱ्यांना मदत करतच असते. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यावर दोन लाखांवरील कर्ज पण माफ केले जाईल. कोरोना काळात सिद्ध झाले की, शेती हेच शाश्वत विकासाचे केंद्र आहे. शेतकऱ्यांनी आर्थिक नियोजन करावे. विकेल तेच पिकवणे आवश्यक आहे. कमी पाण्यात येणारे, रोगाला कमी बळी पडणाऱ्या वाणांचे संशोधन गरजेचे आहे, त्यावर सरकारचे काम सुरू आहे. कृषीला जोड धंदे असावेत. रासायनिक औषधे अधिक फवारलेली पिके मानवास अपायकारक आहेत. त्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहे. हे टाळण्यासाठी सेंद्रिय शेती करावी. शेतमाल रसायनमुक्त असावा. अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणांचे संगोपन करावे लागेल.
रानातील ऊस संपेपर्यंत कारखाने चालू ठेवणार आहोत. मात्र हे लक्षात घ्यावे की, साखरेचे उत्पादन जास्त झाले आहे. उसापासून इथेनॉल निर्मिती व्हायला हवी. ऊर्जा टंचाईमुळे शेतीत सोलर प्रकल्पांवर काम करणे आवश्यक आहे. पुण्यामध्ये 250 कोटी रुपये खर्च करून कृषी भवन बांधणार आहोत. हवामानाची माहिती बांधावरच देणारी व्यवस्था करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शेतीचे यांत्रिकिकरण आवश्यक आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे हंगाम पुढे जाण्याची शक्यता आहे.
महसूल मंत्री थोरात म्हणाले की, हा अविस्मरणीय समारंभ आहे. महाराष्ट्रातील शेती विविधता येथे आली आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. तो नेहमीच हजार संकटांना तोंड देत असतो. सरकरची ई-पीक पाहणी उपयोगी आहे. त्यातून सुलभ व तात्काळ माहिती उपलब्ध होईल. त्यामुळे भविष्यकाळातील शेतीसाठीचे नियोजन करणे सोयीचे होईल. हा इतर राज्यांनाही मार्गदर्शक उपक्रम आहे.
`कापूस कोंड्याची गोष्टʼ या चित्रपटाची प्रेरणा असलेल्या नागपूर येथील शेतकरी सुनंदा सालोटकर म्हणाल्या की, सुशिक्षित तरुण-तरुणींनी शेती केली तर शेती भरारी घेईल. तसेच शेतीस पूरक जोडधंदे करा. शेतीमाल प्रक्रिया उद्योग करा व विक्रीचे काम स्वतःच करा.
कृषिमंत्री भुसे प्रास्ताविक करताना म्हणाले की, शेतमाल कसा विकायचा याचा कृषी विभागाने स्वतंत्र टास्क फोर्स तयार केला आहे. तसेच जे विकेल ते पिकवण्यासाठी क्रॅपिंग पॅटर्न तयार करीत आहोत.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...





