वोल्क्सवॅगन आणि महिंद्रामध्ये भागीदारी करार

May 20, 2022

चेन्नईमध्ये एमईबी इलेक्ट्रिक कम्पोनंट्सच्या वापरासंदर्भात करणार एकत्र काम

नाशिक : महिंद्राच्या नव्या “बॉर्न इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म”साठी एमईबी इलेक्ट्रिक कम्पोनंट्सचा वापर कसा करता येईल यावर वोल्क्सवॅगन आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड काम करत आहेत. समन्वयपूर्वक काम करण्यासाठी १८ मे रोजी भागीदारी करार केल्याची घोषणा या दोन्ही कंपन्यांनी केली आहे. इलेक्ट्रिक मोटर्स, बॅटरी सिस्टिम कम्पोनंट्स आणि बॅटरी सेल यासारख्या एमईबी इलेक्ट्रिक कम्पोनंट्सनी आपला “बॉर्न इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म” सुसज्ज करण्याचे महिंद्राचे उद्दिष्ट आहे. भागीदारी करारामध्ये समन्वयाच्या व्याप्तीचे मूल्यांकन करण्यात आले आहे, यामध्ये मूल्यांकन टप्प्यासाठी बंधनकारक नियम तसेच पुरवठ्याची अबंधनकारक व्याप्ती देखील सूचित करण्यात आली आहे. बंधनकारक पुरवठा करारासंदर्भात विधायक आणि कायदेशीर पद्धतीने वाटाघाटी केल्या जातील व तो २०२२ च्या अखेरपर्यंत पूर्ण केला जाईल. ओपन वेहिकल प्लॅटफॉर्म म्हणून तयार करण्यात आलेला एमईबी इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म आणि त्याच्या कम्पोनंट्समुळे कार उत्पादकांना इलेक्ट्रीफाईड वाहनांचा त्यांचा पोर्टफोलिओ पटकन आणि खर्चात बचत करून उभारता येतो.

ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या बाजारपेठांपैकी एक आणि मोबिलिटी क्षेत्राच्या जागतिक डिकार्बनायजेशनमध्ये प्रमुख घटक असलेल्या, भारतातील ऑटोमोटिव्ह बाजारपेठेला चालना देणे हे समान उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या दोन्ही कंपन्या काम करत आहेत.

वोल्क्सवॅगन ग्रुप बोर्ड ऑफ मॅनेजमेंट मेंबर फॉर टेक्नॉलॉजी आणि वोल्क्सवॅगन ग्रुप कम्पोनंट्सचे सीईओ थॉमस स्चमॉल म्हणाले, “महिंद्रा ही भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटी उद्योगक्षेत्रातील आघाडीची कंपनी आणि आमच्या एमईबी इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मसाठी उत्कृष्ट भागीदार आहे. वृद्धी आणि विकासाच्या असंख्य संधी उपलब्ध असलेली, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने प्रमुख मानली जाणारी, ऑटोमोटिव्ह क्षेत्राची प्रचंड मोठी बाजारपेठ म्हणजे भारतात इलेक्ट्रीफिकेशन घडवून आणण्यात महिंद्रासोबत लक्षणीय योगदान देण्याची आमची इच्छा आहे. एमईबी तंत्रज्ञानदृष्ट्या आधुनिक आणि खर्चाच्या बाबतीत अतिशय स्पर्धात्मक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अशाप्रकारे एमईबी लक्षणीय व्हॉल्युम आणि उत्पादन वाढवून खर्चात बचत साध्य करून ई-मोबिलिटीसाठी आघाडीचा ओपन प्लॅटफॉर्म म्हणून एमईबी विकसित होत आहे. ईव्ही क्षेत्रातील प्रत्येक कंपनीसाठी ते महत्त्वाचे आहे आणि आमच्या ग्राहकांना स्पर्धात्मक सुविधा उपलब्ध करवून देण्याची गुरुकिल्ली देखील हीच आहे.”
या भागीदारीबाबत प्रतिक्रिया देताना महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटो अँड फार्म सेक्टर्सचे कार्यकारी संचालक श्री. राजेश जेजुरीकर यांनी सांगितले, “आमचे महत्त्वाकांक्षी बॉर्न इलेक्ट्रिक व्हिजन पूर्ण करण्यासाठी धोरणात्मक भागीदार म्हणून इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रातील महत्त्वाचे जागतिक गुंतवणूकदार वोल्क्सवॅगनची साथ आम्हाला मिळत आहे ही खूप आनंदाची बाब आहे. विशाल तंत्रज्ञान, नावीन्य आणि सर्व विभागांमधील एकीकरण हे सर्व आमच्या आधुनिक बॉर्न इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मसाठी अनुकूल ठरेल आणि त्याच्या विकासासाठी एक संरचना पुरवेल. लवकरच युकेच्या ऑक्सफर्डशायरमध्ये हे सादर केले जाणार आहे. भारत, युके आणि डेट्रॉईटमधील आमच्या टीम्स एक अद्भुत भविष्य निर्माण करण्यासाठी अथक प्रयत्नशील आहेत.”

दरवर्षी तब्बल ३ मिलियन वाहनांसह भारत जागतिक पातळीवरील पहिल्या ५ ऑटोमोटिव्ह बाजारपेठांपैकी एक आहे. सध्याच्या अनुमानांनुसार, २०३० पर्यंत ही बाजारपेठ ५ मिलियन वाहनांचा टप्पा गाठेल. आजवर या बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वरचष्मा होता. २०२१ च्या ग्लासगो क्लायमेट चेंज समिटमध्ये भारताने २०३५ पासून फक्त शून्य-उत्सर्जन पॅसेंजर कार आणि व्हॅन्स चालवल्या जातील हे वचन स्वीकारले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात पॅसेंजर कार क्षेत्राचे इलेक्ट्रीफिकेशन जोमाने वाढेल अशी अपेक्षा आहे. उद्योगक्षेत्रातील तज्ञांचे अनुमान आहे की २०३० मध्ये नव्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त वाहने पूर्णपणे इलेक्ट्रिक असतील.

वोल्क्सवॅगनचा एमईबी इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म हा वोल्क्सवॅगन, ऑडी, स्कोडा आणि सीट/कप्रा हे ग्रुप ब्रँड्स तसेच बाहेरील काही भागीदार देखील वापरत आहेत. या भागीदारींची सर्व जबाबदारी याच कामासाठी तयार करण्यात आलेल्या “प्लॅटफॉर्म बिझनेस” युनिटवर सोपवण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News