ग्‍लेनमार्क फार्मास्‍युटिकल्‍स मार्फत ‘ मे ‘ महिना हायपरटेंशन अवेअरनेस मंथ म्‍हणून साजरा

May 26, 2022

नाशिक : ग्‍लेनमार्क फार्मास्‍युटिकल्‍स लिमिटेड (ग्‍लेनमार्क) या नवोन्‍मेष्‍कार-केंद्रित जागतिक फार्मास्‍युटिकल कंपनीने मे महिना हायपरटेंशन अवेअरनेस मंथ म्‍हणून साजरा केला. ग्लेनमार्कने देशभरातील ५० शहरांमधील ८००० हून अधिक हॉस्पिटल्‍स व क्लिनिक्‍समधील १८,००० हून अधिक आरोग्यसेवा व्यावसायिकांसोबत (एचसीपी) सहयोग केला आणि हायपरटेंशन (उच्‍च रक्‍तदाब) बद्दल जनजागृती करण्यासाठी ११० हून अधिक जनजागृती रॅली आणि ८००० तपासणी शिबिरांचे आयोजन केले.
रॅलीजमध्‍ये उच्‍च रक्‍तदाबाची लक्षणे, चिन्‍हे, तसेच प्रतिबंधात्‍मक उपायांबाबत एचसीपीच्‍या सविस्‍तर चर्चासत्राचा समावेश होता आणि त्‍यानंतर सामान्‍य जनतेसाठी तपासणी शिबिरांचे आयोजन करण्‍यात आले. वैद्यकीय क्षेत्र व जनतेने संपूर्ण उपक्रमाचे भरभरून कौतुक केले; या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून कंपनी २ लाखांहून अधिक प्रौढ व्‍यक्‍तींमध्‍ये जागरूकतेचा प्रसार करण्‍यास यशस्‍वी ठरली.
या उपक्रमाबाबत सांगताना ग्‍लेनमार्कचे समूह उपाध्‍यक्ष आणि इंडिया फॉर्म्‍युलेशन्‍सचे प्रमुख आलोक मलिक म्‍हणाले, ”हा महिनाभर चाललेला उपक्रम आमचा देशातील या सायलेण्‍ट किलर आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न आहे. या आजारीची चेतावणी देणारी चिन्‍हे किंवा लक्षणे क्‍वचितच दिसून येतात. इंडिया कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने नुकतेच केलेल्‍या सर्वेक्षणानुसार प्रत्‍येक तीन पैकी एका भारतीय प्रौढ व्‍यक्‍तीला उच्‍च रक्‍तदाब आहे. हायपरटेंशन व्‍यवस्‍थापनामधील अग्रणी म्‍हणून ग्‍लेनमार्क दरवर्षी लाखो व्‍यक्‍तींना होणा-या या आजाराविरोधात देशाच्‍या लढ्यामध्‍ये प्रत्‍येक संभाव्‍य पाऊल उचलण्‍याप्रती कटिबद्ध आहे.”
उल्‍लेखनीय व अँटी-हायपरटेंशन औषध टेल्‍मा®चे नवप्रवर्तक म्‍हणून ग्‍लेनमार्क भारतीय लोकांमध्‍ये या आजाराबाबत जागरूकता व निदान करण्‍यामध्‍ये आघाडीवर आहे. अगदी नुकतेच कंपनीने १८ वर्षांवरील भारतीय प्रौढ व्‍यक्‍तींमध्‍ये उच्‍च रक्‍तदाबाबात जागरूकता निर्माण करण्‍यासोबत तपासणी करण्‍यासाठी #TakeChargeAt18 मोहिम सुरू केली. कंपनी स्‍वत:चे डिजिटल व्‍यासपीठ www.bpincontrol.in सह विविध माध्‍यमांच्‍या माध्‍यमातून १.२ दशलक्षहून अधिक भारतीय प्रौढ व्‍यक्‍तींपर्यंत पोहोचली आहे. २०२० मध्‍ये ग्‍लेनमार्कने एचएसआय (हायपरटेंशन सोसायटी ऑफ इंडिया) आणि एपीआय (असोसिएशन ऑफ फिजिशियन्‍स ऑफ इंडिया) यांच्‍यासोबत सहयोगाने जगातील पहिलेच हायपरटेंशन जागरूकता प्रतीक ‘द बीपी लोगो’ लाँच केले.
उच्‍च रक्‍तदाब हा कार्डियोव्‍हॅस्‍कुलर डिसीजेज (सीव्‍हीडी), विशेषत: इस्‍केमिक हार्ट डिसीज व स्‍ट्रोकसाठी सर्वात धोकादायक घटक आहे. सध्‍या असा अंदाज आहे की, भारतातील एकूण मृत्‍यंपैकी २८.१ टक्‍के मृत्‍यू सीव्‍हीडीमुळे झाले आणि उच्‍च सिस्‍टोलिक ब्‍लड प्रेशर (एसबीपी) डिसॅबिलिटी-अॅडजस्‍टेड लाइफ इअर्स (डीएएलवाय) साठी एकमेव सर्वात मोठा कारणीभूत घटक (८.५ टक्‍के) होता. २०२५ पर्यंत १८ वर्षे व त्‍यावरील वयाच्‍या व्‍यक्‍तींमधील उच्‍च रक्‍तदाबाचे (बीपी) प्रमाण २५ टक्‍क्‍यांनी कमी करण्‍याचे जागतिक आरोग्‍य संघटनेचे लक्ष्‍य बीपी असलेल्‍या लोकांना ओळखून त्‍यावर उच्‍च नियंत्रण प्राप्‍त करणा-या धोरणांच्‍या संयोजनामधून साध्य शकते

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News