टाटा पॉवर सोलारने नाशिकमध्ये शुभारंभ केला आपल्या सोलार रूफटॉप अभियानाचा

Jun 29, 2019

टाटा पॉवरसोलार याटाटापॉवरच्यासंपूर्णपणेमालकीच्याउपकंपनीनेतसेचभारतातीलसर्वांतमोठ्यासौरऊर्जाकंपनीने आपले राष्ट्रव्यापी निवासी सोलार रूफटॉपअभियान सुरू केले आहे. या अभियानाचा शुभारंभआज नाशिक शहरात करण्यात आला. देशभरातीलनागरिकांना निवासी सोलार रूफटॉप सोल्युशन अंमलातआणण्याची प्रेरणा देण्यासाठी हे अभियान राबवले जातआहे. हे अभियान देशभरातील १०० शहरांमध्येराबवण्याचा कंपनीचा विचार आहे. तसेच यातून दरवर्षीप्रति किलोवॅट ५०,००० रुपयांपर्यंत रकमेची बचत होणेअपेक्षित आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी श्री. सूरज डी. मांढरे यांच्यासह अनेकमहत्त्वाचे सरकारी अधिकारी तसेच उद्योगक्षेत्रातीलमहत्त्वपूर्ण निर्णयकर्त्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहूनकार्यक्रमाची शोभा वाढवली.
 
या अभियानाला पाठिंबा देण्यासाठी तसेच या याबद्दलअधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी टाटा पॉवरसोलारने शहरात एका सायकल रॅलीचे आयोजन केलेआहे. याद्वारे शहरातील नागरिकांना सौरऊर्जा वापराचेलाभ सांगितले जातील. याशिवाय, हा उपक्रम स्थानिककार्यक्रमांना जोडण्यात आला आहे. याद्वारे ग्राहकांनानूतनीकरणीय ऊर्जेचे महत्त्व समजावून दिले जाईल.#PledgeForSolar हे अभियान भारतातील जनतेलासकारात्मक बदल स्वीकारून सौरऊर्जा वापराकडेवळण्यासाठी प्रेरणा देत आहे.
 
दर्जेदार उत्पादने, जागतिक दर्जाची कस्टमाइझ्डसोल्युशन्स आणि विस्तृत सेवेद्वारे साध्य झालेले ग्राहकसमाधान यांद्वारे ग्राहकांशी दृढ नातेसंबंध विकसितकरण्याच्या टाटा पॉवर सोलारच्या कौशल्यावर याउपक्रमामुळे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी टाटा पॉवर सोलारनेवाहून घेतले असून, निवासी रूफटॉप सोल्युशनमुळेडिझेल जनरेटर्सचा वापर कमी होत आहे आणि पर्यायानेइंधनाची आणखी बचत होत आहे. कंपनीकडे आधीचदेशभरात १५०हून अधिक विक्री व सेवा चॅनल पार्टनर्सचेदमदार जाळे आहे. हे चॅनल पार्टनर्स कंपनीच्यामौल्यवान ग्राहकांना वित्तसहाय्याचे पर्याय पुरवत आहेत.
 
अलीकडेच टाटा पॉवर सोलारने पावागड सोल पार्कमध्ये४०० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प यशस्वीरित्या सुरू केला.याशिवाय, टाटा पॉवर सोलारकडे एका ठिकाणी स्थितअसा जगातील  सर्वांत मोठा रूफटॉप प्रकल्प कार्यान्वितकरण्याची तसेच कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावरभारतातील सर्वांत मोठा कारपोर्ट बसवण्याची यशस्वीपार्श्वभूमी आहे. टाटा पॉवर सोलारने क्रिकेट क्लब ऑफइंडियाच्या सहयोगाने जगातील सर्वांत मोठे सौरऊर्जेवरचालणारे क्रिकेट स्टेडिअम मुंबईत कार्यान्वित केले, तेहीकेवळ १०० दिवसांच्या विक्रमी कालावधीत.
 
टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. प्रवीर सिन्हा याउपक्रमाबद्दल म्हणाले, “#PledgeForSolar हा नवीनउपक्रम ग्राहकांना अधिक स्वच्छ व पर्यावरणपूरक ऊर्जावापरण्यासाठी प्रोत्साहन देईल. सुलभ तसेचकिफायतशीर मार्गाने वीजनिर्मिती करण्याची मुभादेणारा सोलार रूफटॉप कार्यक्रम आमच्या देशभरातीलग्राहकांना देता आला याबद्दल आम्हाला आनंद आहे.नाशिकच्या सर्व ग्राहकांनी या सेवेचा पूर्ण लाभ घ्यावा,असे आवाहन मी करतो.”
 
टाटा पॉवरच्या रिन्युएबल्स विभागाचे अध्यक्ष श्री.आशिष खन्ना यावेळी म्हणाले, “#PledgeForSolarया नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही निवासीग्राहकांना सोलार रूफटॉप प्रकल्प कार्यान्वित करण्याचेफायदे समजावून देण्याचा तसेच त्यांना दर्जेदार सोलाररूफटॉप स्थापनेचा दर्जा पटवून देण्याचा प्रयत्न करतआहोत. अशा उपक्रमांमुळे तसेच आमच्या किफायतशीररूफटॉप सोल्युशन्समुळे पुढे ग्राहकांना विजेच्यासंवर्धनात आणि विजेसाठीचा खर्च वाचवण्यात मदतहोईल, अशी आशा वाटते. यामुळे आमच्या कंपनीचेभारतातील पहिल्या क्रमांकाची रूफटॉप सोलार कंपनीहोण्याचे उद्दिष्टही साध्य करण्यात मदत मिळेल.”

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News