नाशिक : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी रामदास खेडकर यांनी 22 जुलै 2019 पर्यंत रात्री 12.00 वाजेपर्यंत मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश लग्नकार्य, धार्मिक कार्यक्रम, आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास संबंधीत तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांची रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...





