नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे श्रावणी सोमवार निमित्त 2 ते 30 ऑगस्ट 2019 या कालावधीत यात्रा भरते. यात सुमारे 5 ते 7 लाख भाविक दर्शनासाठी व प्रदक्षिणेसाठी येतात. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून व सध्या देशात होत असलेल्या देशविघातक कारवायांच्या पार्श्वभूमीवर यात्रेकरुंनी दक्षता घ्यावी. भाविकांनी कमीत कमी सामान आणावे, यात्रेकरुनी मौल्यवान चीज वस्तु सोबत आणु नये, बॅग, पिशव्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदीरात नेणे मनाई असल्याने सोबत आणु नये, कुठल्याही बेवारस वस्तुला स्पर्श करु नये, वाहने अधिकृत पार्कींगच्या ठिकाणीच पार्क करावीत, अफवांवर विश्वास न ठेवणी कोणी अफवा पसरवत असल्यास पोलीसांना तात्काळ कळवावे व सूचनांचे पालन करुन पोलीसांना सहकार्य करावे ,असे आवाहन डॉ.आरती सिंह पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण यांनी केले आहे.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...




