नाशिक : सीएट टायर्स, हा भारतामधील अग्रगण्य टायर निर्माता जागतिक पर्यावरण दिन 2022 चे औचित्य साधून बीजगोळ्यांची निर्मिती (सीडबॉल मॅन्युफॅक्चरिंग) करत निसर्ग संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करते आहे. सर्व सीएट प्रकल्पांच्या ठिकाणी बीजगोळे निर्मितीचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये नाशिक, भांडुप, नागपूर, अंबरनाथ, हलोल आणि चेन्नई प्रकल्पांत 1000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग पहायला मिळाला.
सीएटने कायमच नैसर्गिक स्रोत संवर्धन आणि प्रभावी मॅनेजमेंटमध्ये पुढाकार घेतला आहे. यंदाचा बीजगोळे उपक्रम एक असा उपक्रम आहे, जो जागतिक दिनाच्या ‘एकमेव पृथ्वी’ संकल्पनेचा पुरस्कार करतो. पर्यावरणीय समस्या वाढत असताना निसर्ग आणि कृत्रिम स्त्रोतादरम्यान संतुलन राखणे महत्त्वाचे ठरते. सीएटचे उद्दिष्ट 15,000 ते 20,000 बीजगोळे बनवण्याचे असून ते प्रकल्पाच्या अवती भोवती रुजविण्यात येणार आहेत. ज्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होऊन हरित पट्ट्यात वाढ होईल.

सीएट – सीओओ अर्णब बॅनर्जी म्हणाले, “पर्यावरणाशी संबंधित समस्या वाढत असताना भावी पिढ्यांवर होणारे विपरीत परिणाम रोखायचे असल्यास निसर्गाशी समतोल राखायची हीच वेळ आहे. सीएटमध्ये, आमचे त्वरीत ध्येय हे 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 50% ने कमी करण्याचे आहे. आमच्या निर्मिती आणि उत्पादन वापरामुळे पर्यावरणावर येणारा वाढता ताण कमी करण्यासाठी विविध यंत्रणांसह आम्ही काम करत आहोत.”
सीएटनेविविध उपक्रमांमार्फत शाश्वत मूल्यांची वचनबद्धता जपली आहे. वृक्षारोपण, हरित उर्जेवर जनजागृती मोहिम, निवासी परिसरांत ई-कचऱ्याचे व्यवस्थापन करून हरित कवच वाढवायचे आहे. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन विद्या सहयोग संस्थेचे श्री उमेश शिंदे यांनी केले. निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी कंपनी वचनबद्ध असून आपल्या सहयोगीना पर्यावरण संवर्धन आणि अधिक शाश्वत जगण्याला प्रोत्साहन
देते.






