हिमालय वेलनेस व SEBC लावणार १ दशलक्ष झाडे

Jun 9, 2022

  • वर्ष 2023 पर्यंत भारतात 1 दशलक्ष झाडे लावण्याच्या हिमालया कंपनीच्या वचनबद्धतेला साजेसा उपक्रम
  • पश्चिम घाट, पूर्व घाट, मेघालय आणि कर्नाटकमध्ये 800,000 हून अधिक झाडे लावली गेली आहेत                                                         

  नाशिक : जैवविविधता जपण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारताच्या अग्रगण्य वेलनेस ब्रॅण्ड्सपैकी एक असलेल्या हिमालया वेलनेस कंपनीने महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये देशी झाडांची आणखी 100,000 रोपे लावण्यासाठी सोसायटी फॉर एन्व्हायर्नमेंट अँड बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन (SEBC)बरोबर भागीदारी केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून या प्रांतांमधील जैवविविधतेने समृद्ध जंगलांचे संवर्धन आणि जतन करण्याचा हिमालयाचा हेतू आहे.
वर्ष 2012 पासून लावण्यात आलेल्या 800,000 रोपांमध्ये या 100,000 रोपांची भर करण्यात आली आहे, ज्यात वृक्षांच्या दुर्मिळ, नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या, वृक्षतोडीची भीती असलेल्या 89 हून अधिक जातींचा समावेश आहे. वनीकरणाच्या या कार्यक्रमामुळे नष्ट झालेली वन्यजीवसंपदा पुन्हा भरभराटीस येण्यास व पर्यावरणीय संतुलन पुन्हा एकदा प्रस्थापित होण्यास मदत होणार आहेच, पण त्याचबरोबर स्थानिक पातळीवर जमिनीतील आर्द्रतेची पातळीसुद्धा हळूहळू सुधारणार आहे. हिमालयाने एसईबीसी(SEBC)सोबत सातत्याने जपलेल्या या सहयोगामधून पर्यावरणाचे संवर्धन करण्याप्रती आणि हरित वसुंधरा घडविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये अग्रेसर राहण्याप्रती कंपनीची कटिबद्धता अधोरेखित झाली आहे. या कार्यक्रमाद्वारे स्थानिक समुदायांमध्ये आपल्या भौगोलिक प्रदेशाविषयी जागरुकताही निर्माण केली जात आहे व त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधीही निर्माण केल्या जात आहेत. या वनीकरण मोहिमेत लावल्या जाणाऱ्याझाडांमध्ये अशोक, कडूनिंब, बांबू, अंजिर, गुग्गुलू, मेस्वाक, पिंपळ आणि मोरिंगा या स्थानिक झाडांच्या रोपांचा समावेश आहे.
या उपक्रमाविषयी बोलताना हिमालया वेलनेस कंपनीचे डिरेक्टर ऑफ ह्युमन रिसोर्सेस श्री. केजी उमेश म्हणाले, “वसुंधरेची काळजी घेण्याप्रती जपलेली निष्ठा – पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचा ध्यास हे हिमालयाच्या कार्यपद्धतीच्या केंद्रस्थानी असलेले मूल्य आहे. शाश्वत कार्यपद्धतींमध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे असे आम्ही मानतो. वर्ष 2023 पर्यंत भारतभरात 1 दशलक्ष झाडे लावण्याचा आमचा हेतू आहे. गेल्या दशकापासून जैवविविधतेशी संबंधित अनेक उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. वृक्षारोपण आणि जैवविविधतेचे संवर्धन या क्षेत्रामध्ये सकारात्मक हस्तक्षेपाला मोठा वाव आहे आणि या कामी भागीदारीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.”
“गेल्या अनेक वर्षांपासून हिमालयाबरोबर सुरू असलेली आमची भागीदारी शाश्वत आणि हरित भविष्याची उभारणी हे हिमालया आणि एसईबीसीया दोघांचेही समान ध्येय असल्याचे द्योतक आहे. सामाजिक वनीकरणाचा हा प्रकल्प म्हणजे पृथ्वीचे हरित कवच जपण्याचा हा एक प्रयत्न आहेच, पण त्याशिवाय स्थानिक समुदायांना त्याचा फायदा होईल याची काळजीही यातून घेतली जात आहे”, असेएसईबीसीचे अध्यक्ष डॉ. श्रीनाथ कावडे सांगतात.
पश्चिम घाट हे जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा जगातील आठ स्थळांपैकी एक स्थळ आहे, जिथे सपुष्प वनस्पतींच्या 1,500 हून अधिक दुर्मिळ प्रजाती आहे व मासे, उभयचर प्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि सस्तन प्राण्यांच्या किमान 500 अनोख्या जाती आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र या घाटांचे क्षेत्र 25 टक्क्यांनी आक्रसले आहे, जी एक गंभीर चिंतेची बाब आहे. म्हणूनच शाश्वत कार्यपद्धतींमध्ये गुंतवणूक करणे अत्यावश्यक आहे आणि स्वयंसेवी संस्था व विद्यापीठांच्या मदतीने वृक्षारोपण उपक्रम राबवत जैवविविधता जपण्याच्या प्रश्नाकडे लक्ष पुरविण्याचे हिमालयाचे लक्ष्य आहे.

अजून बातम्या वाचा..

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
“संविधान विचार जागर ” स्पर्धा परीक्षा २०२५ ची घोषणा ; स्पर्धकांसाठी तीन गट ,गट अ इयत्ता सातवी ते दहावी, गट ब ११ ते पदवी तसेच गट क सर्वांसाठी खुला

“संविधान विचार जागर ” स्पर्धा परीक्षा २०२५ ची घोषणा ; स्पर्धकांसाठी तीन गट ,गट अ इयत्ता सातवी ते दहावी, गट ब ११ ते पदवी तसेच गट क सर्वांसाठी खुला

नाशिक : विविध धर्म, जाती, संस्कृती, भाषा यांमध्ये विखुरलेल्या भारतीय समाजाला एका सूत्रामध्ये...

read more
ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेडने आदिवासी शाळांना दिले  संगणक दान

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेडने आदिवासी शाळांना दिले संगणक दान

नाशिक – ग्रामीण शिक्षणातील डिजिटल दरी कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ईएसडीएस...

read more
Breaking News