भारतातील सर्वात मोठी स्‍कूल लीडकडून अभिनेते आर. माधवन यांच्‍यासह व्‍यक्तिमत्त्व विकासावरील मास्‍टरक्‍लासची घोषणा

Jun 14, 2022

नाशिक: भारतातील लहान शहरांमधील विद्यार्थ्‍यांना न मिळणारे अद्वितीय अनुभव, एक्‍स्‍पोजर व शिक्षण देण्‍याच्‍या प्रयत्‍नांचा भाग म्‍हणून भारतातील सर्वात मोठी स्‍कूल एडटेक कंपनी लीडने आज प्रख्‍यात अभिनेता-दिग्‍दर्शक आर. माधवन यांच्‍यासोबत व्‍यक्तिमत्त्व विकासावरील विशेष मास्‍टरक्‍लास सिरीजची घोषणा केली. भारतातील ४०० हून अधिक नगर व शहरांमधील लीड-पॉवर्ड शाळांच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी आर. माधवन शिक्षक व मार्गदर्शक बनले. त्‍यांच्‍या त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या जीवनामधील किस्‍से सांगितले, तसेच व्‍यक्तिमत्त्व विकासाची कला व शास्त्रासह सादरीकरण कौशल्‍ये, देहबोली व सामाजिक शिष्‍टाचार याबाबत देखील मार्गदर्शन केले.

लीडच्‍या विद्यार्थ्‍यांसोबत व्‍हर्च्‍युअल परस्‍परसंवादादरम्‍यान माधवन यांनी विकसित मानसिकता निर्माण करण्‍यासाठी, आत्‍मसन्‍मान निर्माण करण्‍यासाठी आणि जीवनाच्‍या प्रत्‍येक पैलूमध्‍ये यशाचा मार्ग रचण्‍यासाठी व्‍यक्तिमत्त्व विकास किती महत्त्वाचे आहे याबाबत स्‍पष्‍ट केले. तसेच त्‍यांनी योग्‍य शालेय शिक्षणामुळे सर्वांगीण विकास होण्‍यासोबत आत्‍मविश्‍वास निर्माण होण्‍यास कशाप्रकारे मदत होऊ शकते याबाबत देखील त्‍यांचे मत व्‍यक्‍त केले.

लीडचे सह-संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुमीत मेहता म्‍हणाले, ”हे प्रमाणित आहे की भारतातील द्वितीय श्रेणीच्‍या शहरांमधील विद्यार्थ्‍यांना एक्‍स्‍पोजर व अध्‍ययन संधी उपलब्‍ध करून दिल्‍या तर ते मेट्रो शहरांमधील त्‍यांच्‍या सहकारी विद्यार्थ्‍यांप्रमाणे उज्‍ज्‍वल कामगिरी करू शकतात. लीडच्‍या मास्‍टरक्‍लाससह लहान शहरांमधील विद्यार्थी आर. माधवन यांच्‍यासारख्‍या सुप्रसिद्ध विषय तज्ञ व व्‍यक्तिमत्त्वांकडून भावी जीवनविषयक कौशल्‍ये शिकू शकतात. प्रत्‍येक मुलाला दर्जेदार शिक्षण किफायतशीरपणे उपलब्‍ध करून देणे हा आमच्‍या मिशनचा महत्त्वपूर्ण भाग आहे.”

आर. माधवन म्‍हणाले, ”मला लीडच्‍या मास्‍टरक्‍लासचा भाग होण्‍याचा आनंद होत आहे, ज्‍यामुळे मला माझ्या जीवनातील अनुभव सांगत तरूणांना प्रोत्‍साहित व प्रेरित करण्‍याची संधी मिळाली आहे. भारतातील शाळांनी लहानपणापासूनच व्‍यक्तिमत्त्व विकासासारख्या भविष्यातील कौशल्यांचा पाया रचला पाहिजे, कारण अशी कौशल्‍ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आजच्या काळात शाळांनी सर्वांगीण शिक्षणाचे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे, जे विद्यार्थ्यांना भावी आत्मविश्‍वासू लीडर्स बनण्यास सक्षम करते.”

लीड-पॉवर्ड शाळांच्‍या विद्यार्थ्‍यांनी काळजीपूर्वक लक्ष दिले, जेथे माधवन यांनी जीवनातील यशासाठी त्‍यांचे स्‍वत:चे सिक्रेट मंत्र, तसेच पहिलीच उत्तम छाप कशाप्रकारे निर्माण करावी, योग्‍य देहबोलीचे महत्त्व आणि आत्‍मविश्‍वसाने संवाद साधण्‍याबाबतच्‍या टिप्‍स यांबाबत सांगितले.

लीडची मास्‍टरक्‍लास सिरीज द्वितीय श्रेणीच्‍या शहरांमधील शालेय विद्यार्थ्‍यांना विषय तज्ञ व सेलिब्रिटींकडून प्रत्‍यक्ष शिकण्‍याची संधी देत सर्वांगीण अध्‍ययन अनुभव देण्‍यासाठी भारतातील पहिला उपक्रम आहे. वैयक्तिक कौशल्‍य व कल यावर आधारित लीडची मास्‍टरक्‍लास सिरीज विद्यार्थ्‍यांना मोठे स्‍वप्‍न पाहण्‍यास प्रोत्‍साहित करते आणि त्‍यांच्‍यामध्‍ये जीवनातील त्‍यांचे ध्‍येये संपादित करण्‍यासाठी आत्‍मविश्‍वास निर्माण करते. लीड मास्टरक्लासचे धडे यापूर्वी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, टेनिस चॅम्पियन सानिया मिर्झा आणि दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्‍कर यांसारख्या सेलिब्रिटींनी घेतले आहेत.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News