नाशिक: सॉफ्टवेअर उत्पादने उद्योगातील अग्रणी असलेल्या टॅली सोल्युशन्सने आज पश्चिम विभागासाठी ‘एमएसएमई ऑनर्स‘च्या दुसऱ्या आवृत्तीच्या विजेत्यांची घोषणा केली. अॅग्री सर्च (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, एन आर ब्रदर्स रोलर फ्लोअर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड, एस्पॅलियर स्कूल आणि पॅरामाउंट एंटरप्रायझेस या नाशिकमधील चार कंपन्यांनी २००० जागतिक नामांकनांमधून बाजी मारली.
टॅली एमएसएमई ऑनर्स हा टॅली सोल्युशन्सने राष्ट्रीय आर्थिक स्तरापर्यंत तळागाळात पोहोचणाऱ्या त्यांच्या सर्वोत्तम पद्धतींद्वारे एमएसएमईची विविधता आणि अथक योगदान साजरे करण्यासाठी सुरू केलेला एक उपक्रम आहे. हे सन्मान वर्षातून एकदा आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त दिले जातात आणि २५० कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या आणि वैध जीएसटीआयएन असलेल्या सर्व प्रकारच्या व्यवसायांना लागू होतात.
अॅग्री सर्च (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे प्रदिप मधुकर कोठावडे आणि एन आर ब्रदर्स रोलर फ्लोअर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडचे सागर जैन यांना ‘बिझनेस मेस्ट्रो‘ श्रेणीत गौरविण्यात आले. प्रदिप मधुकर यांना पर्यावरणपूरक वनस्पती संरक्षण उपाय सुविधा प्रदान करताना पिकांच्या पोषणाच्या सर्व गरजा पूर्ण करणारे सेंद्रिय अवशिष्ट-मुक्त शेती उपाय सादर करून स्केलिंग केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. दुसऱ्या बाजूला १९९० मध्ये आपली कंपनी स्थापन करणाऱ्या सागर जैन यांना अनेक बेकरींनी नावाजलेला ब्रँड तयार करणे शक्य झाले आहे. ते गेल्या तीन वर्षांपासून पार्ले बिस्किट प्रायव्हेट लिमिटेडला पुरवठा करत आहेत. उत्पादनांच्या गुणवत्तेवर आणि वाजवी किंमतीवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करून साहित्याची कालबाह्यता तारीख कधीही ओलांडणार नाही याची खात्री करून ते डिजिटल पद्धतीने साठा व्यवस्थापन करतात.
मुलांना सर्वांगीण शिक्षण दिल्याबद्दल ‘चॅम्पियन ऑफ कॉज‘ श्रेणीत एस्पॅलियर शाळेतील सचिन उषा विलास जोशी यांना गौरविण्यात आले. त्यांनी निराधार मुलांना शिक्षित करण्यासाठी अनेक सामाजिक प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यामध्ये झोपडपट्ट्यांमधील मुलांना त्यांच्या दारात शिक्षण देणारी भारतातील पहिली फिरती शाळा ‘एज्युकेशन ऑन व्हील्स आणि महामारीच्या काळात आदिवासी भागातील मुले आणि जिल्हा पंचायत शाळेतील मुलांना मोफत ऑनलाइन शिक्षण ऑनलाइन शैक्षणिक रेडिओच्या द्वारे देणारी ‘रेडिओ एस्पेलियर‘ यांचा समावेश आहे. आतापर्यंत शाळाबाह्य मुलांना ओळखण्यासाठी डिझाइन केलेल्या ‘एव्हरी चाइल्ड काउंट्स‘ नावाच्या अॅपद्वारे ७,००० मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात ते यशस्वी झाले आहेत.
पॅरामाउंट एंटरप्रायझेस (ब्रँड: पॅरेंट नाशिक) मधील श्रीकांत पाटील यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रगत डिजिटल मार्केटिंग तंत्र वापरल्याबद्दल ‘डिजिटल ट्रान्सफॉर्मर‘ श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज त्यांची कंपनी फायदेशीर आहे आणि अनेक देशांमध्ये निर्यात करत आहे.






