Hotel & Spa ,Salon ,Gyam , swimming,Banquet Halls सुविधा एकाच छताखाली
* शुभविवाह कार्यक्रमासाठी उत्तम सोय
* नामांकित कुक राकेश सेठ यांच्या हातची विविध भोजनाची चव घेता येणार
* फुड फेस्टीवलचे आयोजन
* देशात आणखी १०८ शाखा स्थापन करण्याचा मानस
* लोकल फुडचा अस्वाद
नाशिक : काय झाडी,काय डोंगर,एकदम सगंळ झकास असलेल्या गुहाटीतील त्या उदुगाराचे पुन:च्चार पुन्हा नाशिक मध्ये पाहायला मिळणार ते म्हणजे ‘Radisson Blu’ हॉटेल नाशिक मध्ये शुभारंभ करण्यात आले आहे. नाशिकमधील पहिले पंचतारांकित आलिशान हॉटेल रॅडिसन ब्ल्यूने नाशिकची ओळख पर्यटन स्थळ आणि खादयपदार्थाचे डेस्टिनेशन बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. इटलीतील प्रख्यात संशोधक आणि साहिसी भ्रमंती करणारे मार्को पोलो यांनी जगभरात भ्रमंती करुन सांस्कृतिक, नैसर्गिक आणि खादयपदार्थांची माहिती मिळवून विविध देशांमध्ये त्याचा प्रसार केला होता. अशाच प्रकारे हॉटेल रॅडिसन ब्ल्यूने जगभरातील विविध खादयसंस्कृतीचे खादयपदार्थ नाशिकमध्ये सादर करण्याचे निश्चित केले आहे. जगातील वेगवेगळया खंडातुन अगदी अमेरिका, चीन,युरोप, आशिया खंडातील स्ट्रीट फूड, पिझ्झा, जापानमधील तिपिअँकी, अफगाणी फूड, चायनीज फुड, सॅडविज,भारतीय चाट, इलटीचा पास्ता, वोकस्टेशन, डिम्सम, सॅलड, आयस्क्रिम,डेझर्ट, जिलॅटो पार्लर आणि बऱ्याच खादयपदार्थाचा समावेश आहे. हे खादयपदार्थ इटली, लेबनन, तुर्कस्थान, भारत, इंडोनेशिया, चीन, पॅरिस, इंडोनेशिया या देशांमधून खास नाशिककरांसाठी सादर करण्यात येणार आहे.
देश-परदेशातील पर्यटकांना विविध खंडातील खादयपदार्थाची चव एकाच ठिकाणी चाखायला मिळणार असल्याने आपोआपच नाशिकच्या फुड टुरिझम आणि पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहेृ.

पत्रकार परिषदेत आधिक माहिती देत गोपीनाथ गोपाल- महाव्यवस्थापक, रॅडिसन ब्लू हॉटेल अँड स्पा नाशिक म्हणाले की, नाशिकमध्ये २०२१ च्या बहुप्रतिक्षित लक्झरी हॉटेलच्या उध्दाटनाचा महाव्यवस्थापक या नात्याने ही अप्रतिम संधी मिळाल्याचा मला सन्मान वाटतो, रॅडिसन हॉटेल ग्रुप आहे, अतिथी अनुभव आणि वैयक्तिकृत सेवांमध्ये अतुलनीय उत्कृष्टता प्रदान करणारे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात डायनॅमिक हॉटेल ऑपरेटरपैकी एक. आमच्या पाहुण्यांना आलिशान रॅडिसन ब्लू अनुभव आणण्यासाठी डायनॅमिक टीमसोबत काम करताना मला सन्मान वाटतो. माझे मुख्य लक्ष हे सुनिश्चित करणे असेल की हॉटेल आदरातिथ्य आणि प्रसिध्द विशिष्ट सेवांचा वारसा प्रदान करते ज्यासाठी ब्रँड जागतिक स्तरावर प्रसिध्द आहे.

काय आहे हॉटेल रॅडिसन ब्ल्यूच्या खादयपदार्थाचे वैशिष्टये
अन्नपदार्थांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी रॅडिसन ब्लूमध्ये जागतिक दर्जाच्या शेफना आमंत्रित करण्यात आले आहे. प्रत्येक आठवडयात टीमकडून रविवारी कार्यक्रम आयोजित केले जातात. नाशिककरांसाठी कुटुंबांसोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण. नाशिकमधील हॉटेलमध्ये प्रगतीशील पाककलेच्या संकल्पना आणि सात्विक आहाराचे शास्त्र समोर ठेवून खादयपदार्थ आणि आधुनिक पेयांची कल्पक निवड करता येणार आहे. हॉटेलमधील भेजनालयात विचारपूर्वक तयार केलेल्या उत्तम स्वादिष्ट पदार्थ आणि शीतपेयांचा आस्वाद घेता येणार आहे. हॉटेलमधील इनडोअर आणि अल्फ्रेस्को रेस्टॉरंट आणि बार आतिथींसाठी उत्कृष्ट ऑफरमध्ये समतोल साधतात. जेणेकरुन ग्राहकांना सतत विकसित होत असलेल्या अन्नर आणि सेवा संकल्पनेसह विविध प्रकारच्या पाककृतीमधील जेवणाचा आनंद घेता येईल.






