बहुप्रतिक्षित टोयोटाची ‘द अर्बन क्रूझर हाईराइडर’ चे आजपासून नाशिकमध्ये प्रिव्हयू

Aug 9, 2022

नाशिक – देशातील प्रतिष्ठीत एसयूव्हींच्या यादीत आता टोयोटाच्या ‘द अर्बन क्रूझर हाईराइडर’चा समावेश झाला आहे. अर्बन क्रूझर हाईराइडर ही एसयूव्ही ‘फर्स्टइनसेगमेंट’ वैशिष्ट्यांसह बाजारात दाखल झाली आहे. या कारमध्ये सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक पॉवर ट्रेनचा समावेश आहे. जागतिक स्तरावर कौतुक झालेल्या टोयोटाच्या सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेईकलचा (SHEV) देशातील मास सेगमेंटमध्ये प्रवेश झाला असल्याची माहिती ट्रेनर मनमीत सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत आधिक माहिती देत ते म्हणाले की, सामान्य नागरिकांना पाहण्यासाठी या एसयूव्हीचा प्रिव्ह्यू बुधवार दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळी११ वाजेपासून वासन टोयोटा, वासन नगर, पाथर्डी फाटा येथे नाशिककरांसाठी आयोजित करण्यात आला आहेृ. या वेळी सीओओ तेजंदर बेदी, सीनिअर जनरल मॅनेजर श्रीकांत नायक, सेल्स मॅनेजर रमणदीप सिंग, टोयोटाचे सेल्स मॅनेजर अभिजित पळनीटकर आणि
ट्रेनर मनमीत सिंग उपस्थित होते.

टोयोटाची द अर्बन क्रूझर हाईराइडर मध्ये एसयूव्ही निओ ड्राईव्ह आणि सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक पॉवरट्रेन या दोन पॉवर ट्रेनमध्ये उपलब्ध आहे. ही एसयूव्ही ७ रोमांचक मोनोटोन रंगसंगतीत आणि बाह्य बाजूला ४ दुहेरी टोन रंगसंगतीत ऑफर करण्यात आली आहे. मोनोटोन रंगामध्ये केव्हब्लॅक, स्पोर्टिनरेड, स्पिडी ब्लू,एन्टिसिंग सिल्व्हर, कॅफेव्हाइट, गेमिंगग्रे आणि मिडनाईट ब्लॅकचा समावेश आहे. तर दुहेरी टोन रंगां मध्ये ब्लॅक रूफ सह कॅफे व्हाइट, स्पोर्टिनरेड, एन्टिसिंग सिल्व्हर आणि स्पिडीब्लू यांचा समावेश आहे.

ठळक वैशिष्ट्ये –
– टोयोटाच्या जागतिक वंशाच्या एसयूव्हीपैकी एक असलेली अर्बन क्रूझर हाईराइडर अत्याधुनिक शैलींसह प्रस्तुत करण्यात आली आहे.
– पॅनोरामिक सनरूफ, हेड-अप डिस्प्ले (HUD) आणि ३६० अंश कॅमेऱ्याने सुसज्ज असलेल्या या एसयूव्हीत वाहन चालविण्याचा अप्रतिम अनुभव मिळेल.
– आय कनेक्ट, ९ इंच नवीन स्मार्ट प्ले कास्ट आणि वायरलेस चार्जिंगसह स्मार्ट डिव्हाइस जोडून संपूर्ण मनोरंजनाचा आनंद मिळेल.
– इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स सह ६एअर बॅग्ज, अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टिम(ABS).
– टीपीएमएस, क्रूझकंट्रोल, फ्रंटसीटपीटी/एफएल, ईबीडी सह एबीएस, व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल (VSC), अॅडव्हानस बॉडीस्ट्रक्चर, हिल होल्ड कंट्रोल, हिलडिसेंट,
रिअर ३- पॉइंट सीट बेल्ट आणि ऑल व्हील डिस्क ब्रेक.
– स्मार्ट वॉच कनेक्टिव्हीटी आणि प्रगत आवाज नियंत्रण.
– रिमोट व्हेईकलइग्निशन स्टार्ट/स्टॉप, रिमोट एसी कंट्रोल, फाइन्ड माय कार, चोरीला गेलेले वाहन ट्रॅकिंग करण्याची सुविधा, रिमोट मोबिलायझरने सुसज्ज.

ठळक कामगिरी –
– अर्बन क्रूझर हायराइडर ही एसयूव्ही सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक ग्रेड टीएचएस (टोयोटा हायब्रीड सिस्टिम) आणि ई-ड्राइव्ह ट्रान्समिशन आणि १.५ लिटरच्या इंजिनासह उपलब्ध आहे.
– एसयूव्हीचे इंजिन आउटपुट ६८kW आणि १२२Nm टॉर्क आणि ५९kW चे मोटर आउटपुट आणि १४१Nm टॉर्क देते.
– इंजिनचे आणि मोटरचे एकत्रित पॉवर आउटपुट ८५Kw आहे.
– निओ ड्राइव्ह ग्रेड इंटीग्रेटेड स्टार्टर जनरेटर (ISG) तंत्रज्ञानासह १.५ लिटर के-सिरिज इंजिनसह उपलब्ध आहे. जे ७५kW चे आउटपुट आणि १३५Nm टॉर्क देते.
– ‘फर्स्ट इन सेगमेंट’ ऑल व्हील ड्राइव्ह (AWD) ने सुसज्ज असलेल्या निओ ड्राइव्ह ग्रेडमध्ये ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देखील असेल.

तांत्रिक दृष्ट्या प्रगत– ही एसयूव्ही एक शक्तिशाली आणि इको-प्रगत तंत्रज्ञान म्हणून झटपट पॉवरसह एक शांत आणि स्थिर वाहन चालविण्याचा अनुभव देते. त्याचे असंख्य फायदे आहेत.
1) ईव्ही मोडव रचालण्याची क्षमता
2) खूप उच्च इंधन कार्यक्षमता देते
3) उत्सर्जन पातळी दिलेल्या मर्यादे पेक्षा कमी आहे
4) बाह्य चार्जिंगची आवश्यकता नसल्याचा फायदा
5) प्रतिसाद देणारी भक्कम शांत पण टिकावू ड्राइव्ह

रु. २५००० रुपये देऊन आज पासून बुकिंग सुरू होणार आहे. ग्राहक www.toyotabharat.com/onlinebooking/ या संकेतस्थळावर ऑनलाइन बुकिंग करू शकतात किंवा जवळच्या
टोयोटा डिलर शिपलाही भेट देऊ शकतात.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News