नाशिक : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि मतदार याद्या दोषविरहित करण्याची प्रक्रिया संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सध्या सुरू आहे. सदर मतदार याद्यांमध्ये मतदारांना नावातील बदल अथवा अन्य दुरुस्त्यांसाठी प्रत्यक्ष कार्यालयात जाणे शक्य होत नाही, त्यामुळे आवश्यक दुरूस्ती होऊ शकत नाही. याअनुषंगाने मतदारांपर्यंत प्रत्यक्षात पोहचण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून “नाम में क्या रखा हैं” ही मोहिम 23 ते 30 जुलै, 2019 या कालावधीत राबविण्यात येणार असल्याने नागरिक व मतदारांनी मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांनी केले.
या मोहिमेअंतर्गत निवडणूक शाखेमार्फत काही मोबाईल व्हॅन शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये कार्यालयीन वेळेनंतर फिरवण्यात येतील. या मोबाईल व्हॅनद्वारे मतदारांना आवश्यक नमुना क्र. -7 अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांच्याकडून मतदार यादीतील नाव दुरूस्ती किंवा मयत व्यक्तिंचे नाव वगळण्याची प्रक्रीया अशा अनुषंगीक दुरूस्त्या करण्यात येणार आहे. “नाम में क्या रखा हैं” या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील नाशिक शहरातील चार शहरी विधानसभा मतदारसंघ आणि मालेगाव शहर या मतदार संघांमध्ये मतदार आणि नागरिकांमध्ये मतदार यादीसंदर्भात जागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यात साधारण महिनाभरात 40 हजार पेक्षा जास्त मयत मतदारांच्या नावांची वगळणी करण्यात आली असून दुबार मतदारांच्या नावांची विहित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण वगळणी करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी परिपूर्ण मतदार यादी 19 ऑगस्ट, 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...





