नेदरलँड्स/भारत: कीजेन ही पिकांच्या बाबतीत नवकल्पना राबवणारी नेदरलँड्स, अमेरिका व भारत येथे कार्यरत असणारी कंपनी आणि महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स लि. (एमएएसएल) ही महिंद्रा अँड महिंद्रा लि.ची उपकंपनी व 20.7 अब्ज डॉलर उलाढाल असणाऱ्या महिंद्रा समूहाचा भाग असणारी कंपनी यांनी प्रमुख पिकांसाठी विविध वर्षांची संशोधन भागीदारी केल्याचे आज जाहीर केले आहे.
आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या व बाजाराच्या दृष्टीने उपयुक्त पद्धती विकसित करण्यासाठी कीजेनच्या पीकविषयक नावीन्य सुविधांचा वापर केला जाणार आहे. या तंत्रज्ञानविषयक सहयोगामुळे पिकाचे अतिशय उत्पादक व अधिक लवचिक प्रकार तयार केले जातील आणि त्यामुळे फार्मटेक प्रॉस्परिटी हे महिंद्राचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी मदत होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एमएएसएलच्या प्रोप्रायटरी जर्मप्लाझ्ममध्ये, दुष्काळ व ऊन अशा अजैव ताणांपासून आणि कीटक व आजार अशा जैव ताणांपासून पिकांचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी या भागीदारीची मदत होईल.
नव्या भागीदारीविषयी बोलताना, महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शर्मा यांनी सांगितले, “एमएएसएलमध्ये आम्ही फार्मिंग 3.0 या अत्याधुनिक फार्मिंगसाठी प्रयत्नशील असून यामध्ये शाश्वत जागतिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कस्टमाइज्ड उत्पादने व उपाय यांद्वारे संपूर्ण शेती व्यवस्थेमध्ये परिवर्तन आणण्यासाठी विविध प्रकारच्या प्रगत तंज्ञांचा समावेश आहे. पिकाच्या बाबतीत नावीन्य आणण्यामध्ये कीजेन जगभर आघाडीवर आहे आणि भारतासाठी व अन्य नव्या ठिकाणांसाठी अत्यंत उत्पादक व अधिक लवचिक पिके विकसित करण्यासाठी कंपनीच्या क्षमतांचा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व सुविधांचा लाभ घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. हा जागतिक सहयोग दोन्ही कंपन्यांसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास आहे.”
“एमएएसएलची शेतकऱ्यांसाठीची बांधिलकी कौतुकास्पद आहे आणि अद्ययावत ब्रीडिंग तंत्रज्ञान व सक्षम जर्मप्लाझ्म पाया या आधारे नावीन्यपूर्ण सेवा सादर करण्याच्या बाबतीत कंपनीला आघाडीची ठरवणारी आहे. एमएएसएलबरोबर हा प्रवास सुरू करण्यासाठी आणि आमचे प्रोप्रायटरी तंत्रज्ञान व ज्ञान यांचा वापर करून त्यांच्या ब्रीडिंग कार्यक्रमांना चालना देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. यामुळे नॉन-जीएम पीक प्रकार सुधारण्यासाठी, तसेच भारतात व आशियात एमएएसएल व्यवसाय वाढवण्यासाठी मदत होईल”, असे कीजेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जेन वान यांनी सांगितले.
या सहयोगामुळे एमएएसएलला जुन्या व नव्या बाजारांत वाढ साधणे शक्य होईल, तसेच विशिष्ट पिकांच्या बाबतीत दर्जेदार हायब्रिड देता येतील. यामुळे कंपनीच्या बियाणे व्यवसायातही वाढ होईल. यामुळे फार्मटेक प्रॉस्परिटी साध्य करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मदत होईल.



