टाटा टी च्या कव्हर वर आता महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध अजिंठा-एलोरा लेण्या

Aug 16, 2022

नाशिक: ‘देशाचा चहा’ टाटा टी प्रीमियम हा टाटा टीच्या वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओतील एक प्रमुख ब्रँड यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या #देश का गर्व अभियानांतर्गत महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध आणि महाराष्ट्राच्या शिरपेचातील एक महत्त्वाचा तुरा मानल्या जाणाऱ्या अजिंठा-एलोरा लेण्यांचा सन्मान करत आहे. देशातील प्रत्येक राज्याच्या परंपरा, आवडीनिवडी, संस्कृती व अभिमान चिन्हांचा गौरव करण्याचे धोरण कायम राखत टाटा टी प्रीमियमने #देश का गर्व अभियानामध्ये स्वातंत्र्योत्तर काळातील गेल्या सात दशकांतील महत्त्वाच्या घटना व क्षणांना उजाळा देत आहे, अशा घटना ज्यांनी न केवळ इतिहास निर्माण केला, तर जागतिक नकाशावर भारताची ठळक ओळख देखील निर्माण केली. यासाठी निवडण्यात आलेल्या आठ घटनांमध्ये अजिंठा-एलोरा लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा दर्जा दिल्या जाण्याच्या घटनेचा समावेश करण्यात आला आहे. देशाच्या प्रगतिशील वाटचालीतील हे सुवर्णक्षण कायम आपल्या सोबत राहावेत आणि देशातील जनतेच्या मनात देशाच्या अभिमानास्पद इतिहासाची स्मृती कायम जागृत राहावी यासाठी टाटा टी प्रीमियम ब्रँडने कलात्मकरीत्या सजवण्यात आलेल्या टी-सेट व टिन पॅक कलेक्शनची मर्यादित आवृत्ती सादर केली आहे. #देश का गर्व असे नाव देण्यात आलेले हे कलेक्शन या अभियानाचा एक भाग आहे.
देश का गर्व टी सेट कलेक्शन प्लेटेड प्रोजेक्टच्या सहयोगाने तयार करण्यात आले आहे. प्लेटेड प्रोजेक्ट हा एक अनोखा ब्रँड कलेच्या माध्यमातून भुकेच्या समस्येच्या निवारणासाठी प्रयत्नशील आहे. आकर्षक, उठावदार चित्रांच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील वैभवशाली इतिहासाला जिवंत करणारा हा टी-सेट विशेष तयार करण्यात आला आहे. भारताचा अभिमान आणि प्रतिष्ठा जागवणाऱ्या महत्त्वाच्या घटना यावर चित्रित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक सेटमध्ये फक्त ५० पीस तयार करण्यात आलेले असल्याने हे कलेक्शन खरोखरीच अतिशय अनोखे आहे. सामाजिक जागरूकतेला प्रोत्साहन देण्याचे टाटा टीचे उद्दिष्ट आणि द प्लेटेड प्रोजेक्टचा भुकेविरोधात सुरु असलेला लढा या दोन्हींना अनुसरून प्रत्येक पीसमधून मिळणारी सर्वच्या सर्व रक्कम गरीब मुलांना दिल्या जाणाऱ्या जेवणांना प्रायोजित करण्यासाठी दान केली जाईल, अशाप्रकारे उज्वल भवितव्य निर्माण करण्यात त्यांची मदत केली जाईल.
या सर्व घटनांना अतिशय प्रभावी पद्धतीने एकत्र आणून टाटा टी प्रीमियमने या अतिशय महत्त्वाच्या दिवसासाठी एक अनोखे टीव्ही कॅम्पेन देखील सुरु केले आहे. कथाकथनाची कला आणि तंत्रज्ञानाचा काळजीपूर्वक मेळ साधत या फिल्ममध्ये भूतकाळ व वर्तमानकाळ यांचा देखील मिलाप करत या सर्व अभिमानास्पद घटनांना एका फ्रेममध्ये सादर केले आहे. ही टीव्हीसी दर्शकांच्या हृदयाला स्पर्श करते, देशाविषयी अभिमानाने त्यांना भारून टाकते, आणि भूतकाळातील या घटनांना पुन्हा एकदा जगण्याची, अनुभवण्याची संधी देते. अभियानाच्या मुख्य संकल्पनेच्या धर्तीवर या फिल्मची सांगता या संदेशाने करण्यात आली आहे – “आज़ादी के 75 सालों में ऐसे कई किस्से, कई पल हैं जो देश का गर्व हैं। तो चलिए, उन किस्सों को फिर से जीकर उनको अपनी ज़िन्दगी का हिस्सा बनाते हैं।” अर्थात “स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांतील अशा अनेक घटना, असे अनेक क्षण आहेत जे देशाचा अभिमान आहेत. चला, आपण सर्वांनी मिळून ते क्षण पुन्हा अनुभवू आणि त्यांना आपल्या जीवनाचा एक भाग बनवू या.”

टाटा कन्ज्युमर प्रोडक्ट्सचे पॅकेज्ड बेव्हरेजेस (भारत आणि दक्षिण आशिया) विभागाचे प्रेसिडेंट श्री पुनीत दास म्हणाले, “हायपरलोकल अभियानांचे प्रवर्तक म्हणून देशाचा चहा टाटा टी प्रीमियमने नेहमीच देशवासीयांच्या वैविध्यपूर्ण आवडीनिवडी पूर्ण केल्या आहेत. भारताच्या समृद्ध संस्कृती, परंपरा व अभिमानाचा गौरव हा ब्रँड वेळोवेळी करत असतो. यंदा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अभियान सुरु करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचा गौरव म्हणून कलेक्शनची मर्यादित आवृत्ती आणि टीव्हीसी सादर करून आम्ही हे अभियान चालवत आहोत. भारतामध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून अजिंठा-एलोरा लेण्यांची निवड केल्या जाणाऱ्या घटनेसारख्या अभिमानास्पद क्षणांची निवड करण्यासाठी खूप सखोल संशोधन व विचार करण्यात आला आहे. सांस्कृतिक सहयोग आणि निपुण शिल्पकला, महाराष्ट्रातील लोकांचा खरा अभिमान दर्शवणारी अशी ही घटना आहे. गेली अनेक दशके एका फ्रेममध्ये सामावून घेणारा दृश्य कथाकथनाचा फॉरमॅट वापरून आम्ही आमच्या ग्राहकांना या घटनांचा पुनश्च अनुभव घेण्याची आणि अतिशय अभिमानाने त्यांचा आनंद साजरा करण्याची संधी देत आहोत. “भारताचे स्वातंत्र्य” साजरे करत असताना वैभवशाली भूतकाळाच्या स्मृती जागृत व्हाव्यात, आपल्या देशाचा आजवरचा स्वातंत्र्योत्तर काळ अशा आपणा सर्वांसाठी अभिमानास्पद घटनांमधून कायमचा आपल्यासोबत राहावा हा आमचा प्रयत्न आहे.”

टाटा टी प्रीमियमसोबत या भागीदारीबद्दल द प्लेटेड प्रोजेक्टचे संस्थापक श्री. चित्रेश सिन्हा म्हणाले, “द प्लेटेड प्रोजेक्ट आणि टाटा टी प्रीमियम या दोघांचेही उद्दिष्ट प्रभाव निर्माण करून समाजातील वास्तविक समस्यांसाठी काम करणे हे आहे. म्हणूनच आमची भागीदारी अतिशय उत्तम जुळून आली आहे. चहाच्या प्रत्येक घोटासोबत रंगत जाणाऱ्या चर्चा आणि गप्पांमध्ये देशाविषयी, आपल्या राज्याविषयी अभिमानाचे उठावदार रंग भरणारे हे छान कलेक्शन तयार करण्यासाठी अतिशय गुणी व निपुण कलाकारांसोबत आम्हाला काम करता आले याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. आपला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची इतकी अनोखी आणि चांगली पद्धत आम्हाला सुचू शकली नसती.”

या अभियानाबद्दल इंडिया मीडिया मॉन्क्सचे चीफ कन्टेन्ट ऑफिसर श्री. अझझुल हक म्हणाले, “भारताच्या स्वातंत्र्याचे ७५वे वर्ष साजरे करण्याच्या ब्रीफसह जेव्हा टाटा टी प्रीमियमने आमच्याशी संपर्क केला तेव्हा आम्ही आमच्या अनोखा क्षमता वापरण्याचे व कथाकथनाचा तंत्रज्ञानाशी मेळ घालण्याचे ठरवले. देशाच्या कोणत्याही भागातील असोत किंवा कोणत्याही वयाचे असोत, प्रत्येक भारतीयाला आपलेसे वाटले पाहिजे असे कॅम्पेन आम्हाला निर्माण करायचे होते. या कॅम्पेनमध्ये आम्ही खऱ्या अर्थाने काळाचा प्रवास घडवून आणला आहे. स्मृती पुन्हा जागवल्या जाव्यात यासाठी कालप्रवास अशी ही संकल्पना आहे. कथाकथनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून हे शक्य करण्यात आले आहे.”

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News