सुयोग्य प्लम्बिंग द्वारे पाणी बचतीच्या जनजागृतीसाठी अनोखी इंडियन प्लम्बिंग प्रोफेशनल लीग आजपासून

Jul 26, 2019

नाशिक – सुयोग्य प्लम्बिंग हा पाणी बचतीचा मूलमंत्र असून त्याबाबत योग्य ज्ञान सर्वसंबंधितांना देऊन जागृती करण्यासाठी  इंडियन प्लम्बिंग असोसिएशन द्वारा सलग दुसऱ्या वर्षी इंडियन प्लम्बिंग प्रोफेशनल लीग चे आयोजन करण्यात आले आहे. दि. २७ जुलै रोजी सुरु होणारी हि लीग ७ सप्टेंबर पर्यंत चालेल. याबाबत सांगताना इंडियन प्लम्बिंग असोसिएशनच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष मिलिंद शेटे म्हणाले कि, गेल्या वर्षी या लीग ला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता. यामध्ये सहभागी होणाऱ्या संघात बांधकाम क्षेत्राशी संबंधित जसे वास्तुविशारद, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, अभियंते हे संघाच्या स्वरूपात सहभागी होतात. त्यांना पुढील एक महिना दर शनिवारी प्लम्बिंग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सुयोग्य प्लम्बिंग विषयी मार्गदर्शन केले जाते. यानंतर एका प्रश्न मंजुषा स्पर्धेद्वारे त्यांनी किती ज्ञान आत्मसात केले याची परीक्षा घेतली जाते. या स्पर्धेचा प्रमुख उद्देश म्हणजे सुयोग्य प्लम्बिंगच्या प्रशिक्षणाद्वारे पाणी बचत असा आहे. 
   उद्या दि. २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता याचे उद्धघाटन होणार असून त्यास प्रमुख पाहुणे म्हणून क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे , मेटाचे अधिक्षक अभियंता अविनाश कुलकर्णी व प्लम्बिंग तज्ज्ञ सुभाष देशपांडे हे उपस्थित राहणार आहेत.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News