राज्यस्तरीय महाराष्ट्र बिझिनेस पुरस्कार सोहळा संपन्न

Jul 28, 2019

नाशिक – पुरस्कार हि केलेल्या कार्याची पावती असते व अशा शाबासकीच्या थापेने अजून मोठी भरारी घ्यायचा हुरूप येतो असे प्रतिपादन प्रख्यात सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर यांनी केले. त्या नाशिकमधील हॉटेल ताज येथे आयोजित महाराष्ट्र बिईनेस अवॉर्ड – २०१९ च्या वितरण प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या ३६ व्यावसायिकांचा गौरव करण्यात आला. आरोग्य, कृषी, रिटेल, इंजिनिअरींग, सेवा अशा विविध व्यावसायिकांचा यामध्ये समावेश होता. या राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये नाशिकच्या ७ व्यावसायिकांचा समावेश होता. अमृता खानविलकर पुढे म्हणाल्या अशा प्रकारील व्यासपीठ मिळणे हे प्रोत्साहन मिळण्याकरिता आवश्यक असते व अशा पुरस्कारांनी आपला परिवार, सोबत काम करणारे कर्मचारी यांना देखील आनंद होतो व आपल्या कामाचा आवाका त्यांना कळतो.पुरस्काराचे  आयोजक रिसील या रिसर्च करणाऱ्या संस्थेचे संचालक सुधीर कुमार म्हणाले की, मी अनेक वर्षांपासून सेवा क्षेत्रात काम करतो, आर्थिक मोबदल्यासोबतच  आपल्या  कार्यास जर प्रोत्साहन मिळाले तर कामाचा उत्साह द्विगुणीत होतो त्यामुळेच अशा प्रकारच्या पुरस्काराची संकल्पना सुचली. हे या पुरस्काराचे पहिलेच वर्ष असून यापुढे दरवर्षी महाराष्ट्रातील विविध शहरात याचे आयोजन करण्यात येणार आहे. या पुरस्काराची प्रक्रिया गेल्या ६ महिन्यापासून सुरु होती. यासाठी सुमारे १४०० नामांकन आले होते. या नामांकनामधून एका स्वतंत्र ज्युरी द्वारे छाननी करून तसेच त्याच्या व्यवसायास वैयक्तिक भेट देऊन या पुरस्कारार्थी ३६ व्यावसायिकांची निवड करण्यात आली असेही ते म्हणाले. 

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News