महिंद्रा बोलेरो सुरक्षा व एमिशन अपग्रेडमुळे भविष्यासाठी सुसज्ज

Jul 29, 2019

BS VI एमिशन नॉर्मसाठी आता प्रमाणित

 

 

मुंबई: महिंद्रा अँड महिंद्रा लि. या 20.7 अब्ज उलाढालीच्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या कंपनीने बोलेरो पॉवर+ या आपल्या दणकट व राकट मॉडेलने नुकतेच इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नालॉजीकडून (आयसीएटी) BS-VI रेडीनेस सर्टिफिकेट प्राप्त केल्याचे जाहीर केले आहे.
नव्या एमिशन नॉर्मच्या अंमलबजावमीच्या कालावधीनुसार, 2020च्या सुरुवातीला बोलेरो BS-VI दाखल होणार आहे. पुरवठादारांबरोबरच महिंद्राही विशिष्ट कालावधीमध्ये सर्व उत्पादनांमध्ये BS-VI तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी तयारी करत आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष राजन वधेरा यांच्या मते, “BS-VI च्या तयारीच्या दृष्टीने पहिला मैलाचा टप्पा म्हणून, आम्हाला बोलेरो पॉवर+साठी BS-VI सर्टिफिकेशन मिळाल्याचा अतिशय आनंद होत आहे. बोलेरो ही आमची सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे आणि BS-VI रेडी असे आयसीएटीने प्रमाणित केलेली पहिली यूव्ही (युटिलिटी व्हेइकल) आहे.”
याबरोबरच, महिंद्राने बोलेरो या महत्त्वाच्या उत्पादनाच्या सुरक्षेच्या बाबतीत सुधारणा केली असून नव्या 2019 सुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी आता बोलेरोमध्ये एअरबॅग व अँटि-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (एबीएस) अशा अन्य वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.बोलेरो पॉवर+, बोलेरो प्लस (9-सीटर), आणि बोलेरो अम्ब्युलन्स यामध्ये आवश्यक अपग्रेड केले जातील. महिंद्राच्या ग्राहक-केंद्री दृष्टिकोनामुळे कंपनीची उत्पादने वेळोवेळी अपग्रेड केली जातात. बोलेरोमध्ये समाविष्ट केलेल्या सुरक्षेच्या नव्या वैशिष्ट्यांमध्ये समाविष्ट आहेत:
• एअरबॅग
• वेग अति वाढला तर चालकाला सावध करण्यासाठी 80kmph व 120kmph याव स्पीट अलर्ट सिस्टीम
• ड्रायव्हर व को-ड्रायव्हर सीट बेल्ट रिमांइडर
• दार आतून उघडण्यासाठी सेंट्रल लॉकिंग सिस्टीमसाठी मॅन्युअल ओव्हरराइड
• व्हेइकल रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स
बोलेरोतील सर्वसाधारण सुरक्षेची वैशिष्ट्ये आहेत, अँटि-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, दणकट एसयूव्ही निर्मिती, हाय ग्राउंड क्लीअरन्स, अप्रोच व डिपार्चरचा हाय अँगल, फ्रंट डिस्क ब्रेक्स, अँटि-ग्लेअर, आयआरव्हीएम, डिजिटल इममोबिलायजर व सीट बेल्ट रिमाइंडर.

बोलेरोविषयी

ऑगस्ट 2000 मध्ये दाखल केल्यापासून बोलेरो यूव्ही श्रेणीमध्ये प्रवर्तक राहिली आहे. दणकट बांधणी व कोठेही जाण्याची क्षमता यासाठी नावाजलेली बोलेरी ही देशभरातील लाखो कुटुंबांसाठी विश्वासार्ह वर्कहॉर्स आहे. या वाहनाचा वापर विविध सशस्त्र बल, निम-लष्करी व अंतर्गत सुरक्षा बल अनेक वर्षे करत आहेत.

बोलेरी ही भारतातील आजवरची सर्वाधिक विकली जाणारी यूव्ही आहे आणि तिचे जवळजवळ 12 लाख समाधानी ग्राहक आहेत. गेल्या काही वर्षांत, महिंद्राने मूलभूत ग्राहकांसाठी व मोठ्या संख्येने असणाऱ्या ग्राहकांसाठी बोलेरो उपयुक्त व आकर्षक वाटावी म्हणून सातत्याने बोलेरो अपग्रेड केली आहे.

महिंद्राविषयी
20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे 240,000 कर्मचारी आहेत.

महिंद्राविषयी अधिक माहितीसाठी पाहा www.mahindra.com / ट्विटर व फेसबुक: @MahindraRise
मीडियासाठी संपर्क:
मोहन नायर
उपाध्यक्ष (कम्युनिकेशन्स)
महिंद्रा अँड महिंद्रा लि.
ऑफिस डायरेक्ट लाइन – + 91 22 28468510
ऑफिस ईमेल – nair.mohan@mahindra.com

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News