येस बँकेतर्फे नाशिकमध्ये क्लस्टर बँकिंग उपक्रम सादर

Aug 23, 2022

नाशिक : येस बँकेने आज महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथे क्लस्टर बँकिंग उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली. या प्रदेशात बँकिंग क्षेत्रातील सहभाग वाढवण्यासाठी निर्धारित क्लस्टर्सच्या आसपास सर्वसमावेशक बँकिंग सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने एका विशेष उपक्रमाचा भाग म्हणून बँकेने नाशिकचा पहिले क्लस्टर म्हणून अंगीकार केला आहे. परिसंस्थेच्या संपूर्ण मूल्य शृंखलेमध्ये आर्थिक सहाय्य प्रदान करण्याच्या उद्देशाने देशभरातील विविध भौगोलिक क्षेत्रांमध्ये असे विशिष्ट लक्ष्य निर्धारित बँकिंग उपक्रम सुरू करण्याचे येस बँकेचे उद्दिष्ट आहे.
सध्या, येस बँकेचा नाशिकमध्ये १८ शाखा, १६ एटीएम आणि ५,२७३ बीसी पॉइंट्सचा मोठा ठसा आहे. ग्रामीण भागात आर्थिक समावेशन आणि बँकिंग जागरूकता वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेमुळे, बँकेने जिल्ह्यातील विविध गावे, मंडई आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी १३० हून अधिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. येस बँकेने स्थानिक कृषी-तंत्र कंपनीच्या भागीदारीत नाशिकची पहिली डिजिटल मंडई श्री रामेश्वर कृषी मार्केट उमराणे गावात सादर केली, ज्यामुळे या प्रदेशातील १०,००० हून अधिक शेतकरी आणि ६० हून अधिक व्यापारी राहत असलेल्या कृषी मंडईंचे शेवटपर्यंत डिजिटलीकरण करण्यात सक्षम झाले. एपीएमसीज, आर्थिया आणि त्यावरील शेतकऱ्यांसाठी आपल्या नाविन्यपूर्ण उपाय सुविधांद्वारे स्थानिक आर्थिक परिसंस्था आणखी डिजीटल करण्याचे बँकेचे उद्दिष्ट आहे.
या सादरीकरणावर बोलताना येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत कुमार म्हणाले, “आमच्या क्लस्टर बँकिंग उपक्रमाच्या शुभारंभासह स्थानिक बाजारपेठांमध्ये खोलवर रुजण्याचा आणि पिंपळगाववर लक्ष केंद्रित करून नाशिक जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसराच्या विकासगाथेत साधन बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमाच्या शुभारंभाचा उद्देश मुख्य परिसंस्थेच्या स्थानिक सदस्यांना सहभागी करून घेत नाशिकच्या कांदे, द्राक्षे, डाळिंब आणि टोमॅटोच्या मूल्य साखळीमध्ये केंद्रीत आणि सानुकूलित उपायांद्वारे शेवटच्या वापरकर्त्यापर्यंत बँकिंग प्रदान करणे हा आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, उत्पादक आणि निर्यातदारांना कर्ज, बँकिंग आणि गुंतवणुकीसाठी सानुकूलित आर्थिक उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही दहा पेक्षा जास्त क्लस्टर्समध्ये धोरणाची अंमलबजावणी करण्याचा विचार करतो.”
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी येस बँकेचे हे उपक्रम भारत सरकारच्या आर्थिक समावेशनाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहेत. भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा अॅनालिटिक्स, कोअर जावा आणि डिजिटल मार्केटिंग यांसारख्या कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी बँकेने नाशिकमधील १०० हून अधिक तरुणांसाठी कौशल्य केंद्र सुरू केले आहे.
येस बँक या प्रदेशातील ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणासाठी नॅनो एंटरप्राइजेस तयार करण्याच्या दिशेनेही काम करत आहे. क्लस्टर बँकिंग हा ‘एक बँक’ दृष्टीकोन आहे जो येस बँकेसाठी उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये दीर्घकालीन वाढीव व्यवसाय विस्तारासाठी प्रयत्न करतो आणि अशा प्रकारे देशाच्या एकूण सर्वांगीण आर्थिक वाढीस हातभार लावतो.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News