नाशिक :- विविध मागण्या शासनाकडून मान्य करण्याकरीता लक्षवेधी म्हणून आज बुधवार दिनांक 31 जुलै 2019 रोजी प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र च्या वतीने आमदार बच्चु भाऊ कडू यांच्या आदेशानुसार शेतकरी कर्जमाफी व इतर विविध मागण्यासंदर्भात राज्यभरातून जेलभरो आंदोलन करण्यात आले . त्या अनुषंगाने नाशिक जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे धरणे आंदोलन करण्यात आले . यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध मागण्या मान्य करण्याकरिता जिल्हाधिकारी यांसकडे निवेदन देण्यात आले. सदरच्या मागण्या लवकरात लवकर मंजूर झाल्या नाही तर प्रत्येक तालुकास्तरावर मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने देण्यात आला. जिल्हाप्रमुख अनिल भडांगे यांच्या नेतृत्वात आजचा जेलभरो आंदोलन यशस्वी करण्यात आले.यावेळी प्रहार संघटनेचे
दत्तू बोडके, अनिल भडांगे, गणेश निंबाळकर, शरद शिंदे, अमजद पठाण, जगन काकडे, नितीन गवळी, शाम गोसावी, अमोल अडांगळे, संतोष थोरे,डॉ जनार्दन पगार, अमोल फरताळे, सचिन पवार, गोविंद पवार, शंकर गायके, नवनाथ तनपुरे, अशोक गावडे,पांडुरंग शेलार, पुंडलिक बिडवे, संकेत जाधव,कृष्णाजी जाधव,तुषार खैरनार,भाऊसाहेब मोरे, विनोद आहेर, गोपाळ देवरे, बापू देवरे, रुपेश सोनवणे, संतोष जाधव, राहुल सोनवणे, राजेंद्र देवरे, कपिल सोनवणे, प्रकाश चव्हाण, प्रकाश चव्हाण,राम बोरसे, रेवननाथ गांगुर्डे, संध्या जाधव, चंद्रभान गांगुडे, हरिभाऊ महाजन, किरण चरमळ, वसंत झांबरे, गोरख निर्मळ, रामभाऊ नाईकवाडे,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
काय आहे प्रमुख मागण्या ?
१) शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी
२) पिकविम्या ची रक्कम तातडीने द्यावी
३)शेतीच्या पेरणी ते कापणी पर्यंत कामांचा समावेश मनरेगा अंतर्गत करावा .
४)घोषित झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान द्यावे.
५) दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करावे .
६)ओबीसी साठी स्वतंत्र घरकुल योजना करून आर्थिक तरतूद करावी .
७)ओबीसी च्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृह निर्माण करावे.
८) आदिवासींचे प्रलंबित वनहक्क जमीन पट्टे त्वरित वाटप करावेत.
९)स्व.गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतमजूर व कामगारांचा समावेश करावा.
१०)कांदा, तूर,ऊस उत्पादकांना जाहीर केलेले अनुदान तातडीने देण्यात यावे.
११) वाळलेल्या फळबागांना नुकसानभरपाई देण्यात यावी.
१२)दुबार पेरणीच्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने बियाणे,खते व आर्थिक मदत द्यावी.
१३)प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन,मोबदला व नोकरी द्यावी.
१४) निराधार विधवा माता भगिनींना वार्षिक १०००० रुपये भाऊबीज भेट द्यावी.





