शिल्पी अवस्थी यांना ‘युनिव्हर्स क्वीन’ प्रेरणादायी पुरस्कार

Aug 3, 2019

नाशिक— नाशिकच्या उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या शिल्पी अवस्थी यांना ‘युनिव्हर्स क्वीन’ प्रेरणादायी व्यक्तिमत्व पुरस्काराने गौरविण्यात आले.हा पुरस्कार त्यांना फॅशन आणि सौंदर्य आणि सामाजिक कार्यात विशेष योगदान म्हणून देण्यात आला आहे.
शिल्पी अवस्थी यांना यापूर्वी मिसेस इंडिया इंटरनॅशनल ,मिसेस डिवाईन दिवा,मिसेस कंजीनियलीटी,मिसेस रॅम्पवॉक आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

शिल्पी अवस्थी या माजी खासदार सुरेंद्र पाल पाठक यांच्या कन्या असून नाशिकचे उदयोजक शैलेन्द्र अवस्थी यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या आहेत.

जर देशातील युवा पिढीला चांगले मार्गदर्शन मिळाले तर नक्की देशाच्या विकासाला हातभार लागेल,असं त्या म्हणतात.तसेच हा पुरस्कार माझ्यासाठी उर्जा देणारा असून यापुढेही मी चांगले काम करीन व समाजाच्या प्रगतीत योगदान देईल.नुकतेच शिल्पी अवस्थी यांनी वृक्षारोपण मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवला असून त्याद्वारे हजारो वृक्षांचे रोपण केले आहे.  

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News