1. रामकुंड व गोदाघाट गोदामाईचे रौद्र रुप
2. धरणातील मोठया प्रमाणात विसर्ग
3. दिंडोरी तालुका व वलखेडगावाचा संपर्क तुटला
4. नाशिक तालुक्यातील गंगापाडळी गांवाचा संपर्क तुटला
5. निफाड जवळील सायखेडा गाव पाण्याखाली गेलेला पुल
नाशिक : गोदामाईने विराट रुप धारण करीत नदीपात्रातील आसपास परिसरात महापूराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील जवळ जवळ सर्व पुल पाण्याखाली गेल्यामुळे येण्याजाण्याचे मार्ग बंद झाले. नागरिकांनी काम असेल तर बाहेर पडावे
अन्यथा घरी थांबण्याचे प्रशासनाने आव्हान केले आहे. कोणीही पुर पाहण्यासाठी पाण्याजवळ न जाता गर्दी कमी करण्यासाठी पोलिस प्रशासनाला मदत करावे याबाबतची पत्रकार परिषदेत घेत पालकमंत्री गिरीष महाजन यांनी नाशिकमधील शाळांना
उदया सुटटी जाहिर केली आहे.
शहरातील महत्वाचा पुल सिध्देश्वर मंदिर व रामवाडी जोडणारा पुल संपुर्ण पाण्याखाली गेल्यामुळे स्थानिक लोकांचे घरे पाण्याखाली गेली असून त्याना वेळीत सुरक्षा स्थळी हालविण्यात आले. रामवाडीतील अनेक गुरे ढोरे सुरक्षित स्थळी हालविण्यात
आली आहे. पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर संपुर्ण शहर संपर्कपासून दुर राहण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. ब्रिटिश कालीन व्हीक्टोरिया पुलावर पुर पाहण्यासाठी लोकांना गर्दी केल्यामुळे मालेगांव स्टॅण्ड ते रविवार कांरजा परिसरात
वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने नागरिकांना पुलावर उभे राहून पुर पाहण्यासाठी बंदी केली आहे.
सिडको परिसरातील संभाजी चौक ते पंचवटीकडे येणा-या रोडचा संपर्क तुटला असून नंदीनी नदी वाघाड नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत असल्यामुळे अनेक सखल भागात मोठया प्रमाणात पाणी साचले आहे.
गंगाघाटवरील नारो शंकराच्या घंटेला पाणी लागल्यामुळे केवळ मंदिराचे कळस दिसू लागल्यामुळे सदरचा महापुरात अनेक दुकानांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.शहरातील संततधार जरी धीमी झाली असली तरी त्रंबकेश्वर तालुक्यात मोठया
प्रमाणात पाउस पडत असल्यामुळे धरणसाठयातील पाणीसाठयात वाढ कमी करण्यासाठी गंगापुर धरणातून मोठया प्रमाणात विसर्ग काल रात्री पासून वाढविण्यात आलेला आहे.
जिल्हयातील सर्वच धरणे तुंबडू भरुन वाहून लागली असून मोठया प्रमाणात विसर्ग सुरु ठेवण्यात आल्यामुळे दारणा,गंगापुर, अन्य धरणातील पाणी जायकवाडीला मिळत असल्यामुळे पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे.









