बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यातून 104 जणांना रोजगार – सुभाष देसाई

Aug 7, 2019

मुंबई, : राज्य शासनाच्या उद्योग विभाग व सीआयआयच्या वतीने वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.

वरळी येथील बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यासाठी परिसरातील सुमारे तीन हजार इच्छुकांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने नोंदणी केली होती. एकूण 67 कंपन्यांची यासाठी नोंदणी झाली होती. त्यापैकी 50 कंपन्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. 1 हजार 394 मुलांनी प्रत्यक्षात सहभाग नोंदवून मुलाखती दिल्या. त्यापैकी 755 जणांची प्राथमिक फेरीत निवड करण्यात आली. 104 जणांना जागेवर नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते निवड झालेल्या तरुण-तरुणींना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

उद्योग विभाग राबवत असलेल्या या उपक्रमांला सर्वत्र उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी दिसून आले. याबद्दल उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी समाधान व्यक्त केले. या मेळाव्यात सहभागी झालेल्या प्रत्येक तरुण-तरुणीला नोकरी मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल. प्रत्येकाला नोकरी देणे हे आमचे कर्तव्य असल्याचे श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

वरळीचे आमदार सुनील शिंदे यांच्या पुढाकाराने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News